agricultural news in marathi success story Diverse Fruit- Vegetable production to sales methods | Page 2 ||| Agrowon

वैविध्यपूर्ण फळे- भाजीपाला उत्पादन ते विक्री पद्धती

माणिक रासवे
गुरुवार, 7 ऑक्टोबर 2021

परभणी जिल्ह्यातील रवळगाव (ता.सेलू) येथील सोमेश्वर नारायणराव गिराम यांनी फळबागकेंद्रित शेती यशस्वी केली आहे. दर्जेदार उत्पादनासोबत स्वतःची विक्री व्यवस्थाही उभारली आहे. सेंद्रिय, मिश्र व आंतरपीक या पद्धतींमुळे वर्षभर दररोज ताजे उत्पन्न घेणेही त्यांना शक्य झाले आहे.
 

परभणी जिल्ह्यातील रवळगाव (ता.सेलू) येथील सोमेश्वर नारायणराव गिराम यांनी फळबागकेंद्रित शेती यशस्वी केली आहे. दर्जेदार उत्पादनासोबत स्वतःची विक्री व्यवस्थाही उभारली आहे. सेंद्रिय, मिश्र व आंतरपीक या पद्धतींमुळे वर्षभर दररोज ताजे उत्पन्न घेणेही त्यांना शक्य झाले आहे.

परभणी जिल्ह्यात सेलू तालुका ठिकाणापासून तीन किलोमीटरवरील रवळगाव येथे सोमेश्वर गिराम यांचे आठ सदस्यांचे एकत्रित कुटुंब आहे. कुटुंबाची १८ एकर वडिलोपार्जित शेती होती. काही कारणास्तव ती विकावी लागली. सोमेश्वर आणि बंधू सखाराम यांना उपजीविकेसाठी नाशिक येथे जावे लागले. तेथे ‘इलेक्ट्रीशियन’ म्हणून अनुभव घेतला. मात्र शेतीची आवड कायम जोपासली होती.

दरम्यान १९९४ ते १९९७ काळात रवळगाव येथे गावाजवळ टप्प्याटप्प्याने साडेआठ एकर जमीन खरेदी केली. आई या शेतीची जबाबदारी पाहात. परंतु समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. मग सोमेश्वर २०१३ मध्ये शेती करण्यासाठी गावी परतले. बंधू सखाराम नाशिक येथेच राहिले. अनियंत्रित रासायनिक शेती पध्दतीचे प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन सेंद्रिय शेती करण्याचा निर्धार केला.

त्यासाठी दोन देशी गायी खरेदी केल्या. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, जाणकार अनुभवी शेतकऱ्यांकडून सेंद्रिय शेतीतील बारकावे जाणून घेतले. माती परिक्षण करून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी उपाययोजनांची माहिती घेतली. दोन बोअर्स घेतले. शेताच्या चारही बाजूने चर खोदले. डाळिंब, लिंबू, मोसंबी लागवड करून चांगले उत्पादन व उत्पन्न घेऊ लागले. टप्प्याटप्प्याने लिंबाच्या दोन ओळींत तसेच सलग पद्धतीने सीताफळ, पेरू लागवड केली. ठिबक आणि तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब केला. फळबागेभोवती कमी खर्चातील सौर कुंपण उभारले.

फळाझाडांची लागवड

 • लिंबू (साई सरबती), मोसंबी (न्युसेलर), सीताफळ (बालानगर, धारूर ६, एनएमके गोल्डन),
 • पेरू (लखनौ ४९-सरदार), आंबा (दशहरी, केसर), आवळा (नरेंद्र ७ , चिकू (कालीपत्ती)
 • जांभूळ व रामफळ. यातील काही फळपिकांची नव्यानेही लागवड केली आहे.

आंतरपिके
फळपिकांमध्ये कोथिंबिरीसह विविध पालेभाज्या, आले, लसूण, कांदा, झेंडूसह विविध फुलांचे उत्पादन घेतात. त्यामुळे दररोज ताजे उत्पन्न मिळते. झेंडूमुळे सूत्रकृमीला अटकाव करता येतो.उग्र वासाच्या मसालवर्गीय पिकांमुळे किडींना पिकापासून लांब ठेवता येते. भाजीपाला पिकांची ही फेरपालट केली जाते.

घरगुती निविष्ठांचा वापर

 • शेण-गोमूत्राचा वापर करून स्लरी, गांडूळखत, व्हर्मीवॉश, जीवामृत, दशपर्णी अर्क आदींची शेतातच निर्मिती
 • सेंद्रिय आच्छादन, धैंचाचा वापर. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास पोषक.
 • बांधावर गिरीपुष्पाची लागवड केली आहे.
 • बैलजोडी नाही. मात्र मशागतीची कामे यंत्राव्दारे.

घरपोच विक्री व्यवस्था

 • सोमेश्वर आणि व पत्नी राधिका दोघेही शेतात राबतात. सकाळी फळे, भाजीपाल्याची काढणी,स्वच्छता व प्रतवारी होते. इलेक्ट्रॉनीक काट्यावर वजन करून प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये पॅकिंग होते.
 • सेलू येथे विक्रीचा छोटा स्टॉल उभारला आहे. व्हॉटस ॲपच्या विविध ग्रुप्सवर मागणी नोंदवून सेलू शहरातील ग्राहकांना फळे- भाजीपाला घरपोच देण्यात येतो. सेंद्रिय शेतमालाचे महत्त्वही ग्राहकांना सांगण्यात येते. परभणी येथील संत शिरोमणी सावता माळी आठवडे बाजार, विकेल ते पिकेल अभियान, रानभाज्या महोत्सव, कृषी प्रदर्शने याठिकाणी स्टॉल उभारतात. लिंबाची सेलू शहरातील हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर विक्री होते.
 • सीताफळ ६० रुपये प्रति किलो दराने तर वजन काट्यावर अडीच किलो वजनाचे पॅकिंग करून १५० रुपये दराने पॅकिंगमधून विक्री होते. मोसंबी ६० रुपये, पेरू आणि आवळा ५० रुपये प्रति किलो दराने विक्री होते. लिंबांना वर्षभरात सरासरी प्रति किलो ३० ते ३५ रुपये दर मिळतात. उन्हाळ्यात हेच दर ५० रुपयांपर्यंत जातात. एकूण फळे, फुले, भाजीपाला विक्रीतून काही लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन

 • सोमेश्वर अन्य शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देत असतात.
 • ‘आत्मा’ अंतर्गत रवळगाव येथे पुढाकारातून सेंद्रिय शेतकरी गटाची स्थापना.
 • गटामार्फत ५० एकरांत सेंद्रिय शेती.
 • भाजीपाला उत्पादक महिला शेतकऱ्यांचे दोन गट व नवनाथ रोपवाटिका स्थापन झाली आहे.

घरच्यांची मदत
गिराम दांपत्याला निकडीवेळी हंगामी मजुरांची मदत घ्यावी लागते. दोन महिलांना नियमित रोजगार दिला आहे. सुट्टीच्या दिवसात मुले शेती कामे व विक्रीसाठी मदत करतात. सोमेश्‍वर यांची मुलगी रोहिणी परभणी येथील कृषी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे. मुलगा हरिश १२ वीला आहे. पुतण्या नवनाथ एम.एस्सी (बॉटनी) आहे तर गोविंद बी.फार्मसी करीत आहे.

सामाजिक कार्यात सहभाग

 • गिराम यांना वृक्षलागवड व संवर्धनाची आवड आहे. बांधावर, गावांत त्यांनी विविध वृक्ष लागवड केली आहे.
 • आई गयाबाई आणि वडील नारायणराव यांच्या स्मरणार्थ शाळेतील चौथी आणि सातवी इयत्तेतील गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी १५ ऑगस्ट व २६ जानेवारीस पुरस्कार दिले जातात.
 • गावात वाचनालय चालवतात. कृषी प्रदर्शने, चर्चासत्रांत सहभाग.
 • तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, ‘आत्मा’चे तालुका व्यवस्थापक शिवराज कदम, कृषी सहाय्यक सुहास धोपटे यांचे मार्गदर्शन.

ॲग्रोवनचे वाचक
सोमेश्वर ॲग्रोवनचे सुरुवातीपासूनचे वाचक आहेत. प्रसिद्ध यशकथांमधील शेतकऱ्यांशी संपर्क करून नवीन प्रयोगाची माहिती ते घेतात. बाजारभावांची माहिती अन्य शेतकऱ्यांना देतात. ॲग्रोवनचा दिवाळी अंकही दरवर्षी आवर्जून खरेदी करतात. शेतीतील ज्ञान आणि माहितीत या दैनिकामुळे अधिक भर पडत असल्याचे ते सांगतात.

संपर्क- सोमेश्वर गिराम-९५६१८३२९५३


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
राज्याला आदर्श ठरणारी जाधवांची अंजीर...पुरंदर तालुक्यातील गुरोळी (जि. पुणे) येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून पोल्ट्री अन...पवनी (जि. अमरावती) येथे शेती असलेल्या संदीप राऊत...
केळी प्रक्रियेतून गटाची आर्थिक प्रगतीशिंदखेडा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील ‘सरस्वती...
दर्जेदार, शास्त्रीय पद्धतीने गांडूळ...माळीवाडगाव (जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी...
राइसमिल’द्वारे शोधला स्वयंरोजगार,...सांगली जिल्ह्यातील मोरेवाडी (शेडगेवाडी) येथील...
एकट्याने नव्हे, इतरांना घेऊन पुढे जाऊ;...एकटा नाही तर इतरांना घेऊन पुढे जाऊ हा विचार टेंभे...
आंब्यासाठी उभारले स्वतःचे रायपनिंग चेंबररत्नागिरी येथील संयुक्त झापडेकर कुटुंब आंबा...
घोळवा परिसर झाला कांद्याचे ‘क्लस्टर’हिंगोली जिल्ह्यातील डोंगराळ भागातील घोळवा (ता....
अन्नप्रक्रिया यंत्रनिर्मितीतील सावंत...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रकाश सावंत...
अधिक ‘कुरकुमीन’ युक्त हळदीचा यशस्वी...पास्टुल (जि. अकोला) येथील संतोष घुगे यांनी आपल्या...
मुक्तसंचार व तंत्रशुध्द पद्धतीने...सातारा जिल्ह्यातील चौधरवाडी येथील हाफीज काझी...
शेतीला मिळाली दुग्ध व्यवसायाची जोडपुण्याच्या पश्‍चिम भागातील मुळशी तालुक्याच्या...
सीताफळाचा ‘कांचन’ ब्रॅण्ड अन्...पंधरा वर्षांपासून सीताफळ लागवडीत हातखंडा, फळाचा...
लाकडी घाण्यावरील तेलाची युवा...कापसेवाडी (जि. सोलापूर) येथील युवा अभियंता संदीप...
नरवाडने जोपासली पानमळ्याची परंपरासांगली जिल्ह्यातील नरवाड हे गाव खाऊच्या पानांसाठी...
एकरी ४० टन सातत्यपूर्ण दर्जेदार केळी...नेवासे (जि. नगर) येथील पठाण कुटुंबाने ऊस पट्ट्यात...
मधमाशीपालनातून मिळाली स्वयंरोजगाराची...उत्तर प्रदेशातील मदारपूर केवली (ता. गोसाईगंज, जि...
प्रयोगशीलतेला दिली तंत्रज्ञानाची जोडप्रयोगशीलता आणि तंत्रज्ञान वापर या दोन बाबी शेतीत...
वडजीत फुलतात वर्षभर गुलाबाचे मळेसोलापूर जिल्ह्यातील वडजी गावशिवारात वर्षभर देशी...
रोपनिर्मिती व्यवसायाने दिला हातभारगळवेवाडी (जि. सांगली) येथील राजाराम गळवे अनेक...