मजुरी ते पूर्वहंगामी निर्यातक्षम द्राक्ष शेतीत अव्वल स्थान

पिंगळवाडे (जि. नाशिक) येथील कृष्णा धर्मा भामरे हे डाळिंब व द्राक्ष शेतीतील ठळक नाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष शेतीची यशस्वी उभारणी त्यांनी केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, आर्थिक नियोजन, बाजारपेठांचा शोध या जोरांवर द्राक्ष शेतीचा सुमारे १०० एकरांवर त्यांनी विस्तार झाला. युरोपासह विविध देशांत त्यांची द्राक्षे निर्यात होतात.
Exportable grape production
Exportable grape production

पिंगळवाडे (जि. नाशिक) येथील कृष्णा धर्मा भामरे हे डाळिंब व द्राक्ष शेतीतील ठळक नाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष शेतीची यशस्वी उभारणी त्यांनी केली. जिद्दीला कष्टांची जोड, प्रयोगशीलता, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, आर्थिक नियोजन, बाजारपेठांचा शोध या जोरांवर द्राक्ष शेतीचा सुमारे १०० एकरांवर त्यांनी विस्तार झाला. युरोपासह विविध देशांत त्यांची द्राक्षे  निर्यात होतात. एकेकाळी शेतमजुरी करणाऱ्या या एकत्रित कुटुंबाने पूर्वहंगामी निर्यातक्षम द्राक्षशेतीत उत्तुंग भरारी घेतली आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंगळवाडे (ता. सटाणा) येथील रामदास, कृष्णा, राजाराम व तात्याभाऊ अशी चार भावंडे. सन १९७९ मध्ये बालपणी पितृछत्र हरपले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना इच्छा असूनही शिक्षण घेता आले नाही. गरिबीत आई पुतळाबाई यांनी पोटाला चिमटा घेऊन मुलांना वाढविले. वडिलोपार्जित अवघी पाच एकर जमीन होती. तीही निम्मी अधिक कोरडवाहू होती. त्यामुळे शेतमजुरी करण्याची वेळ चौघा भावंडांवर आली. मजुरीच्या उत्पन्नातून त्यांनी घरच्या शेतीचाही विकास करण्यास सुरुवात केली. पुढे ऊस, कोबी, टोमॅटो, मिरची अशी पिके ते घेऊ लागले. त्यातही चढ-उतार होतेच. मात्र संघर्ष सुरूच ठेवला. शिलकीतील  उत्पन्नातून १९८६ मध्ये तीन एकर जमीन घेतली. त्याचा विकास करून दीड एकरात गणेश वाणाची डाळिंब लागवड केली. द्राक्षशेतीचा विस्तार  हा अनुभव सोबतीला असताना १९८८ मध्ये करार पद्धतीने द्राक्ष शेती केली. त्यातून आत्मविश्‍वास निर्माण झाला. मग १९८९ मध्ये स्वक्षेत्रावर कमी भांडवलात बांबूचा आधार देऊन दीड एकरांत थॉम्पसन वाणाची द्राक्ष लागवड केली. जिद्दीने व चिकाटीतून हा प्रयोग यशस्वी केला. ही प्रेरणा सोबतीला घेऊन ध्येयवेड्या या कुटुंबाने द्राक्षशेतीचा विस्तार करण्यास सुरुवात केलीय. या वाटचालीत आईची प्रेरणा व भागातील प्रयोगशील द्राक्ष उत्पादक खंडेराव शेवाळे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. गेल्या दोन- तीन वर्षांपूर्वीपर्यंत डाळिंबाच्या शेतीचा दीर्घ अनुभव कुटुंबाने घेतला.  त्या वेळी ४० ते ४५ एकरांपर्यंत त्याचे क्षेत्र होते. मात्र तेलकट डाग व मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे हे पीक अडचणीत आले. त्यामुळे हे पीक थांबवण्याचा निर्णय घेत पूर्णपणे पूर्वहंगामी द्राक्षावर लक्ष केंद्रित केले. तंत्रज्ञानाचा अवलंब, नवीन वाणांची निवड व बाजारपेठांचा शोध हे सूत्र अवलंबिले. आज वडिलांच्या नावे ‘धर्मराज फार्म’ नावाने कुटुंबाने  नावलौकिक वाढवला आहे. सन १९९१ मध्ये पुरेसे भांडवल नसल्याने बागेत ॲगल उभारण्यासाठी ३० हजार रुपयांचे पीककर्ज घेतले. त्यानंतर वेळेवर परतफेड करत आर्थिक पत वाढविली.  भामरे यांचे शेती व्यवस्थापन   एकूण शेती- ११० एकर.  संपूर्ण बागायती क्षेत्रावर १०० एकर द्राक्ष लागवड  दरवर्षी २५ जून ते १ सप्टेंबर दरम्यान गोड्या छाटणीचे नियोजन  अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान व जोखीम कमी करण्यासाठी पाच एकरंप्रमाणे टप्प्याटप्प्याने आठ दिवसांचे अंतर ठेवून छाटण्या  २५ ऑक्टोबरपासून डिसेंबर अखेरपर्यंत माल काढणी सुरू होईल या अनुषंगाने कामांवर भर   लागवड अंतर- पूर्वीच्या  बागा ९ बाय ५ फूट, ९ बाय ६ फूट तर नवी लागवड १० बाय  फूट अंतरावर     वाणांची विविधता व वैशिष्ट्ये 

  • चव, मागणी, आकर्षकपणा असल्याने १९९५ पासून शरद सीडलेस रंगीत वाणाची ९ एकरांवर लागवड  
  • पावसात प्रतिकारक व  फुलोरा अवस्थेत कूज कमी होत असल्याने सफेद वाणांत तास ए-गणेश २५ एकर, क्लोन-२ हे २० एकर, तर थॉमसन सीडलेस ३० एकरांत. यासह सुधाकर सीडलेस ४ एकर.  
  • टिकवण क्षमता, आकर्षकपणा व मागणी असल्याने १२ एकरांत रेड ग्लोब व क्रिमसन वाणांची लागवड सुरू
  • एकरी उत्पादन (प्रति टन) १० ते १२ टन 
  • एकरी ८० टक्के निर्यातक्षम तर २० टक्के मालाची स्थानिक बाजारात विक्री
  • एकरी एकूण उत्पादन खर्च-२.५ ते ३ लाख रुपये  
  • विक्री व बाजारपेठांचे नियोजन  देशांतर्गत दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, कानपूर व अमृतसर बाजारात दिवाळीनंतर मागणी. उत्तर भारतात सुरू होणाऱ्या लग्नसराईच्या अनुषंगाने व्यापाऱ्यांशी सौदे. ख्रिसमस मार्केटची मागणी लक्षात घेऊन रशियासह युरोपमध्ये निर्यातदारांमार्फत पाठवणी. बांगलादेश, नेपाळ, दुबई, सौदी अरेबिया येथेही निर्यात. बाजारपेठ विश्लेषण  हंगामात १ नोव्हेंबर ते डिसेंबर अखेर किफायतशीर दर  मिळतो. गेल्या दोन वर्षांत अतिवृष्टीचा फटका बसला. तर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील व चालू वर्षी भीतीमुळे मागणी व पुरवठ्याला फटका बसला. मात्र गोडी, टिकवणक्षमता, मण्यांचा आकार, ब्रँडिंग केल्याने बाजारपेठा मिळविण्यात यश आल्याचे भामरे सांगतात. व्यवस्थापन, तंत्रज्ञानातील ठळक बाबी   मातीच्या प्रकारानुसार सिंचन करताना हलक्या जमिनींसाठी ५ तास, मध्यम हलक्या जमिनींसाठी ४ तास, तर काळ्या जमिनीत ३ तास सिंचन तसेच पिकाच्या वाढीनुसार सिंचनात बदल  प्रत्येक वेलीवर ३०-३५ मर्यादित घडसंख्या    डाऊनी प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पानांची मर्यादित संख्या राखून कॅनोपी व्यवस्थापन  द्राक्ष बागायतदार संघाच्या माध्यमातून वर्षभरात आठवेळा पान, देठ परीक्षण. त्यातील काडी तयार होण्याच्या वेळेपर्यंत चार, तर माल तयार होण्यापर्यंत चार. माती व पाणी परीक्षण करून व्यवस्थापन.  छाटणीनंतर १२० दिवस पूर्ण झाल्यावर रंग, साखर व आकार तपासणीनंतर काढणी  सेंद्रिय निविष्ठांच्या वापरावर भर . बायोगॅस निर्मितीसह शेणखताच्या स्लरीचा वापर. वर्षभरात एकूण सुमारे ६ ते ८ वेळा वापर. प्रति झाड एक लिटर किंवा गरजेनुसार दर पंधरा दिवसांनी.   स्लरी तयार होण्यासाठी ३० हजार लिटर क्षमतेच्या युनिटची निर्मिती. स्लरी उपसा करण्यासाठी मडपंपाचा वापर.  मृद्‍संवर्धनासाठी बायोगॅस स्लरी, एरंडी, निंबोळी, मोह व शेंगदाणा पेंड यांचा वापर  खतांचा अपव्यय टाळून थेट झाडाला पुरवठा होण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचे डीएफ द्रावण तयार करून थेट किंवा ठिबकच्या माध्यमातून पुरवठा करण्यासाठी ४ हजार लिटर टाकी क्षमता  बाष्पीभवन कमी होण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने पाचट, मका चारा, भुसा वापरून आच्छादन  दरवर्षी प्रति झाड २० किलो शेणखत  दोन स्वतंत्र पॅक हाउसेस -शेतीच्या मुख्य परिसराची सीसीटीव्ही खाली निगराणी  हंगामी शेतमजुरांसाठी स्वतंत्र निवासी व्यवस्था साडेतेरा कोटी लिटर पाणीसाठा  सुमारे शंभर एकरांला पाणी पुरवण्यासाठी स्वखर्चाने शेततळ्यांची निर्मिती केली आहे. यात २.५ एकरांवर ४.५ कोटी लिटर, १.५ एकरावर तीन कोटी व तीन एकरांवर सहा कोटी लिटर असा एकूण १३.५ कोटी लिटरपर्यंत शाश्‍वत पाणीसाठा तयार केला आहे. शेताच्या जवळून कॅनॉल जातो. विहिरी आहेत.  शंभर देशी गाईंचा गोठा  तब्बल १०० देशी गोवंश संवर्धन कुटुंबाने केले आहे. यातील बहुतांश गाईंची पैदास गोठ्यातच झाली आहे. एकत्रित कुटुंबाला लागणारे दूध, शेतीसाठी शेण व गोमूत्राची उपलब्धता त्यातून होते.   २५ म्हशींच्या संगोपनासाठीही मुक्त पद्धतीचा गोठा आहे. हिरव्या चाऱ्यासाठी मका व बाजरी यांचा सुका चारा वर्षभर साठवून ठेवला जातो.  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर  दोन वेदर स्टेशन्स   हवामानाच्या विविध घटकांची उदा. आर्द्रता, पाऊस, रोग-किडींचा प्रादुर्भाव, त्यानुसार फवारण्या, सूर्यप्रकाशाची तीव्रता, आदी विविध बाबीं समजून बागेचे व्यवस्थापन अत्यंत काटेकोर व वेळेवर करणे शक्य व्हावे यासाठी दोन वेदर स्टेशन्स उभारली आहेत. त्याचे चार सब युनिट्सही आहेत. त्याद्वारे वाफसा कंडिशन, बाष्पीभवन, पाणी केव्हा किती द्यायचे या बाबीही कळून येतात.   कृषिपंप सुरू ठेवण्यासाठी मोबाईल ऑटो वापर   केंद्रीकृत (सेंट्रलाइज्ड) पद्धतीने सिंचन व विद्राव्य खते व्यवस्थापन व्यवस्था   जमीन चढ-उताराची असल्याने सर्वत्र समदाबाने पाणी वितरण होण्यासाठी विशिष्ट ड्रीपर सिस्टीमचा वापर -कॅनॉपी व्यवस्थापन करताना एकसारख्या फवारण्या यासह वेळ व खर्च कमी करण्यासाठी अत्याधुनिक हाय व्हॉल्यूम, तसेच इलेक्ट्रोस्टॅटिक फवारणी यंत्राचा वापर व्यक्तीनिहाय कामाच्या जबाबदाऱ्या  नव्या पिढीकडे सध्या शेती व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी आहे. क्षेत्रीय नियोजन, मजूर समन्वय व देखरेख ही कामे विठ्ठल पाहतात. सोपान व संदीप यांच्याकडे पाणी, खत व कीडनाशके व्यवस्थापन, एकनाथ यांच्याकडे वाहतूक यंत्रणा, तर अन्य देखभाल नामदेव व तुकाराम पाहतात.   संघर्षातून उल्लेखनीय प्रगती  आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सुरुवातीच्या काळात मोठा संघर्ष वाट्याला आला. गावातच शेतमजुरी करावी लागली. गरिबीमुळे कुणी मानपान देत नव्हते. आम्हा भावंडांचा सांभाळ करताना आई कैकवेळी उपाशीपोटी झोपली. त्यामुळे परिस्थितीने शिकवले. कुटुंबावर वारकरी संप्रदायाचा पगडा असल्याने श्रम प्रतिष्ठा जपली असल्याचे कृष्णा भामरे अभिमानाने सांगतात. जिद्दीला कष्टाची जोड देत नेत्रदीपक प्रगती त्यांनी साधली आहे. आज ३१ जणांचे एकत्रित कुटुंब सुखासमाधानाने नांदते आहे. एकी व सांघिक निर्णयक्षमता, पुरुषांबरोबर महिलांचा शेतीत सहभाग, व्यक्तिनिहाय जबाबदाऱ्या व कामाचा समन्वय ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. परदेशातील दौरे  कृष्णा यांनी इस्राईल, चीन येथे संदीप यांनी चिली, पेरू, इस्राईल येथे तर नामदेव यांनी दक्षिण आफ्रिकेत जाऊन द्राक्ष शेतीसंबंधी अभ्यास दौरे केले आहेत. प्रयोगशील शेतकऱ्यांशी संवाद, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाते. अनेक वर्षांपासून सतत प्रयोगशील राहणाऱ्या कृष्णा यांनी स्वतः पुरस्कारांसाठी प्रस्ताव कधी पाठवले नाहीत. कृषी विभागातर्फे शेतीनिष्ठ पुरस्कारासह गिरणा गौरव, आदर्श शेतकरी, जिल्हा परिषदेचा आदर्श गोपालक आदी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. - सोपान भामरे  ९४२०२२७४९४   संदीप भामरे  ९४२३३१८९९०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com