agricultural news in marathi success story Farming from the processing industry became profitable | Page 2 ||| Agrowon

प्रक्रिया उद्योगातून शेती झाली किफायतशीर

विकास जाधव
रविवार, 24 ऑक्टोबर 2021

मानकरवाडी (ता. जावळी, जि. सातारा) येथील संगीता दिलीप मानकर यांनी आवळा, आंबा लागवडीला प्रक्रियेची जोड देत शेती किफायतशीर केली आहे. आवळा कँडी, लोणचे, सरबत उत्पादन करून थेट ग्राहकांना विक्री करण्यावर भर दिला आहे.
 

मानकरवाडी (ता. जावळी, जि. सातारा) येथील संगीता दिलीप मानकर यांनी आवळा, आंबा लागवडीला प्रक्रियेची जोड देत शेती किफायतशीर केली आहे. आवळा कँडी, लोणचे, सरबत उत्पादन करून थेट ग्राहकांना विक्री करण्यावर भर दिला आहे.

जावळी (जि. सातारा) तालुका हा डोंगरी तालुका. पावसाळ्यात अतिपाऊस आणि उन्हाळ्यात पाणीटंचाई अशी टोकाची परिस्थिती असते. या भागामध्ये भात तसेच फळपिकांत आंबा, स्ट्रॅाबेरी, आवळा लागवड वाढत आहे. या तालुक्यातील मानकरवाडी हे सुमारे एक हजार लोकसंख्येचे गाव. या गावात पोलिस निरीक्षक दिलीप दौलती मानकर आणि संगीता दिलीप मानकर हे दांपत्य राहते. दिलीप मानकर हे पोलिस खात्यामध्ये असल्याने त्यांचा नोकरीचा कालावधी बहुतांश मुंबई शहरामध्ये गेला. या कुटुंबाची मानकरवाडीमध्ये पाच एकर शेतजमीन असून बहुतांशी डोंगराळ क्षेत्र आहे. दिलीप मानकर यांनी सेवानिवृत्तीनंतर शेती करायची ही खूणगाठ बांधली असल्याने २००२ पासून शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे लावण्यास सुरुवात केली. सध्या पाच एकरात २५० केसर, नीलम आंबा कलमे आणि २०० आवळा कलमांची लागवड आहे. आवळा, आंबा फळ उत्पादनाला सुरुवात झाल्यावर स्थानिक बाजारपेठेत विक्री केली जात होती. मात्र अपेक्षित दर नसल्याने किफायतशीर उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले.

फळप्रक्रिया उद्योगाला सुरुवात 
फळ प्रक्रियेबाबत संगीता मानकर म्हणाल्या, की दरवर्षी आम्हाला बागेतून दीड ते दोन टन आवळा मिळतो. परंतु बाजारपेठेत याला दर फारच कमी मिळत होता. या दरम्यान दैनिक ‘अॅग्रोवन’मधील आवळा कॅण्डी प्रक्रियेबाबतची यशोगाथा आणि तांत्रिक माहिती वाचण्यात आली. बाजारपेठेचा अभ्यासकरून आम्ही आवळा कॅण्डी निर्मितीला सुरुवात केली. पहिल्या टप्यात मित्र परिवारास ही कॅण्डी देऊ लागलो. दर्जा आणि चवीमुळे कॅण्डीला मागणी वाढू लागली. हळूहळू प्रक्रिया उद्योगाला गती मिळाली.

बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन आम्ही आवळा कॅण्डी, लोणचे, सिरप निर्मितीला सुरुवात केली. प्रक्रिया व्यवसायाच्या दृष्टीने परवाना घेतला आहे. मागील वर्षापासून प्रक्रिया उद्योगाचा विस्तार केला असून वर्षाकाठी एक टन फळांवर प्रक्रिया केली जाते. यंदाच्या मे महिन्यापासून आवळा पावडरनिर्मितीला सुरुवात केली आहे. यासाठी आवश्यक प्रक्रिया यंत्राची खरेदी केली आहे. सध्या आवळा कॅण्डी १०० ग्रॅम ६० रुपये, २०० ग्रॅम ११० रुपये, आवळा लोणचे ४०० ग्रॅम १२० रुपये, आवळा सिरप ५०० मिलि १०० रुपये, तसेच आवळा पावडर १०० ग्रॅम प्रति १०० रुपये दराने विक्री केली जाते.

बागेचे योग्य व्यवस्थापन 
आवळा आणि आंबा कलमांचे व्यवस्थापन करण्यासाठी संगीताताईंना विशेष परिश्रम घ्यावे लागले आहे. पाच एकर फळबागेला पाणी पुरवठ्यासाठी विहीर आणि कूपनलिका आहे. संपूर्ण फळबागेला ठिबक सिंचन केले आहे. काही वर्षांपूर्वी मुलांचे शिक्षण आणि पतीची नोकरी सुरू असताना त्यांनी बागेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वतःकडे घेतली. महिन्यातून चार ते पाच वेळा मुंबईतून गावी येऊन स्थानिक मजुरांच्या साहाय्याने बागेचे व्यवस्थापन आणि पुढील नियोजन केले जाते. आता पोलिस खात्यामधून पती निवृत्त झाल्यामुळे संगीताताई मुलाचे शिक्षण आणि बागेच्या व्यवस्थापनासाठी गावी स्थायिक झाल्या आहेत. पती मुलींच्या शिक्षणासाठी मुंबईत आहेत.

मिळाली कुटुंबाची साथ ...
फळबागेच्या व्यवस्थापनाबाबत संगीताताई म्हणाल्या, की बागेच्या व्यवस्थापनात पती तसेच कुटुंबातील सदस्यांची चांगली मदत होते. मी प्रक्रिया उद्योगावर भर दिला आहे. उत्पादनांच्या विक्रीचे नियोजन माझे पती पाहतात. गेल्या वर्षी पती पोलिस निरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाल्यामुळे मी पूर्णवेळ शेती आणि प्रक्रिया उद्योगावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये भविष्यात वाढ करणार आहे. गेल्या वर्षीपासून आंब्याचे उत्पादन चांगल्या पद्धतीने सुरू झाले. गतवर्षी गाडी करून पाचगणी, महाबळेश्‍वर परिसरात तसेच मुंबईत थेट ग्राहकांना आम्ही आंबा विक्री केली. गतवर्षी दीड लाखांपर्यंत आंबा विक्रीतून उलाढाल झाली. आवळा बागेच्या व्यवस्थापनासाठी कृषी अधिकारी श्री. इंगळे, श्री. देशमुख, ज्ञानदेव जाधव तसेच आंबा व्यवस्थापनात बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भूषण यादगीरवार यांचे मार्गदर्शन मिळते.

व्यवसायातील बारकावे 

  • सेंद्रिय पद्धतीने फळबागेचे व्यवस्थापन.बागेत लेंडीखतासाठी शेळ्या बसविल्या जातात.
  • बागेच्या स्वच्छतेवर भर.
  • उत्पादित सर्व आवळ्यावर प्रक्रिया.
  • चव तसेच आकर्षक पॅकिंगवर विशेष लक्ष.
  • आवळा उत्पादनाची थेट ग्राहकांना विक्री.

संपर्क ः संगीता मानकर, ९०८२०६६८९३


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
जातिवंत जनावरांसाठी दर्यापूरचा बाजारअमरावती जिल्ह्यात दर्यापूर येथील जनावरांचा बाजार...
‘त्रिवेणी नॅचरल गुळाला’ राज्यभर बाजारपेठपरभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील डॉ.मोहनराव देशमुख...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या...
बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ...पुणे : अंदमान समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र...
कापसाचे दर काहीसे स्थिरावलेपुणे ः वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बाजारात...
मुसळधार पावसाने दाणादाण पुणे ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने कोकण, पश्‍चिम...
फळपीक विमा योजनेवर बहिष्काराचा निर्णयअमरावती ः आंबिया बहर फळपीक विमा योजनेच्या...
द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्याने...नाशिक : प्रतिकूल परिस्थितीत प्रयोगशीलतेने...
देशांतर्गत बाजारात साखर विक्रीचे आव्हानकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कमी...
ऊस वाहतूकदरासाठी हवाई अंतराचा निकष लावापुणे ः दोन साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा...
कोल्हापुरात ऊसतोडणी थांबलीकोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
जलसंधारणाचा ‘हायवे’ पॅटर्नलातूर ः मराठवाड्यात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन...
जलसंधारण, शाश्‍वत तंत्राद्वारे...मान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) या गावासह...
कापूस उत्पादकांचा बळी नकोकापसाचे दर वाढल्यामुळे कापूस प्रक्रिया...
सोयाबीन, कापसावर संसदेत चर्चा व्हावीसोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची...
रब्बी पिकांसह फळबागांना फटकापुणे ः राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण...
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही...
ऊस वाहतूक दरासाठी टप्पा पद्धतीला...पुणे ः उसाची तोडणी व वाहतूक दर ठरवताना आधीची...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची सरकारकडे...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या...