agricultural news in marathi success story hafij kazi from satara district made dairy business profitable | Agrowon

मुक्तसंचार व तंत्रशुध्द पद्धतीने दुग्धव्यवसायात प्रगती

विकास जाधव
मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021

सातारा जिल्ह्यातील चौधरवाडी येथील हाफीज काझी यांनी शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला. तांत्रिक मार्गदर्शन, त्याद्वारे शास्त्रीय व्यवस्थापन व कुटुंबातील सर्वांची साथ यातून हा प्रमुख व्यवसाय झाला आहे. 

सातारा जिल्ह्यातील चौधरवाडी येथील हाफीज काझी यांनी शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला. तांत्रिक मार्गदर्शन, त्याद्वारे शास्त्रीय व्यवस्थापन व कुटुंबातील सर्वांची साथ यातून हा प्रमुख व्यवसाय झाला आहे. गोठ्यातच अधिकाधिक पैदास, भाकड गाईवर विशेष मेहनत घेऊन त्यांना दुभत्या करणे याद्वारे व्यवसाय किफायतशीर करण्याचा प्रयत्न केला आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्यात गा ‘गोविंद मिल्क’ द्वारे शास्त्रीय पद्धतीने गोसंगोपनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुक्तंसचार गोठे तयार झाले आहेत. तालुक्यातील चौधरवाडी येथील हाफीज हसन काझी यांची तीस एकर शेती आहे. यात सर्वाधिक ऊस पिकासह सोयाबीन, हरभरा, मका आदी पिके घेतली जातात. हाफीज यांचे चार भावांचे कुटुंब असून यापैकी अनिष, असिफ हे बंधू नोकरी व व्यवसाय करतात. नफीज हे दोन क्रमांकाचे  बंधू हाफीज यांना शेती व दुग्ध व्यवसायास मदत करतात. 

मुक्तसंचार गोठा पध्दत
हाफीज यांनी बारावी शिक्षण पूर्ण झाल्यावर शेती करण्यास सुरवात केली. ऊस हे प्रमुख पीक होते. शेणखतासाठी वडिलोपार्जित चार गायींचे संगोपन केले जायचे. दरम्यानच्या काळात गोसंगोपन व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी मुक्तसंचार गोठा पध्दत व संबंधित कार्यक्रम हाफीज यांना भावला. सन २०१२ मध्ये घराशेजारी बंदिस्त असलेल्या गोठ्याच्या बाजूलाच मोकळ्या जागेत मुक्तसंचार गोठ्याची उभारणी सुरू केली. ८० बाय ८० फूट क्षेत्रफळात त्याची उभारणीही केली. पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. गोठ्यात जमिनीवर पाचट, सोयाबीन भुस्सा यांचा वापर केला जातो. दिवसभर गायी मोकळ्या वातावरणात सोडल्या जातात. दुभत्या गाई, कालवडी व भाकड गायी अशी स्वतंत्र शेडस उभारली आहेत. यामुळे गायींची स्वतंत्रपणे व विशेष काळजी घेणे शक्य होते. पावसाळ्याच्या काळात गाई बंदिस्त ठेवण्यावर भर दिला जातो. सध्या लहान- मोठ्या मिळून एचएफ संकरित जातीच्या २५ पर्यंत गायी आहेत. 

गायी केल्या दुभत्या
हाफीज यांनी २०१७ मध्ये चार भाकड गायी ८० हजार रुपये देऊन खरेदी केल्या. त्यांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केले. दर्जेदार ‘सिमेन’ चा वापर केला. चारा, पाणी, औषधोपचारांची काळजी घेतली. त्यातून गाई गाभण होण्यास मदत झाली. त्यांची प्रति दिन क्षमता २५ ते ३० लिटरपर्यंत झाल्याचे हाफीज सांगतात. 

जातिवंत जातीवर भर 
कमी खर्चात दुग्ध व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर गोठ्यात दर्जेदार व जातिवंत गायी तयार होणे गरजेचे असल्याचे हाफीज सांगतात. पंचवीस पैकी अवघ्या आठ गायींची बाहेरून खरेदी केली. बाकी पैदास गोठ्यातच केल्याचे त्यांनी सांगितले. गोठ्यातील जास्त दूध देणाऱ्या गाईंपासून मिळणाऱ्या कालवडी लवकरात लवकर दुभत्या केल्या जातात. यासाठी कालवडीचा जन्म झाल्यावर महिनाभर तिच्या वजनाच्या दहा टक्के दूध दिले जाते. एक महिन्यानंतर ‘मिल्क रिप्लेसर’ व दुधाचे मिश्रण करून दिवसाकाठी सहा लिटर दिले जाते. मिनरल मिक्सर, कॅल्शिअम, जंताची औषधे यांच्या योग्य मात्रा दिल्या जातात. साधारणपणे दहा महिन्यात कालवडीचे वजन ३३० किलोपर्यंत नेले जाते. त्यानंतर ती गाभण राहून १८ ते २० महिन्यात दूध सुरू होते. काझी यांच्याकडील पैलारू कालवडीने प्रति दिन २५, ३० ते ३५ लिटरपर्यंत दूध दिले आहे.  व्यवसायात डॉ. शांताराम गायकवाड, गणेश चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी डॅा. रावसाहेब पताळे, डॅा. नीलेश निंबाळकर यांचे मार्गदर्शन होते. 

दुग्ध व्यवसायातील बारकावे

  • चाऱ्यावरील खर्च कमी करण्यासाठी बहुतांशी हिरवा व सुका चाऱ्या स्वतःच्या शेतातच तयार केला जातो.
  • मुक्तसंचार गोठ्यामुळे २५ गायींचे संगोपन अवघ्या दोन ते तीन व्यक्तींमध्ये करणे सोपे होते. 
  • पौष्टिक चाऱ्यासाठी वर्षाकाठी दहा ते ११ टन प्रमाणात बॅगेत मूरघास तयार केले जाते. वर्षभर उत्पादन सुरू राहण्याच्या दृष्टीने गाभण गायींचे विशेष नियोजन केले. 
  • दर्जेदार वाण खरेदी करण्यावर भर असतो.  मोठ्या प्रमाणात शेणखत मिळत असल्याने रासायनिक खतांवरील ४० टक्के खर्चात बचत झाली.
  • दर्जेदार शेणखताची जोड मिळाल्याने व्यवस्थापन सुधारून उसाचे एकरी उत्पादन ६० ते ७० टक्के मिळू लागले.  

अर्थकारण 
साधारणपणे जानेवारी ते जुलै या काळात प्रति दिन ४५० लिटरपर्यंत तर अन्य कालावधीत २६० ते २७० लिटरपर्यंत दूध संकलन होते. प्रतिदिन सरासरी संकलन ३०० लिटरपर्यंत आहे. फॅटनुसार २५ ते २७ रुपये प्रति लिटर दर मिळतो. चारा, वीज, पाणी, पशुखाद्य, मिनरल मिक्सर, कॅल्शिअम, मजुरी, औषधोपचार आदींसाठी होणारा खर्च वगळून २० ते ३० टक्के फायदा होतो. महिन्याला सुमारे पाच ट्रेलरपर्यंत शेणखत मिळते. 

- हाफीज काझी  ९९७५२४६४१२ 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शास्त्रीय पशुपालनातून मिळवले आर्थिक...कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे (ता. हातकणंगले)...
भाजीपाला,पूरक उद्योगातून महिलांची आघाडीमिरजोळी(ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) गावातील उपक्रमशील...
शेत ते बाजारपेठेपर्यंत युवकांची ‘...नाशिक येथील संगणक अभियंता अक्षय दीक्षित व...
सुपारीची पाने, करवंटीपासून पर्यावरणपूरक...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता.वेंगुर्ला) येथील...
निसर्ग- वृक्षसंपदेचे वैभव जपलेले गमेवाडीनिसर्गाच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गमेवाडी...
इथे नांदते गोकूळ सौख्याचे...कोल्हापूर जिल्ह्यातील नूल (ता. गडहिंग्लज) येथील...
सीताफळाने दिला शेतकऱ्यांना आधारऑगस्ट ते डिसेंबर कालावधीपर्यंत सातत्याने मागणी...
फळबागांसाठी पॅकहाउस ठरले फायदेशीरआळंदी म्हातोबा येथील प्रकाश जवळकर यांनी फळबाग...
वेळ, मजुरी, कष्टात बचत करणारी यंत्रे;...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘...
राज्याला आदर्श ठरणारी जाधवांची अंजीर...पुरंदर तालुक्यातील गुरोळी (जि. पुणे) येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून पोल्ट्री अन...पवनी (जि. अमरावती) येथे शेती असलेल्या संदीप राऊत...
केळी प्रक्रियेतून गटाची आर्थिक प्रगतीशिंदखेडा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील ‘सरस्वती...
दर्जेदार, शास्त्रीय पद्धतीने गांडूळ...माळीवाडगाव (जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी...
राइसमिल’द्वारे शोधला स्वयंरोजगार,...सांगली जिल्ह्यातील मोरेवाडी (शेडगेवाडी) येथील...
एकट्याने नव्हे, इतरांना घेऊन पुढे जाऊ;...एकटा नाही तर इतरांना घेऊन पुढे जाऊ हा विचार टेंभे...
आंब्यासाठी उभारले स्वतःचे रायपनिंग चेंबररत्नागिरी येथील संयुक्त झापडेकर कुटुंब आंबा...
घोळवा परिसर झाला कांद्याचे ‘क्लस्टर’हिंगोली जिल्ह्यातील डोंगराळ भागातील घोळवा (ता....
अन्नप्रक्रिया यंत्रनिर्मितीतील सावंत...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रकाश सावंत...
अधिक ‘कुरकुमीन’ युक्त हळदीचा यशस्वी...पास्टुल (जि. अकोला) येथील संतोष घुगे यांनी आपल्या...
मुक्तसंचार व तंत्रशुध्द पद्धतीने...सातारा जिल्ह्यातील चौधरवाडी येथील हाफीज काझी...