agricultural news in marathi success story Mechanization of paddy cultivation rooted in tribal areas | Agrowon

आदिवासी पाड्यात रुजले भातशेतीत यांत्रिकीकरण

मुकुंद पिंगळे
बुधवार, 14 जुलै 2021

नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग आदिवासीबहुल असून भात हे येथील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने या शेतकऱ्यांना भातपिकात लागवड ते काढणीपश्चात साखळीपर्यंत तंत्रकुशल केले.  
 

नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग आदिवासीबहुल असून भात हे येथील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने या शेतकऱ्यांना भातपिकात लागवड ते काढणीपश्चात साखळीपर्यंत तंत्रकुशल केले. बांधावर प्रात्यक्षिके व मार्गदर्शन पुरवीत भाडेततत्वावरील यंत्रव्यवसायाची चालनाही दिली.

नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखला जातो. त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यांतील हरसूल, कोणे, साप्ते, चीरापाली, जातेगाव, ओझरखेड, करंजाळी, आंबोली, बेजे आदी गावांचा त्यात समावेश होतो. भात हे येथील शेतकऱ्यांचे मुख्य उदरनिर्वाहाचे पीक आहे. पारंपरिक उत्पादन पद्धतीत श्रम, वेळ, मजूरबळ, पैसे या बाबी अधिक खर्चिक होत्या. त्यामुळे कामातील सुलभता, उत्पादकता व गुणवत्ता यावर परिणाम व्हायचा. साहजिकच पिकाचे अर्थकारण सक्षम होत नसल्याने आदिवासींना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागे.

केव्हीकेने घेतला पुढाकार
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) या शेतकऱ्यांच्या समस्या ओळखल्या. त्यावर उपाय म्हणून भात शेतीत यांत्रिकीकरण करण्याचे ठरवले.

आदिवासी उपयोजनेअंतर्गत २०१० पासून काम सुरु केले. राज्यातील कृषी विद्यापीठे, केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ आदींच्या मदतीने किफायतशीर यंत्रांची उपलब्धता केली. केव्हीकेच्या कृषी अभियांत्रिकी शाखेचे विषय विशेषज्ञ राजाराम पाटील यांनी कृषी विभागाची मदत घेत प्रात्यक्षिके व त्याबाबत तांत्रिक मार्गदर्शन देण्यास सुरवात केले. कृषीविद्या शाखेचे शाखेचे डॉ.प्रकाश कदम यांनी वाण, लागवड व खत व्यवस्थापन याबाबत तर महिलांसाठी सुलभ यांत्रिकीकरण वापर ही जबाबदारी अर्चना देशमुख यांनी सांभाळली. यंत्रात गरजेनुरूप बदल करण्यासाठी खासगी कंपन्यांना सोबत घेतले.

यांत्रिकीकरणामागे हे राहिले उद्देश

 • आदिवासी युवकांचा यंत्र वापरात कौशल्य विकास, उत्पन्न वाढ, उत्पादन खर्चात बचत.
 • श्रमबचत
 • तंत्रज्ञान प्रसार
 • यांत्रिकीकरण वापराच्या संधीसह स्थानिक रोजगारनिर्मिती.

आणि यांत्रिकीकरण रुजले
यंत्रे उपलब्ध होऊनही सुरवातीला वापराकडे आदिवासींचा कल कमी होता. शेतकरी गट, संस्था कमी असल्याने सामुहिक वापर वाढीस मर्यादाही होत्या. मग चर्चासत्रे, परिसंवाद व मार्गदर्शनातून केव्हीकेने सातत्यपूर्ण विस्तारकार्य केले. त्यातून कामात सुसूत्रता येत यांत्रिकीकरण आदिवासी पाड्यांवर रुजण्यास सुरवात झाली. केव्हीकेने घेतलेली यंत्रे गटांकडेच ठेवण्यात आली. यंत्रांबाबतची माहिती अशी.

भात रोप लावणी यंत्र- पारंपरिक पद्धतीने रोपनिर्मिती करण्यासाठी राप भाजून रोपे तयार करावी लागतात. त्यासाठी एकरी ३० किलो बियाणे लागते. मजुरांकडून पुनर्लागवड करावी लागते. त्यासाठी १२ मजूर लागतात. सरासरी पाच हजार रुपये खर्च येतो. यांत्रिक पद्धतीने हेच काम दोन मजुरांत तीन तासांत होते.

बियाण्याची ५० टक्क्यापर्यंत बचत होते. लागवडीत चारसूत्री पध्दतीचा वापर होत असल्याने उत्पन्नात २० टक्के वाढ होण्यास वाव मिळतो.
यंत्र किंमत- २ लाख ४० हजार रू.

भात कापणी यंत्र

 • पारंपरिक भात कापणीस एकरी ८ मजूर, १ दिवस वेळ यासह सरासरी दोन ते अडीच हजार रुपये खर्च येतो. यंत्राद्वारे हेच काम दोन मजुरांत दोन तासांत १२०० रुपयांत होते. सरासरी दीड तासात एक एकर काम होते.
 • किंमत- एक लाख ३० हजार रू.

मिनी मळणी यंत्र

 • दुर्गम व आदिवासी भागात मळणीची मोठी यंत्रे अडचणीची ठरतात. कापणीनंतर हाताने आपटून भात व नागली सडकून काढण्याची कामे महिलांसाठी अतिकष्टाची व वेळखाऊ असतात. मिनी मळणी यंत्र दोन एचपी क्षमतेचे असून पेट्रोल इंजिनवर चालते. तासाला दोन पोती भात व नागली मळणी होते.
 • आकाराने लहान असल्याने भात खाचरात व कोठेही सहज नेता येते.
 • किंमत- ४० हजार रू.

मिनी राइस मिल
पारंपरिक पद्धतीत शेतकऱ्यांना साळ काढणीसाठी मोठ्या मिलकडे जावे लागते. तेथे १०० किलो साळीपासून ५० ते ५५ किलो तांदूळ मिळतो. मात्र मिनी राइस मिलमध्ये तो १५ किलोपर्यंत जास्त म्हणजे ६५ किलोपर्यंत मिळतो. त्यातून सरासरी ५०० रुपयांचे वाढीव उत्पन्न मिळण्यासह महिलांना हक्काचा रोजगार मिळतो.
किंमत- ५४ हजार रु..

रोजगार संधी

 • कुशल आदिवासी तरुणांना भाडेतत्वावर यंत्रांची सेवा देण्याची संधी व रोजगाराचे साधन मिळाले.
 • उपलब्ध भांडवलानुसार यंत्र खरेदी करून त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून सकारात्मक वृत्ती वाढीस लागण्यासह उत्पादकता व गुणवत्तेत बदल घडू लागले आहेत.

यांत्रिकीकरणाचे झाले असे फायदे

 • लावणीमुळे सरासरी मजुरी खर्च ६० टक्क्यांपर्यंत कमी. उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत वाढ.
 • कापणी, काढणीसाठी मजुरांची गरज ७० टक्क्यांनी कमी तर सरासरी खर्च ३५ टक्क्यांनी कमी.
 • गाव पातळीवर प्रक्रियेमुळे साळीपासून १५ टक्के तांदूळ उत्पादनात वाढ.
 • वाढलेल्या उत्पादनामुळे अर्थकारणात सुधारणा
 • 'पॉलिश्‍ड’ तांदळाची शहरी भागात थेट ग्राहक विक्री

प्रतिक्रिया
यांत्रिकीकरणामुळे मजूर टंचाईवर मात करता आली. मजुरी, इंधन खर्च घेऊन आम्ही कापणी यंत्राची सेवा देतो. अनेकांनी अशी खरेदी करून व्यवसाय सुरू केला आहे.
-जनार्दन भोये, भात उत्पादक, चीरापली, ता..त्र्यंबकेश्वर
८०८०७२६१८०

पूर्वी वेळेवर काम होत नसल्याने कापणी दरम्यान पाऊस आल्यास पिकाचे भिजून नुकसान व्हायचे. आता वेळेवर काम होऊन पेंढ्या बांधून सुरक्षित स्थळी ठेवता येतात. मजूरबळ, वेळ व खर्चात बचत झाली आहे.
-हेमराज महाले, जातेगाव, ता..त्र्यंबकेश्वर
९३०७००६५९४

यांत्रिकीकरणातून स्थानिक युवकांना केव्हीकेने यंत्रकुशल केले आहे. यंत्रांच्या किमती जास्त वाटत असल्या तरी कृषी विभागाची मदत घेत गटाद्वारेही खरेदी करता येईल. अन्य शेतकऱ्यांना यंत्रांची सेवा देऊन उत्पन्न मिळवता येईल.
- राजाराम पाटील, विषय विशेषज्ञ
९४२२२८३३६०


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
आंबा, काजू, फणसापासून चॉकलेट मोदकांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे (वाडोस) येथील...
सेंद्रिय उत्पादनांचा ‘सात्त्विक कृषिधन...नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक...
श्रमदानातून ‘चुंब’ गाव झाले जल...स्वच्छता, रस्ते, भूमिगत गटार आदी विविध पायाभूत...
‘कोरोना’नंतर आकार घेतेय फुलांची...गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे...
मोसंबी, शेडनेटसह सेंद्रिय पद्धतीने...पारंपरिक मोसंबी बागेतील लागवड अंतर व वाणातील बदल...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
शास्त्रीय, उत्कृष्ट व्यवस्थापनातून बीटल...सातारा जिल्ह्यातील शेळकेवाडी येथील जितेंद्र शेळके...
कांदा- लसूण शेतीत जरे यांचे देशभर नावबहिरवाडी (ता. जि. नगर) येथील कृषिभूषण...
नगदी पिकांना हंगामी पिकांची जोड देते...आपली शेती प्रयोगशील ठेवत मुदखेड (जि. नांदेड)...
कुक्कुटपालन, पोषण बागेतून प्रगती न्यू राजापूर (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील २४...