agricultural news in marathi success story Moving towards organic farming with spice industry | Agrowon

मसाला उद्योगासोबत सेंद्रिय शेतीकडे वाटचाल...

गणेश कोरे 
रविवार, 5 डिसेंबर 2021

लवळे (ता.मुळशी, जि. पुणे) येथील ज्योती दत्तात्रय सातव यांनी गावातील महिलांना सोबत घेत स्वयंसिद्धा महिला बचत गटाची स्थापना केली. मसाला, लोणचे निर्मितीच्या बरोबरीने त्यांनी बाजारपेठेचा अंदाज घेत सेंद्रिय भाजीपाला उत्पादन आणि विक्रीला सुरुवात केली आहे. 
 

लवळे (ता.मुळशी, जि. पुणे) येथील ज्योती दत्तात्रय सातव यांनी गावातील महिलांना सोबत घेत स्वयंसिद्धा महिला बचत गटाची स्थापना केली. मसाला, लोणचे निर्मितीच्या बरोबरीने त्यांनी बाजारपेठेचा अंदाज घेत सेंद्रिय भाजीपाला उत्पादन आणि विक्रीला सुरुवात केली आहे. 

पुणे जिल्ह्यातील मुळशी हा भात शेतीसाठी प्रसिद्ध तालुका. भात काढणीनंतर  घरातील पुरुष मंडळी नोकरीसाठी पुणे, पिंपरी- चिंचवड परिसरात जातात. महिला घरगुती, शेती कामात व्यस्त असतात. गेल्या काही वर्षांपासून मुळशी तालुक्यात औद्योगिकीकरण आणि त्या माध्यमातून होणाऱ्या शहरीकरणामुळे लोकवस्ती वाढू लागली. शहरी लोकांची वाढती मागणी लक्षात घेऊन ज्योती सातव यांनी शेतीपूरक उद्योगाच्या दृष्टीने घरगुती स्तरावर मसाला निर्मितीचा विचार केला. यासाठी त्यांनी २०१६ मध्ये पौड पंचायत समितीच्या माध्यमातून मसाला निर्मितीसाठी प्रशिक्षण घेतले. 

गटामार्फत मसाला, लोणचे निर्मिती
ज्योती सातव यांची दोन एकर शेती असून, भात, गहू पिकांच्याबरोबरीने भाजीपाला लागवड करतात. हापूस आंब्याची जुनी सहा कलमे आहेत. ज्योतीताईंनी मसाला निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गावातील अकरा महिलांना  सोबत घेत २०१६ साली स्वयंसिद्धा महिला बचत गटाची सुरुवात केली. सध्या बाजारपेठेच्या मागणीचा विचार करून गटातर्फे सहा प्रकारचे मसाले आणि पाच प्रकारच्या लोणच्यांची निर्मिती केली जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार मसाल्याचे १०० ग्रॅम, २५० ग्रॅम,५०० ग्रॅम आणि एक किलो वजनाचे पॅकिंग करून, त्याची विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये विक्री केली जाते.परिसरातील शाळांमध्येही बचत गटाने मसाला उद्योगाची जाहिरात केल्याने पालकांच्याकडून मागणी आहे.  स्वाद आणि गुणवत्तेमुळे दरवर्षी मागणी वाढत आहे.     

ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन गटातर्फे कांदा-लसूण मसाला, चहा मसाला, बिर्याणी मसाला, पुलाव मसाला, कोल्हापुरी मसाला, मत्स्य पदार्थांसाठी मालवणी मसाला, गोडा मसाला निर्मिती केली जाते. या मसाल्याचा प्रति किलोचा दर ६०० रुपये आहे. कैरी, मिरची, कारले, लिंबू, आवळा लोणचे ३०० रुपये प्रति किलो  दराने विकले जाते. वर्षभरात मसाला, लोणचे विक्रीतून सुमारे दीड लाख रुपयांची उलाढाल होते. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गाव परिसरातील लहान उद्योग समूह बंद झाले आणि कंपन्यांमधील कामगारांचे कुटुंब गावाकडे गेले असल्याने मागणी कमी झाली. त्यामुळे निर्मितीचा वेग कमी झाला होता. परंतु पुन्हा एकदा यंदाच्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणावर मसाला, लोणचे उत्पादन आणि विक्रीचे नियोजन महिला गटाने आहे. 

‘लुपीन’ची साथ 
गावातील महिला गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी लुपीन फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या कंपनीमध्ये दर शुक्रवारी स्थानिक महिला बचत गटांतर्फे उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. दर आठवड्याला साधारणपणे पाच ते सहा हजार रुपयांची विक्री होत असल्याचे सातव यांनी सांगितले.मसाले, लोणचे निर्मिती बरोबर ज्योती सातव यांनी सुरेखा सातव, अनिता आल्हाट, रोहिणी आल्हाट, वैशाली नाणेकर यांच्या सोबत सेंद्रिय शेतीकडे वाटचाल सुरु केली आहे. लुपीन फाउंडेशनच्या वतीने गटातील महिलांना शेणखत, जिवामृताबरोबर सेंद्रिय शेती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. 

सेंद्रिय शेतीकडे वाटचाल 
उपलब्ध पाणी आणि जमिनीनुसार प्रत्येक सदस्याने सरासरी दहा गुंठे क्षेत्रावर चक्राकार पद्धतीने भाजीपाला लागवडीचे नियोजन केले आहे. यामध्ये टोमॅटो, मिरची,वांगी, मेथी, कोथिंबीर,आळू, चवळी, शेपू, पालक या भाज्यांचा समावेश आहे. महिला गटातर्फे सेंद्रिय भाजीपाला विक्रीचा पहिलाच प्रयोग असून लवळे परिसरातील दोन गृहनिर्माण सोसायट्यांसोबत चर्चा झाली आहे. त्यांच्या मागणीनुसार प्रत्येक आठवडा किंवा मागणीनुसार भाजीपाला पुरवठा केला जाणार आहे. येत्या काळात भाजीपाल्याची मागणी वाढल्यास महिला शेतकरी गट स्थापन करून याद्वारे सेंद्रिय भाजीपाला उत्पादन, खरेदी आणि विक्री सुरु करण्यात येणार आहे. गटातर्फे शिवारफेरीचेदेखील आयोजन केले जाते.

गटातर्फे गाव परिसरातील शेतकऱ्यांकडूनही भाजीपाल्यासोबतच भात, गहू, कडधान्ये अशा  शेतीमाल  खरेदीचे नियोजन आहे.  स्थानिक शेतकऱ्यांनाही योग्य दर मिळतील, असा प्रयत्न आहे. येत्या काळात गटातर्फे दूध प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात येणार आहे.

  उत्पादनाची वेगळी ओळख
लवळे परिसरातील सिम्बायोसिस संस्थेमधील कला शाखेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून स्वयंसिद्धा बचत गटाच्या विविध उत्पादनांचे लोगो तयार करून दिले. 

गटाच्या माध्यमातून आम्ही मसाले व लोणच्याच्या उत्पादनाला सेंद्रिय भाजीपाला उत्पादनाची जोड दिली आहे.सध्या प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक सदस्याने दहा गुंठ्यावर भाजीपाला लागवड केली आहे. यामध्ये मेथी, कोथिंबीर, पालक, आळू, शेपू, चवळी लागवड आहे. येत्या काळात  परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सीताफळ, पपई, पेरू आणि चिकू विक्री केली जाणार आहे.
- ज्योती सातव,  ७२१८७९९७६०, 
(प्रमुख, स्वयंसिद्धा महिला बचत गट)


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
ट्रायकोडर्मा निर्मितीसाठी शेतात उभारली...राहुल रसाळ यांनी शेत परिसरात छोटेखानी प्रयोगशाळा...
गुणवत्तापूर्ण आंब्याला मिळवली ग्राहक...मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) येथील विद्याधर...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
ग्राम, पर्यावरण अन शेती विकास हेच ध्येय...चांदूररेल्वे (जि. अमरावती) येथील साईबाबा ग्रामीण...
बचत अन् पूरक उद्योगातून आर्थिक...भाजीपाला लागवडीसह कुक्कुटपालन, पशुपालन, शिलाईकाम...
तिसऱ्या पिढीने जपला प्रयोगशिलतेचा वारसागोलटगाव (जि. औरंगाबाद) येथील कृषिभूषण सुदामअप्पा...
शेतीमाल मूल्यवर्धनात दत्तगुरू कंपनीची...हिंगोली जिल्ह्यातील प्रयोगशील व अनुभवी शेतकरी...
गाजराचे गाव म्हणून कवलापूरची ओळखकवलापूर (जि. सांगली) गावातील शेतकऱ्यांनी...
सेंद्रिय, रासायनिक पद्धतीने दर्जेदार...मुर्ठा (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील युवा...
फळबाग केंद्रित व्यावसायिक शेतीचा उभारला...ओणी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील कृषी...
वाशीच्या बाजारात लोकप्रिय झेंडेचा अंजीर...दुष्काळी पुरंदर तालुक्यात दिवे येथील झेंडे कुटुंब...
श्‍वानपालन रुजविले, यशस्वी केलेमातृतीर्थ सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) येथील अतुल...
फळबागेच्या नेटक्या नियोजनातून आर्थिक...कुंडल (जि. सांगली) येथील महादेव आणि नाथाजी हे लाड...
महिला, शिक्षण अन्‌ ग्रामविकासातील ‘...कानडेवाडी (ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापूर) येथे...
ब्रॅंडेड अंजीर, सीताफळाला मिळ लागली...अंजीर व सीताफळ या पुरंदर तालुक्यातील (जि. पुणे)...
कांदासड रोखण्याऱ्या तंत्राची अभियंता...नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील कल्याणी शिंदे या...
कोकणात फुलला कॉफीचा मळारत्नागिरी - कोकण म्हटलं की आपल्याल्या चटकन आठवतो...
रेशीम उत्पादकांचे गाव, त्याचे बान्सी...सिंचन सुविधांचा अभाव असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील...