agricultural news in marathi success story of Kalmuste village from nagar district doing Crop diversity, progress from tourism to prosperity | Agrowon

पीक विविधता, पर्यटनातून कळमुस्ते प्रगतीच्या वाटेवर

शांताराम काळे
शुक्रवार, 26 मार्च 2021

कळमुस्ते (जि. नगर, ता, अकोले) गावात शेती पद्धतीत बदल होऊ लागला आहे. सामाजिक संस्थेचे सहकार्य मिळून गावचा विकास साधला जात आहे. खरिपासोबत रब्बी हंगाम साधून पीक विविधता, पर्यटन केंद्र व्यवसाय व अर्थकारणाला चालना मिळाली आहे.
 

कळमुस्ते (जि. नगर, ता, अकोले) गावात शेती पद्धतीत बदल होऊ लागला आहे. सामाजिक संस्थेचे सहकार्य मिळून गावचा विकास साधला जात आहे. खरिपासोबत रब्बी हंगाम साधून पीक विविधता, पर्यटन केंद्र व्यवसाय व अर्थकारणाला चालना मिळाली आहे.

नगर जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेले कळमुस्ते गाव निसर्गसंपन्न असून जंगल व डोंगराने वेढलेले आहे. साहसी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करणारा हरिहर किल्ला, हिरवाईने नटलेला बाजगड आणि अनोखे निसर्गशिल्प असलेला दुगारवाडी धबधबा याच ठिकाणी आहे. ग्रामपंचायतीच्या अंतर्गत दुर्गम असणाऱ्या पाच वाड्या येतात. पावसाळ्यात अतिपावसाच्या पार्श्वभूमीवर भातशेती व जोडीने नाचणी, वरई ही इथली मुख्य पिके आहेत. सोबतच काही प्रमाणात उडीद हे आंतरपीक नाचणीत घेतले जाते.  मर्यादित जमिनीची विभागणी त्यात पावसाची अनियमितता यामुळे उदरनिर्वाहासाठी असलेल्या खरीप पिकांमध्ये धोके निर्माण झाले आहेत. परिणामी वर्षभराची आर्थिक जुळवणी करणे अवघड बनत चालले आहे. शिवाय मर्यादित पिकांमुळे पोषणाचा प्रश्न मागे उरतोच. शेतीचा मुख्य हंगाम आटोपला की गावातील व्यक्ती मजुरीसाठी भिवंडी-शहापूर भागात स्थलांतरित होतात. कधी शेतीची तर बऱ्याचदा बांधकाम मजुरीची कामे येथे मिळतात.  

बियाण्याद्वारे स्वयंपूर्णता 
कळमुस्ते गट ग्रामपंचायत अंतर्गत येणारे हर्षेवाडी हे ठाकर समूह वस्तीचे गाव आहे. साधारणतः ३५ कुटुंब संख्या आहे. शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. वनराई संस्थेने केलेल्या प्राथमिक सर्व्हेक्षणात असे लक्षात आले, की प्रत्येक शेतकरी बियाण्यासाठी बाजारावर अवलंबून आहे. त्याची जुळवाजुळव करणे  मोठीच बाब. शिवाय इथले अतिशय उपयुक्त असणारे व निसर्गाच्या लहरीपणालाही पुरून उरणारे या भागातील पारंपारिक बियाणे मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. याचा परिणाम पोषणावर झाला होता. समस्या लक्षात घेऊन २०२० च्या खरिपात येथे भाताच्या विविध देशी बियाण्याचे वाटप करण्यात आले. सोबत लाल अंबाडी, सुरण, हळद आदींबरोबर परसबागेत वाढविण्यासाठी २० पेक्षा जास्त प्रकारच्या भाजीपाला पिकांचे बियाणे देण्यात आले. गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांची लागवड केली. योग्य निगा राखत उत्पन्न मिळवले. घरी खाण्यासाठी पुरेसा भाजीपाला मिळालाच पण त्याचबरोबर पुढील वर्षी बियाण्याचीही सोय झाली.

रब्बी हंगामही साधण्याचा प्रयत्न 
रब्बी हा तसा पिके घेण्यासाठी निसर्गाचे कमी धोके असणारा हंगाम. परंतु येथील गावांत भातशेती झाली की जनावरे मोकाट सोडण्याची परंपरा असल्याने रब्बीची पिके घेतली जात नव्हती. यंदा गावकऱ्यांनी  बैठक घेऊन रब्बी हंगाम घेण्याचे निश्‍चित केले. प्रत्येकाने आपापली जनावरे राखावीत असे ठरले. वनराई संस्थेच्या शाश्वत ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत रब्बीसाठी बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने कडू वाल, गोड वाल, काळा वाटाणा, मसूर, हरभरा आदींचे बियाणे निवडण्यात आले. प्रत्येक कुटुंबाने त्यांची लागवड केली. या भागात बऱ्याचदा भातशेतीनंतर पुन्हा कोणते पीक घेण्याची पद्धत नव्हती. तसे बियाणेही उपलब्ध नव्हते. आता खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम गाव घेऊ लागले आहे.

‘वनराई’ संस्थेने डिझेल इंजिन पंपसेट व पाइप्सचेही शेतकरी गटाला वितरण केले आहे. सिंचनाची मर्यादित प्रमाणात सोय उपलब्ध झाली असून काहींनी बटाटा, कांदा, गहू, कोथिंबीर अशी पिके घेतली आहेत. उन्हाळ्यात काकडीसारखी पिके घेण्याचा मानस आहे. बारमाही हंगामातून आदिवासी शेतकऱ्यांना सातत्याने उत्पन्न मिळणार आहे. सोबत सेंद्रिय शेती पद्धतीवर भर असल्याने निसर्गाचेही रक्षण होण्यास मदत होणार आहे.

प्रकल्पात वनराई संस्थेचे श्री. महाले, प्रकल्प प्रमुख जयवंत देशमुख, सचिव अमित वाडेकर यांचे मार्गदर्शन लाभते. सरपंच नामदेव बुरंगे, हर्षेवाडी ग्रामविकास समितीचे बच्चू निरगुडे, नामदेव बांगारे, गुणाजी जाधव, मधु बांगारे, गुलाब बांगारे, बुधा बांगारे, विष्णू बांगारे, कमा दोरे आदी ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग असतो. गावात हरिहर किल्ल्याच्या माध्यमातून शाश्वत पर्यटन मॉडेल बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याची सुरुवात ग्रामस्थांनी वृक्षारोपणातून केली आहे. रस्त्यांच्या कडेला १२० झाडांचे रोपण व संगोपन सुरू केले आहे. 

पर्यटन केंद्राचा विकास 
कळमुस्ते गट ग्रामपंचायतीत पाच वाड्या आहेत. सन २०१७ पासून येथील आदिवासी शेतकरी सेंद्रिय शेतीची वाट धरत गावाच्या आर्थिक विकासात बदल घडवत आहेत. या भागात हजारो पर्यटक भेटी देतात. निसर्गाचा आनंद घेतानाच आदिवासी घरातील जेवण घेण्यासाठीही उत्सुक असतात. २०१८ नंतर गावाने शेती, कृषी पर्यटन या माध्यमातून विकास साधला आहे. सामुदायिक बियाणे बँक तयार करून पुढील वर्षी लागणाऱ्या बियाण्याचे आधीच नियोजन करून ठेवले आहे. सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा जोरवर यांच्या मार्गदर्शनाखाली पिकेल ते विकेल या संकल्पनेतून सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ देण्याचा प्रयत्न होत आहे. ग्राहक वाडीपर्यंत येऊन खरेदी करतात. पर्यटक देखील भाजीपाला, तांदूळ व अन्य धान्य घेऊन जातात. त्यामुळे ग्रामस्थांना पर्यटन व शेतीतील असे दुहेरी उत्पन्न मिळते. 

अर्थकारण बदलतेय 
केवळ भात शेतीवर अवलंबून असलेला आदिवासी आता विहिरींना मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने भाजीपाला व फळ लागवड करू लागला आहे. त्यातील उत्पन्नातून आपले राहणीमान देखील बदलून दुचाकी, चारचाकी घेऊ लागला आहे. नाशिक, घोटी आदी बाजारपेठा त्यास मिळत आहे. वाहून जाणारे पाणी जलसंधारणाच्या कामांमधून अडवले जात आहे. जमिनींचे सपाटीकरण करणे, नापिक जमिनी सुपीक करणे आदी प्रयत्न होत आहेत.


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
गाजराने दिले उत्पन्नासह चाराहीनगर जिल्ह्यात अकोल तालुक्यातील गणोरे येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून घडवली...नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक...
अल्पभूधारकांसाठी कमी खर्चातील रायपनिंग...तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी.वाय. पाटील...
शेतकरी गट ते कंपनी उभारली प्रगतीची गुढीशेतकऱ्यांसाठी अल्प दरात विविध अवजारे उपलब्ध...
जिरॅनियम तेलनिर्मिती, करार शेतीतून...देहरे (ता. जि. नगर) येथील वैभव विक्रम काळे या...
कांदा, कलिंगड पिकातून बसवले आर्थिक गणितकरडे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भाऊसाहेब बाळकू...
शिक्षकाची प्रयोगशील शेती ठरतेय फायद्याचीआश्रम शाळेत गेल्या २३ वर्षांपासून शिकविणारे सहायक...
बचत गटांना पूरक उद्योगांची साथपारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता उमेद अभियानाच्या...
तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे...फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक...
फुलशेतीतून सुखाचा बहर जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक...
म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी : इरावडीइरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील...
ओल्या काजूगरासाठी प्रसिद्ध कुणकवणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव...
माळरानावर फळबागांतून समृद्धीरांजणगाव देवी (ता. नेवासा, जि. नगर) येथील संयुक्त...
प्रयत्नवाद, उद्योगी वृत्तीने उंचावले...पणज (जि. अकोला) येथील अनिल रामकृष्ण रोकडे यांनी...