शेळी, कुक्कुटपालनाचे बर्वेंचे आदर्श मॉडेल

माडसांगवी (ता.जि. नाशिक) येथील बापू बर्वे यांनी विविध जातींचे शेळीपालन, लेअर पक्ष्यांचा पोल्ट्री फार्म, बोअर जातीच्या शेळीचे संवर्धन व श्‍वानपालन असे विविध पूरक व्यवसाय अत्यंत कौशल्याने व शास्त्रीय पद्धतीने हाताळून यशस्वी केले आहेत. कष्ट, संघर्ष, चिकाटी, प्रयत्न व प्रसंगी नुकसान व जोखीम सोसून नोकरी सांभाळत शेतीचे अर्थकारण भक्कम केले आहे.
Raising of Sirohi and Kota goats and a poultry shed with a capacity of 3,000 birds.
Raising of Sirohi and Kota goats and a poultry shed with a capacity of 3,000 birds.

माडसांगवी (ता.जि. नाशिक) येथील बापू बर्वे यांनी विविध जातींचे शेळीपालन, लेअर पक्ष्यांचा पोल्ट्री फार्म, बोअर जातीच्या शेळीचे संवर्धन व श्‍वानपालन असे विविध पूरक व्यवसाय अत्यंत कौशल्याने व शास्त्रीय पद्धतीने हाताळून यशस्वी केले आहेत. कष्ट, संघर्ष, चिकाटी, प्रयत्न व प्रसंगी नुकसान व जोखीम सोसून नोकरी सांभाळत शेतीचे अर्थकारण भक्कम केले आहे. माडसांगवी (ता.जि. नाशिक) येथील बापू बर्वे यांचे बारावी इयत्तेत असताना वडील वारले. पुढे वाणिज्य शाखेतील पदवी पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतात रोजंदारी करण्याची वेळ आली. पदवीनंतर जिद्दीने शैक्षणिक कर्ज काढून काढून ‘एमबीए’ची पदवी घेतली. आज ते औषधनिर्मिती कंपनीत विपणन विभागात नोकरी करीत आहेत. ती सांभाळून विविध शेतीपूरक व्यवसायही कौशल्याने हाताळत आहेत. लहानपणापासूनच त्यांना जनावरांचा लळा होता. आज त्याचाच उपयोग व्यवसायात होत आहे. संकटांनी शिकवले, उभे केले

  • सुरुवातीला (सन २०१६) उसनवार, सोने गहाण ठेऊन २ लाख ६३ हजार रुपये उभे करून २० उस्मानाबादी शेळ्या खरेदी केल्या. अनुभव नसल्याने दीड लाख रुपयांचा तोटा झाला. पण घरच्यांची पाठबळ देत बापू यांना नव्या उमेदीने उभे केले. मार्च २०१७ मध्ये ‘उस्मानाबादी’ ऐवजी राजस्थान येथून एक लाख १३ हजार किमतींचे प्रत्येकी ५ सिरोही बोकड व शेळ्या खरेदी केल्या. अभ्यास, चिकाटी व व्यवस्थापन सुधारून व्यवसायात जम बसू लागला. खरेदी, संगोपन व विक्री असे काम सुरू केले. ४५ शेळ्या खरेदी केल्या. पैकी पीपीआर रोगाच्या संसर्गामुळे २३ दगावल्या. पुन्हा हे नुकसान सोसल्यानंतर मागील धड्यांमधून शिकत शास्त्रीय व व्यावसायिक पद्धतीने नव्या सुधारणा केल्या.
  • आता काही वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर व्यवसाय विस्तारला आहे. राजस्थानातील मूळ अधिवास असलेल्या सिरोही व कोटा जातीच्या शेळ्यांची खरेदी बालाहारी व अजमेर भागातून होते.
  • ‘लकी गोट फार्म’ बर्वे कुटुंबात ‘लकी’ नावाचे पाळीव श्‍वान होते. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘लकी गोट फार्म’ असे नामकरण केले आहे. व्यावसायिक कौशल्यातून ग्राहक साखळी जोडल्याने राज्यभरातील शेतकरी बर्वे यांच्याकडून शेळ्या खरेदी करतात. अर्धबंदिस्त पद्धत, लसीकरण, एक एकरात चारा, त्यात दशरथ, मेथी घास, शेवरी, तुती आहे. मका, तूर, मसूर, सोयाबीन भुसा यांची साठवणूक होते. आई शांताबाई, भाऊ किरण व भाचा आकाश मदत करतात. व्यवसाय- ठळक बाबी

  • शेळ्यांची खरेदी- विक्री काळ ऑक्टोबर ते मार्च
  • मासिक शेळ्यांची विक्री- सुमारे १५० ते २००.
  • सरासरी विक्री दर- प्रति किलो ३३० ते ३५० रु.
  • वार्षिक उलाढाल- दोन कोटी रु.
  • लेअर पक्ष्यांचा फार्म

  • शेळीपालनात मे ते ऑक्टोबर काळात शेळ्यांची मागणी मंदावते. त्यामुळे जोडीला २०१८ मध्ये २३ लाखांची गुंतवणूक करून तीन हजार क्षमतेचे पक्षिगृह उभारले. पुढे पक्ष्यांच्या मरतुकीने डोके वर काढले.
  • औषधे, लसीकरण, खाद्य वितरण या अनुषंगाने बदल केले. बाहेरील खाद्य बंद करून खाद्यनिर्मितीत स्वयंपूर्णता आणली. मरतुक कमी होऊन अंड्यांची गुणवत्ताही वाढली. अभ्यास करून समस्यांवर उपाय शोधणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शास्त्रीय पद्धतीचा दृष्टिकोन या जमेच्या बाजू ठरल्या.
  • सध्या महिन्याला ९० हजारांपर्यंत अंड्यांचे उत्पादन होते. वार्षिक प्रतिपक्षी अंडी उत्पादन क्षमता २४५ आहे.
  • व्यवसायातील प्रमुख बाबी 

  • पाणी पिण्यासाठी ‘सेमी ऑटोमेशन’
  • दैनंदिन कामकाज नोंदी
  • औषधांचे वार्षिक वेळापत्रक.
  • पक्षिगृहांची स्वच्छता, पाणी निर्जंतुकीकरण व दुर्गंधीमुक्त परिसर
  • स्वयंचलित प्रकाश व्यवस्था
  • तापमान नियंत्रणासाठी स्वयंचलित फवारे, शेडलगत झाडे लागवड
  • संपूर्ण क्षेत्रावर देखरेखीसाठी २४ सीसीटीव्ही कॅमेरे.
  • सुरुवातीला पक्ष्यांच्या वाढीच्या अवस्थेत १३० ग्रॅम. सकाळी ९ व सायं ४ वाजता प्रति पक्षी ५५ ग्रॅम खाद्यवितरण. सुरुवातीच्या काळात गुळपाणी देण्यासह वजनवाढीसाठी खाद्यात सोयाबीन.
  • स्वच्छ पाणी, संतुलित खाद्य व वेळेवर लसीकरण हे सूत्र.
  • दर सहा महिन्यांनी कोंबडी खताची प्रतिकिलो २.५ ते ३ रुपये दराने विक्री. वर्षभरात दीड लाख रुपयांची खतविक्री. परिसरातील शेतकरी आगाऊ मागणी नोंदवितात.
  • ‘बोअर’ शेळ्यांचे संगोपन बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन दोन वर्षांपासून आफ्रिकन ‘बोअर’ जातींच्या शेळ्यांचे संगोपन सुरी आहे. शुद्ध व निरोगी वंशावळ, चारा-पाणी व आरोग्याचे चोख व्यवस्थापन व सोशल मीडियाद्वारे मार्केटिंगमुळे बाजारपेठ मिळविली आहे. प्रति महिन्याला ६ ते ७ किलो वजनवाढ होते. त्यामुळे शेळ्यांना मागणी आहे. चार शेळ्यांची अलीकडेच नगर व जालना जिल्ह्यांतील शेळीपालकांना प्रत्येकी १ लाख ११ रुपये दराप्रमाणे विक्री केली आहे. सध्या पैदास कार्यक्रमासाठी १० शेळ्या आहेत. श्‍वानसंगोपन शहरातील नागरिकांकडून परदेशी जातीच्या कुत्र्यांना मागणी असते. हे लक्षात घेऊन लॅब्रॅडॉर व जर्मन शेफर्ड यांचे पालन केले जात आहे. दोन वर्षांत १५ ते १८ हजार रुपयांप्रमाणे १९ पिलांची विक्री केली आहे. शहरातील पाळीव पशुप्रेमींची मागणी बघता पर्शियन जातीच्या मांजरीचे संगोपन व विक्रीही सुरू केली आहे. ससेपालन, बदकपालनही होते. संपर्क : बापू बर्वे- ९८२२४४५९९६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com