जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापन

माणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व भारती या माळी दांपत्याची १० गुंठे शेती आहे. मात्र २० ते २५ वर्षांपासून शास्त्रीय, अभ्यासपूर्ण प्रयत्न, चारा नियोजन व एकूण व्यवस्थापनातून दुग्ध व्यवसायात धवल यश मिळवले आहे. जनावरांची गोठ्यातच पैदास करून संख्या ७० पर्यंत नेत प्रति दिन ४० लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गाई गोठ्यात तयार केल्या आहेत.
Prafulla Mali's modern herd at Mankapur.
Prafulla Mali's modern herd at Mankapur.

माणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व भारती या माळी दांपत्याची १० गुंठे शेती आहे. मात्र २० ते २५ वर्षांपासून शास्त्रीय, अभ्यासपूर्ण प्रयत्न, चारा नियोजन व एकूण व्यवस्थापनातून दुग्ध व्यवसायात धवल यश मिळवले आहे. जनावरांची गोठ्यातच पैदास करून संख्या ७० पर्यंत नेत प्रति दिन ४० लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गाई गोठ्यात तयार केल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरापासून सुमारे दोन ते पाच किलोमीटर अंतरावर कर्नाटक राज्याच्या हद्दीत चिकोडी तालुक्यात माणकापूर गाव आहे. येथील प्रफुल्ल राजेंद्र माळी यांचा गोठा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. लहानपणापासूनच जनावरांची आवड असल्याने त्यांनी बारावीनंतर पशुधन पर्यवेक्षक पदविका घेतली. त्यातून जनावरांचे शास्त्रीय व्यवस्थापन करण्याची दिशा मिळाली. वीस ते २५ वर्षांपूर्वी दोन गाईंपासून व्यवसाय सुरू केला. गोठ्यातच जनावरांची पैदास व जातिवंत ‘ब्रीड’ तयार करण्याचा ध्यास घेतला. त्याचदृष्टीने पाणी, चारा, आहार, आरोग्य यांचे व्यवस्थापन ठेवले. टप्प्याटप्प्याने जनावरे वाढल्याने आर्थिक गणित सुरळीत झाले. नफा गोठ्यातच गुंतवला. यामुळे विकास करताना आर्थिक ताण आला नाही. गोठा व्यवस्थापन

  • गोठ्याचे विविध भाग. एकात म्हशी, दुसऱ्यात गाई, तिसऱ्या भागात मिल्किंग पार्लर, मुक्त गोठा व लहान वासरे अशी रचना.
  • सध्या गाई २५ (एचएफ), ३० म्हशी (मुऱ्हा), वासरे अशी मिळून ७० जनावरे.
  • जागा कमी असल्याने काही वर्षांत विक्री करून जनावरांची संख्या ठेवली मर्यादित.
  • पशुवैद्यकीय शिक्षण असल्याने जनावरांचे आरोग्य प्रफुल्ल उत्तम सांभाळतात. जनावरे आजारी जनावरे राहण्याचे प्रमाण कमी.
  • कुटुंब राबते गोठ्यात प्रफुल्ल व पत्नी भारती मिळून बहुतांश सर्व कामे करतात. एक मजूरही तैनात केला आहे. मुलगा प्रणव शिक्षण सांभाळून मदत करतो. सुरवातीला छोटा गोठा होता. जनावरे वाढू लागली तसे १२ गुंठे क्षेत्र खरेदी करून गोठा बांधला. चारा नियोजन जनावरांची वाढती संख्या पाहाता चाऱ्याची तजवीज करण्याचे आव्हान होते. पण दडपण न घेता नियोजनबद्ध पद्धतीने चारा साठवणूक तंत्र वापरले. दहा गुंठ्यांत गवतवर्गीय चारा घेतात. मात्र तो १० टक्केच पुरत असल्याने ९० टक्के दर्जेदार चारा बाहेरून घेतला जातो. प्रफुल्ल यांनी काही दिवस पंजाब राज्याचा दौरा करून तेथील विविध प्रकल्प पाहिले. त्यातून आपण कुठे मागे आहोत त्याची दिशा मिळाली. तेथील आदर्श घेत ४० टनांपर्यंत सायलेजही तयार केले. ठळक बाबी

  • ७० टक्के कोरडा व ३० टक्के ओला चारा असे मिश्रण. सकाळी व संध्याकाळी असे नियोजन.
  • प्रत्येक जनावरास तीस किलो चारा.
  • दुभत्या गाईला लिटरला चारशे ग्रॅम, तर म्हशीला ५०० ग्रॅम चारा.
  • म्हशीला गोळी पेंड, सरकी पेंड, हरभरा कळना, मका मिक्स तर गाईला गोळी पेंड व मका पेंड.
  • दररोज ४० लिटर दूध देणारी गाय बहुतांश जनावरांची पैदास गोठ्यातच केली असून जातिवंत व उत्तम ब्रीड निपजण्यावर सर्वाधिक भर दिला आहे. त्यामुळेच प्रति दिन २२ लिटरपासून ते ४० ते ४२ लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गाई गोठ्यात पाहण्यास मिळतात. दुधाची गुणवत्ताही चांगलीच राहील असा भर असतो. अलीकडे परदेशी सिमेन आणून पैदास तंत्र अवलंबिले आहे. म्हशी प्रति दिन ११ ते १८ लिटरपर्यंत दूध देतात. रोजचे संकलन दररोज गाईचे ३५०, तर म्हशीचे १५० ते १७० लिटर याप्रमाणे ५०० लिटरपर्यंत दूध संकलन होते. गाईचे दूध यंत्राद्वारे तर म्हशीचे दूध हातांकरवी काढले जाते. गाळून कॅनमध्ये जमा करून ‘गोकुळ’ संघास पुरविले जाते. दूध संस्थेची स्थापना ‘गोकुळ’सारखे संघ संकलनासाठी दूध संस्थांना कमिशन देतात. प्रफुल्ल यांनी कल्पकता दाखवीत भैरवनाथ दूध संस्था स्थापन केली. त्यामुळे संघाकडून उत्पादकांसाठीचा दर शिवाय दूध संस्थांसाठीचे कमिशनही मिळाले. अशा प्रकारे दररोज एक हजार रुपये उत्पन्न मिळते. त्यातून उत्पादन खर्च कमी होतो. दुग्ध व्‍यवसायातून एकूण ३० टक्के नफा मिळतो. वर्षाला १०० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. २५०० ते ३००० रुपये प्रति ट्रॉली दराने द्राक्ष बागायतदार व शेतकऱ्यांना विक्री होते. वर्षाला सुमारे अडीच ते तीन लाख रुपये त्यातून मिळतात. दिवाळीच्या वेळेस लाभांश म्हणून तीन लाखांपर्यंतची रक्कम मिळते. पुरस्कारांनी गौरव शास्त्रशुद्ध व्यवस्थापन व उत्पादकतावाढीचा (प्रति दिन ३४ लिटर दूध देणारी गाय) आदर्श तयार केल्याने गोकुळचा ‘गोकुळ श्री’ (२०१७) पुरस्कार. वासरू संगोपन योजनेअंतर्गत तसेच शाहू दूध संघाचा स्वच्छ व निर्जंतुक दुधाचा पुरस्कारही मिळाला आहे. झाले मार्गदर्शक प्रफुल्ल अभ्यासासाठी अनेक ठिकाणी फिरतात. दुग्ध व्यवसाय विषयक प्रदर्शने पाहतात. आपला अनुभव व अभ्यासाच्या जोरावर ते इतरांचे मार्गदर्शक झाले आहेत. संपर्क ः प्रफुल्ल माळी, ९९२१३१२२१५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com