agricultural news in marathi success story Mechanical mini Industry supporting small land holders | Page 2 ||| Agrowon

यांत्रिकी पूरक उद्योग ठरताहेत अल्पभूधारकांना आधार

संतोष मुंढे
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021

औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील आठवडी बाजाराचं गाव म्हणून ओळख असलेल्या बाबरा गावातील शेतकऱ्यांनी डाळ मिल, शेंगा फोडणी, मसाला गिरणी असे छोटेखानी यांत्रिकी व्यवसाय सुरू केले आहेत. 
 

औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील आठवडी बाजाराचं गाव म्हणून ओळख असलेल्या बाबरा गावातील शेतकऱ्यांनी डाळ मिल, शेंगा फोडणी, मसाला गिरणी असे छोटेखानी यांत्रिकी व्यवसाय सुरू केले आहेत. त्यातून रोजगारनिर्मितीसह चांगले अर्थार्जन होऊन कमी क्षेत्राच्या शेतीला मोठा सक्षम आधार त्यांनी तयार केला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील बाबरा हे आठवडी बाजाराचं गाव म्हणून ओळखले जाते. कन्नड, खुलताबाद, फुलंब्री व सिल्लोड तालुक्‍यातील शेतकरी, भुसार माल व्यापारी येथील बाजारात येतात. या सर्वांबरोबरच आपली गरज ओळखून गावातील काही युवा शेतकऱ्यांनी छोटेखानी यांत्रिकीपूरक व्यवसाय सुरू केले आहेत. त्यातून हे गाव क्‍लस्टरचं रूप घेऊ पाहते आहे. त्यातून पंचक्रोशीतील तीन तालुक्‍यांतील १५ ते २० गावांतील शेतकरी, छोट्या भुसार माल व्यापाऱ्यांची सोय व कायमस्वरूपी रोजगारही सुरू झाला आहे.

मिनी डाळ मिल
गावचे तीन एकर शेती असलेले अल्पभूधारक आजिनाथ पवार शेतीला जोड व्यवसाय करण्याच्या विचारात होते. त्यातून २०१७ मध्ये त्यांनी भागीदारीतून मिनी डाळ मिल व्यवसाय सुरू केला. अकोला येथून यंत्र घेतले. प्रति तास ५ क्‍विंटल त्याची क्षमता आहे. गेल्या तीन वर्षांच्या काळात सुमारे १२०० क्‍विंटलपर्यंत हरभरा, तूर, मूग, उडीद यांच्या डाळी पवार यांनी शेतकऱ्यांना करून दिल्या. त्याचा दर ८०० रुपये प्रति असा आहे. मजूर, वीज व तेल व अन्य मिळून सुमारे ३५० रुपये प्रति क्‍विंटलचा खर्च येतो, तर क्विंटलला ४०० ते ६०० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. एकूण चार लाख रुपयांची गुंतवणूक आहे. वर्षाकाठी दोन- अडीच लाख रुपयांची होणारी उलाढाल माझ्यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्याला आर्थिक आधार देण्यासाठी महत्त्वाची ठरल्याचे आजिनाथ सांगतात.

संपर्क : आजिनाथ पवार, ९०४९३२८८४६

नारायण यांचा अनुभव

  • पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची गरज ओळखून गावातील नारायण पवार यांनी शेंगा फोडणी यंत्र, मसाला गिरणी व अलीकडेच मिनी डाळ मिल सुरू केली आहे. तुरीवरील साल काढण्यासाठ प्रति तास ४ क्‍विंटल, तर डाळ तयार करण्याची क्षमता दीड- दोन क्‍विंटलपर्यंत आहे.
  • आतापर्यंत विविध धान्यांची १२० क्‍विंटलपर्यंत डाळ प्रति किलो ८ रुपये दराने शेतकऱ्यांना तयार करून दिली आहे. सुमारे एक लाख रुपयांचा व्यवसाय केला. उर्वरित भुश्‍शाचा उपयोग घरच्या २० ते २५ शेळ्यांना खाद्य म्हणून केला जातो. त्याद्वारे शेतीलाही लेंडीखत उपलब्ध झाले आहे.
  • हळद पावडर व मिरपूडही ते तयार करून देतात. सुमारे सात ते आठ लाख रुपये स्वगुंतवणूक त्यांनी केली आहे.

शेंगा फोडणी यंत्र
पंचक्रोशीत अनेक शेतकरी १० गुंठ्यांपासून एक ते दीड एकरांपर्यंत भुईमूग घेतात. त्यांना यांत्रिक पद्धतीने शेंगा फोडून देण्याची संधी नारायण यांनी शोधली. सन २०१७ मध्ये राजकोटहून यंत्र आणले. सुमारे पावणेदोन लाख रुपयांची गुंतवणूक केली. ताशी ४ ते ५ क्‍विंटल त्याची क्षमता आहे. त्यासाठी एक हजार रुपये प्रति क्‍विंटल दर आकारला जातो. पहिले वर्ष अनुभवात गेलं.

पण आता वर्षाला किमान ५०० क्‍विंटल शेंगा फोडून देण्याचे काम ते करतात. शेती व हे पूरक व्यवसाय मिळून वर्षाला सात ते आठ लाख रुपयांची उलाढाल ते करतात. गावातील कृष्णा पवार या अत्यल्पभूधारक शेतकऱ्यानेही २०१९ मध्ये प्रति तास तीन क्‍विंटल क्षमतेचे शेंगा फोडणी यंत्र आणले आहे. दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ८० क्‍विंटलपर्यंत शेंगा फोडणीचे काम त्यांनी केले आहे.

संपर्क : नारायण पवार, ९४२०२२२८४२

धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्र
गावात संत तुकाराम शेतकरी गट कार्यरत आहे. सोमीनाथ पवार अध्यक्ष व आजिनाथ पवार सचिव आहेत. गटाच्या माध्यमातून यंदाच्या फेब्रुवारीत धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सुमारे १६ लाख १० हजार रुपये किमतीच्या या यंत्राच्या माध्यमातून सात हजार क्‍विंटल गहू, बाजरी यावर प्रक्रिया झाली आहे. यात दहा- बारा व्यापाऱ्यांकडील धान्याचाही समावेश आहे.
१०० रुपये प्रति क्‍विंटल दर त्यासाठी आकारला जातो. प्रति क्‍विंटल किमान ३० रुपये खर्च येतो. औरंगाबाद येथील मॉललाही सुमारे १७० क्‍विंटल गहू स्वच्छ व प्रतवारी करून ३० किलो बॅगेतून पुरवला. जवळपास साडेतीनशे क्‍विंटल बाजरी बाजारभावाने खरेदी केली. त्याचाही अकोला येथील व्यापाऱ्याला पुरवठा केला. त्यातून आर्थिक फायदा होण्याबरोबर व्यापारी ‘नेटवर्क’ मिळाले.

ठळक बाबी

  • सप्टेंबर ते जूनदरम्यान चालतो डाळ मिल उद्योग
  • भुईमूग शेंगा फोडणीचे काम चालते वर्षभर
  • गटामार्फत बियाणे प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू
  • कृषी विभाग अधिकारी व कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ व शेतकऱ्यांची उद्योगाला भेट

प्रतिक्रिया
गटाच्या धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्राला शेतकरी व व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. जवळपास सात हजार क्‍विंटल शेतीमालावर त्याआधारे प्रक्रिया पूर्ण होत दहा ते बारा लाखांची उलाढाल झाली आहे.
- सोमीनाथ पवार, ९४२३८७८३५९
अध्यक्ष, संत तुकाराम शेतकरी गट, बाबरा


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
वन्यप्राणी, संवर्धन, जनजागृतीसाठी ‘...मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वर्धा...
बटण मशरूमचा ‘कॅम्बीअम गोल्ड’ ब्रँडमूळचे जमालपूर (बिहार) येथील नीलकमल झा यांनी...
सेंद्रिय गुळाचा ‘यादवबाग’ ब्रॅण्ड !घरची वर्षानुवर्षांची ऊसशेती. मात्र मिळणाऱ्या कमी...
केळी, कापूस, जलसंधारणात झाली जळके...जळके (ता.जि. जळगाव) गावाने जलसंधारणात भरीव काम...
नागपूरला फुलला सीताफळाचा बाजारनागपूर येथील महात्मा फुले मार्केट सीताफळाने फुलले...
‘मार्केट डिमांड’नुसार देशी वांग्यांची...देशी वांग्याला अस्सल चव असल्याने...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
शेळी, कोंबडीपालनात युवा शेतकऱ्याची...बुलडाणा जिल्ह्यातील आडविहिर येथील युवा शेतकरी...
राधानगरीच्या दुर्गम भागात रेशीम शेतीचे...पारंपरिक ऊस, भात य पारंपरिक शेतीपेक्षा थोड्या...
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...