agricultural news in marathi success story rane family from jalgaon district doing profitable brinjal cultivation | Agrowon

वांगे भरीत पार्टीद्वारे व्यवसाय मूल्यवृद्धी

चंद्रकांत जाधव
शनिवार, 9 ऑक्टोबर 2021

डांभुर्णी (ता. यावल, जि. जळगाव) येथील राणे कुटुंबाने अनेक वर्षांपासून भरीत वांग्याची शेती जोपासली आहे. त्यापुढे जात ग्राहकांसाठी अस्सल पारंपरिक चवीच्या भरीत पार्टीचे आयोजन करून व्यवसायवृद्धी केली. 

डांभुर्णी (ता. यावल, जि. जळगाव) येथील राणे कुटुंबाने अनेक वर्षांपासून भरीत वांग्याची शेती जोपासली आहे. त्यापुढे जात ग्राहकांसाठी अस्सल पारंपरिक चवीच्या भरीत पार्टीचे आयोजन करून व्यवसायवृद्धी केली. स्थानिक ग्राहकांकडूनही त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रतिदिन अडीच क्विंटल भरीत विक्रीपर्यंत मजल गाठून राणे यांनी अर्थकारण अजून सक्षम केले आहे.

जळगाव शहरापासून डांभुर्णी (ता. यावल) हे २० किलोमीटरवरील गाव आहे. तापी नदीला येऊन मिळणाऱ्या उपनद्या, नाले शिवारातून जातात. शिवारात काही भागात जलसाठे मुबलक आहेत तर जमीन काळी कसदार, मध्यम आहे. केळी, कापूस, भाजीपाला उत्पादनासाठी हा परिसर प्रसिद्ध आहे. गावातील अरुण रामकृष्ण राणे यांची १३ एकर शेती आहे. पुत्र संदीप आणि पंकज यांच्यासमवेत ते ही शेती कसतात. दोन कूपनलिका आहेत. केळी या मुख्य पिकासह पारंपरिक पद्धतीने भरीत वांग्याच्या शेतीचा ४० वर्षांपासून अनुभव आहे.   

उभारले भरीत सेंटर 
पूर्वी वांग्याची आठवडी बाजारात विक्री व्हायची. परंतु पारंपरिकतेत अडकून न राहता मूल्यवर्धनाद्वारे भरीत सेंटर सुरू केल्यास उत्पन्नात वाढ करता येईल, असा विचार संदीप यांनी केला. 

जळगाव शहर परिसरात सुमारे १० भरीत सेंटर्स होती. शिवाय आपले ठिकाण शहरापासून तुलनेत दूर असल्याने खवय्यांचा किती प्रतिसाद मिळेल असे दोन मोठे प्रश्‍न होते. मात्र सारासार विचार, अभ्यास व व्यावसायिक गणिते ओळखून डांभुर्णी- दोनगाव रस्त्यावरील आपल्या शेतात साईराम भरीत या नावाने सेंटर सुरू केले. सुमारे दोन एकर जागा त्यासाठी राखीव ठेवली. यात वाहनांच्या पार्किंगचाही विचार केला. छोटेसे काउंटर दर्शनी भागात आहे. मागे चुलीवर भरीत निर्मिती, पुऱ्या तळण्याची प्रक्रिया सुरू असते. सुरुवातीपाला १० किलो, २० किलो भरीत विक्री व्हायची. मात्र निर्मितीमधील पारंपरिकता, शुद्धता यामुळे सेंटरला चांगला प्रतिसाद मिळू लागला.

पारंपरिक पद्धतीने निर्मिती
जळगाव जिल्ह्यात आरपट्टी व पारपट्टी, म्हणजेच तापीच्या अल्याड व पल्याड शेतकऱ्यांनी चवदार भरीत निर्मितीची पारंपरिक पद्धती विकसित केली आहे. या भरताला उत्कृष्ट चव शिवाय ग्राहकांची मागणी असते. शहरांतील भरीत सेंटरमध्ये ही पद्धती अमलात आणणे शक्य होत नाही. राणे यांच्याकडील पारंपरिक पद्धतीतही वांगी पऱ्हाटी, तुरकाटी किंवा बाभळीच्या काटेरी झुडपांवर भाजली जातात. मग सोलणी, लाकडी ठेचणीचा वापर व चुलीवर भरीत तयार केले जाते. 

केळी, रामफळातही हातखंडा
राणे यांचा उत्कृष्ट केळी पिकवण्यातही हातखंडा तयार झाला आहे. थेट जागेवर केळीची विक्री होते. दर्जेदार उत्पादनामुळे खरेदीदारांकडून मागणी असते. रामफळाची ३५ झाडे बांधावर आहेत.काढणीचा खर्च वगळता अन्य कुठला खर्चा फारसा येत नाही. रामफळ ५० रुपये प्रति किलो दराने विकले जाते. प्रति झाड दोन ते अडीच क्विंटल उत्पादन मिळते. तीन डेरेदार आम्रवृक्षही आहेत. ते देखील उत्पन्नाचे स्रोत झाले. 

ग्राहक लुटतात निसर्ग- शेतीचा आनंद 
रामफळ, सीताफळ, आंब्याच्या झाडाखाली केळीच्या पानावर भरीत-पुरी, आमसूलच्या कढीच्या जेवणाचा आनंद घेऊन ग्राहक तृप्त होतात. काही जण भारतीय बैठक मांडून जेवण करतात. नजीक केळीचे शेत आहे. या निसर्ग- शेतीचा मनमुराद आनंद, सहवासही ग्राहकांना मिळतो. जळगाव, धुळे, रावेर, यावल, चोपडा आदी अनेक शहरांमधून खवय्ये राणे यांच्या सेंटरमध्ये येतात. पुरी-भरीत, कढी यासाठी स्वतंत्र दर नाहीत. प्रतिमाणसी १२० रुपये आकारले जातात. पार्सलची सुविधा आहे. त्यासाठी सकाळी आगाऊ नोंदणी करावी लागते. त्यानुसारच निर्मिती होते. विविध कार्यक्रमांना देखील मागणीनुसार भरीत-पुरीचा पुरवठा होतो. गुणवत्तेत कोणतीही तडजोड होत नाही. दररोज अडीच क्विंटलपर्यंत भरीत विक्री होते. सप्टेंबरअखेरीस सेंटर सुरू होते. गरजेनुसार बाजार किंवा थेट शेतकऱ्यांकडून ५० रुपये प्रतिकिलो दराने वांग्याची खरेदी केली जाते. दररोज पाच क्विंटल वांग्याची आवश्यकता असते. १५० रुपये प्रति किलो असा भरताचा दर आहे. 

...अशी असते भरताची पार्टी 
भरताच्या जेवणासोबत आमसूलची कढी, कळण्याची (उडीद, दादर ज्वारी) भाकरी असते. सोबत पातीचा बारीक कांदा, मुळा. केळीच्या पानावर हे जेवण वाढले जाते. शुद्ध शेंगदाणा तेलाचा उपयोग होतो. वांगी भाजण्यासाठी लहाड तयार केली आहे. घरची वांगी, त्याचा चवदारपणा शिवाय शुद्धता, पारंपरिकता व आदरातिथ्य यामुळे राणे यांच्या भरीत सेंटरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कुटुंबातील पाच सदस्य व्यवसायात पूर्णवेळ काम करतात. पहाटेच कामाला सुरुवात होते. वांगी भाजण्यासाठी काटेरी बाभळीचे सरपण, तुरकाट्या, पऱ्हाटी शेतात साठविण्यात येतात. हंगामात दररोज बैलगाडीभर बाभळीचे सरपण गोळा करण्याची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी दररोज ३०० रुपयांनुसार मजूर व दोन कामगार हंगामात नियुक्त केले जातात. 

- पंकज राणे,   ८६२४९३०७५५                    
संदीप राणे,   ९८९०९८१२३५


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची...पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले...
सुयोग्य व्यवस्थापनातून हरभरा पिकात तयार...बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी...
अॅपलबेरचे निर्यातक्षम उत्पादन. पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील...
ट्रॅक्टरचलित विविध यंत्रांद्वारे वेळ,...ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने पेरणी वा कोळपणी...
योग्य व्यवस्थापनातून वाढविला १९०...गोठा, म्हशींचे संगोपन व दूध विक्री या स्तरांवर...
दुग्धव्यवसायातून संयुक्त फोलाने...नगर जिल्ह्यात कुकाणे येथील संयुक्त फोलाने...
संघर्षातून फुलले शेतीमध्ये 'नवजीवन'अवघी दोन एकर जिरायती शेती. खाण्यापुरती बाजरी...
झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळखजळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी...
प्रयत्नशील व प्रयोगशीलतेचा पडूळ...लाडसावंगी (जि.. औरंगाबाद) येथील प्रयोगशील, जिद्दी...
देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीसाठी...कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने...
फळे- भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म...नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (...
दुग्ध व्यवसायातून बसविली आर्थिक घडीसातारा जिल्ह्यात कोपर्डे (हवेली) येथील कैलास...
निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात देशमुख...सुलतानपूर (जि. नगर) येथील विजय देशमुख यांनी नऊ...
डाळ निर्मिती उद्योगातील ‘अनुजय' ब्रॅण्डढवळी (ता.वाळवा,जि.सांगली) येथील सौ.चारुलता उत्तम...
महिला गटाने दिली कृषी,ग्राम पर्यटनाला...पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेने मार्गासनी (ता....
वांगे भरीत पार्टीद्वारे व्यवसाय...डांभुर्णी (ता. यावल, जि. जळगाव) येथील राणे...
लाकडी घाण्याद्वारे दर्जेदार तेल, खाद्य...अकोला जिल्ह्यातील अकोट येथील कांचन अशोकराव चौधरी...
भिडी गावाने उभारल्या अवजारे बॅंका,...काळाची पावले ओळखत विदर्भातील अनेक गावांनी...