agricultural news in marathi success story of Kalgonda Tele kolhapur district doing Improved, use of hybrid varieties, proper management of paddy cultivation | Page 3 ||| Agrowon

भातशेतीत राज्यात टिकवला क्रमांक

राजकुमार चौगुले
मंगळवार, 8 जून 2021

सुधारित, संकरित वाणांचा वापर, सुयोग्य व्यवस्थापनातून सुळकुड (जि. कोल्हापूर) येथील कलगोंडा मलगोंडा टेळे यांनी भाताची एकरी ४० क्विंटलची उत्पादकता राखली आहे.  

सुधारित, संकरित वाणांचा वापर, सुयोग्य व्यवस्थापनातून सुळकुड (जि. कोल्हापूर) येथील कलगोंडा मलगोंडा टेळे यांनी भाताची एकरी ४० क्विंटलची उत्पादकता राखली आहे. राज्यातील पीक स्पर्धेत मागील वर्षी पहिला व अलीकडील वर्षात तिसऱ्या व दुसऱ्या क्रमांकात त्यांनी स्थान टिकवले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ तालुके प्रामुख्याने भात उत्पादक पट्टे आहेत. कागल तालुका पावसाच्या दृष्टीने मध्यम स्वरूपाचा आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता पाणी उपलब्ध असेल तर भात घेतात. सुळकुड गावही याच पट्ट्यात मोडते. येथील कलगोंडा मलगोंडा टेळे यांची चार एकर शेती आहे. भात व ऊस ही मुख्य पिके तर काही प्रमाणात भाजीपाला शेती
आहे.

सुधारित भातशेतीची दिशा
तुकड्या-तुकड्याचे क्षेत्र असल्याने टेळे थोड्या- थोड्या क्षेत्रात भात घेतात. पन्नास टक्के काळी तर पन्नास टक्के मुरमाड जमीन आहे. सन २०११ पर्यंत हे कुटुंब पेरणी पद्धतीने भात करायचे. सन २०११ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू झाली. त्या अंतर्गत वीस आठवड्यांची शेतीशाळा झाली. सुधारित भातशेतीची दिशा त्यातून टेळे यांना मिळाली. पेरणी पद्धतीपेक्षा टोकण पद्धत अवलंबली. पाण्याची सोय असल्याने रोहिणी नक्षत्रावरच भात घेतला जातो. कृषी विभागाच्या सल्ल्याने २०११ नंतर तांत्रिक बदल करण्यास सुरुवात केली.

पीक व्यवस्थापनातील बाबी

 • खासगी कंपन्यांचे संकरित वाण तर इंद्रायणीसारख्या सुधारित वाणांचाही वापर.
 • शेती नदी परिसर व माळ अशा ठिकाणी. नदीचे पाणी येणाऱ्या ठिकाणी संकरित तर अन्य ठिकाणी इंद्रायणी भात घेतला जातो. संकरित वाण पाण्याला तुलनेने सहनशील असल्याचा अनुभव.
 • उसाचा खोडवा तुटल्यानंतर जमीन नांगरून घेतली जाते. त्यानंतर दोन दिवस उन्हात तापवली जाते. रोटाव्हेटरच्या साह्याने भुसभुशीत केली जाते.
 • दर तीन वर्षांनी एकरी आठ ट्रॉली शेणखत मिसळले जाते. सारटे तयार करून घेतले जातात.
 • एकूण पीक कालावधीचा एकरी ‘एनपीके’ डोस अभ्यासला जातो. त्यानुसार बेसल डोस.
 • यात एकरी १०-२६-२६ हे १०० किलो, निंबोळी पेंड शंभर किलो, करंज पेंड ५० किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये ५० किलो वापर. पेरणीनंतर ३०, ६५ व ९० दिवसांनी पुढील मात्रा. त्यानंतर पाणी देऊन जमीन भिजवली जाते.
 • तिसऱ्या व चौथ्या दिवशी वाफसा आल्यानंतर रेघा मारून सऱ्या पाडल्या जातात.
 • बीजप्रक्रिया- प्रति दहा लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मोठे मीठ घालून द्रावण तयार करतात. त्यात बियाणे टाकले जाते. तरंगणारे वेगळे केले जाते. दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुतले जाते. प्रति किलो दोन ते अडीच ग्रॅम थायरम किंवा कार्बेन्डाझीम अशी प्रक्रिया होते.
 • पीएसीबी जिवाणू संवर्धकाचीही प्रक्रिया.
 • टोकण ९ बाय ९ इंचावर. सारटे तयार करताना रुंदी २८ इंच.
 • संकरित असल्यास तीन ते चार बिया तर सुधारित- सहा ते सात बिया पद्धतीने टोकण. संकरित वाणाला फुटवे जास्त असल्याने बियांचे प्रमाण कमी असल्याचे टेळे सांगतात.
 • रोपांची संख्या मर्यादित ठेवतात. न उगवलेल्या ठिकाणी खाडे भरणे तर जादा उगवलेल्या ठिकाणी विरळणी.
 • सुमारे ४५ दिवसांनी एक याप्रमाणे (अर्थात गरजेनुसार) कीटकनाशकांच्या तीन फवारण्या.
 • संकरित वाण १३० ते १५० दिवसांनी तर सुधारित वाण १२० ते १३० दिवसांनी काढणीस येते.

उत्पादकतेत सातत्य
पारंपरिक पद्धतीत एकरी उत्पादन २५ क्विंटलपर्यंत मिळायचे. आता वाणप्रकारानुसार एकरी ४० क्विंटल ते ४५ ते ५५ क्विंटलपर्यंत पोहोचल्याचे टेळे सांगतात.

पुरस्कार

 • कृषी विभागातर्फे पीक स्पर्धेत मागील वर्षी प्रति १० गुंठ्यांत ११५० किलो उत्पादन घेत राज्यात पहिला क्रमांक.
 • सन २०१९ मध्ये तिसरा, २०१८- दुसरा व १०१६ मध्ये तिसरा क्रमांक पटकावला.

विक्री नियोजन
न भरडता (भात स्वरूपात) व भरडून (तांदूळ स्वरूपात) अशा दोन्ही प्रकारे विक्री करतात. अनेक शेतकरी भात स्वरूपात विकत घेतात. त्याचे कारण तो बराच काळ टिकून राहतो. त्यात किडे होत नाहीत. त्याचा दर साधारणतः २६०० रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान असतो. संकरित वाणाचा तांदूळ ३५ रुपये प्रति किलो दराने तर इंद्रायणी ४५ रुपये दराने विकण्यात येतो.

कृषी विस्तारात अग्रेसर
भातशेतीत नाव मिळाल्याने टेळे यांचा कृषी विभाग, तज्ज्ञ व कृषी विज्ञान केंद्रांशी चांगला संपर्क तयार झाला आहे. त्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. ‘रामेती’ द्वारेही त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. बसवेश्वर कृषी विज्ञान मंडळाचे त्यांचे ‘नेटवर्क’ आहे. त्यात २५ शेतकऱ्यांचा सहभाग आहे. मंडळाच्या माध्यमातून पॉवर टिलर व निविष्ठा नाममात्र भाडेतत्त्वावर देण्यात येतात. त्यासाठी टेळे सक्रिय असतात.

ऊसशेती

 • वडील मलगोंडा व भाऊ संतोष यांच्यासह एकत्रित कुटुंब
 • आडसाली उसाचे एकरी सरासरी उत्पादन ८० टन. मागील वर्षी ९६ टन.
 • खोडवा- ६० टन.

संपर्क ः कलगोंडा टेळे, ९३७२८९०८४५


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पोल्ट्री व्यवसायातून कुटुंब झाले आर्थिक...फळबागायती आणि भातशेती सामायीक. त्यामुळे मालगुंड (...
श्रीराम गटाचे पावडरीद्वारे हळदीचे...लाख (रयाजी) (ता. दिग्रस, जि. यवतमाळ) येथील...
पीक नियोजनातून बसविले आर्थिक गणितपुणे जिल्ह्यातील केंदूर (ता. शिरूर) येथील संदीप...
प्रतिकूल परिस्थितीवर सुनंदाताईंनी केली...माणूस संकटाच्या काळात धीर सोडत असला तरी त्या...
औषधी वनस्पती प्रयोगासाठी ‘शेवंतामाता’...नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातील निवघा बाजार...
पदवीधर तरूणाचा ‘काकतकर’ ब्रँडसिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्हावेली रेवटेवाडी येथील...
पोल्ट्री उद्योगात विट्याची दमदार ओळखसांगली जिल्ह्यातील विटा शहराची ओळख...
कमी खर्चिक किफायतशीर कापूस पीक...घाडवेल (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील देवेंद्र...
तंत्रज्ञान, व्यवस्थापनासह टोमॅटो...नाशिक जिल्ह्यातील दरी येथील सतीश, सचिन व नितीन या...
लागवड ते काढणी- शेती केली यांत्रिकीहिंगोली जिल्ह्यातील साखरा (ता. सेनगाव) येथील तरुण...
अल्पभूधारकाचा उत्कृष्ट दुग्ध व्यवस्थापन...शेती केवळ दोन एकर. पण मार्गदर्शन, अभ्यास व...
सर्वोत्तम क्वालिटी जपलेली बहुविध...आयुर्वेदिक डॉक्टर असलेले सुयोग कुलकर्णी यांनी...
पूरक व्यवसायातून शेती केली सक्षममसई (ता.अंबड, जि. जालना) येथील योगिता ज्ञानेश्‍वर...
दुग्धजन्य प्रक्रिया उद्योगातून प्रगतीची...भिलवडी-माळवाडी (ता. पलूस, जि. सांगली) येथील...
सुधारित तंत्राद्वारे हळदीच्या किफायतशीर...सातारा जिल्ह्यात हळद हे प्रमुख नगदी पीक आहे....
गुणवत्तेच्या जोरावर कोकण राजा लोकप्रिय...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील उदय प्रभूशिरोडकर...
फुलशेतीत शिरसोलीने तयार केली ओळखशिरसोली (ता.जि. जळगाव) गावाने खानदेशात फुलशेतीत...
तांत्रिक मार्गदर्शनातून घडली संत्रा...सुमारे २० वर्षे वाहनचालक म्हणून राजेश बोरकर (रा....
खचून काय करणार? शिवार पुन्हा करू...कोल्हापूर जिल्हा नुकत्याच येऊन गेलेल्या...
अशोक कोळपे ठरतेय शेतकऱ्यांना उपयोगीशेतीत मजूर ही सर्वात मोठी समस्या ठरत असून...