agricultural news in marathi success story of sanjay tadage from nashik district doing kankrej cow raring | Page 2 ||| Agrowon

कांकरेड गोपालनासह मूल्यवर्धित उत्पादनेही

मुकुंद पिंगळे 
गुरुवार, 8 जुलै 2021

नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद येथील संजय ताडगे यांनी शास्त्रीय व व्यावसायिक दृष्टिकोनातून कांकरेज या देशी गोपालनाचा आदर्श तयार केला आहे. दुग्धजन्य पदार्थ, गोमूत्र व शेणाचे मूल्यवर्धन करून विविध उत्पादनेनिर्मिती व त्यास सक्षम बाजारपेठही मिळवली आहे.  
 

नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद येथील संजय ताडगे यांनी शास्त्रीय व व्यावसायिक दृष्टिकोनातून कांकरेज या देशी गोपालनाचा आदर्श तयार केला आहे. दुग्धजन्य पदार्थ, गोमूत्र व शेणाचे मूल्यवर्धन करून विविध उत्पादनेनिर्मिती व त्यास सक्षम बाजारपेठही मिळवली आहे.  

नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद येथील संजय ताडगे यांचे वडील सुकदेव व आई कमल शेती व पारंपरिक दुग्ध व्यवसाय करायचे. देशी गोवंशावर त्यांचे विशेष प्रेम होते. हीच प्रेरणा संजय यांना मिळाली. महाराष्ट्र एसटी परिवहन मंडळात त्यांनी २६ वर्षे नोकरी केली. सन २०१८ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेत देशी गोपालन पूर्णवेळ व पूर्ण क्षमतेने करण्याचे त्यांनी ठरवले. कुटुंबीयांचा कडाडून विरोध झाला. तरीही डॉ. प्रशांत योगी यांचे शास्त्रीय मार्गदर्शन घेत जिद्दीने व्यवसायात आगेकूच केली. विविध ठिकाणी देशी गोवंश संगोपन प्रशिक्षण घेतले. व्यवसाय आधारित उत्पादनांची बाजारपेठ, जोखीम, आर्थिक ताळेबंद यांचा अभ्यास केला.  

‘कांकरेज’ची निवड 
कांकरेज हा देशी गोवंश गुजरातमधील कच्छ रणभागात मोठ्या प्रमाणात आढळतो. प्रेमळ, सशक्त व दररोज सात लिटर दूध देण्याची क्षमता अशी तिची वैशिष्ट्ये आहेत. हा अभ्यास करून भांडवल उपलब्धतेनुसार बनासकंठा व भूज येथे जाऊन १५ जातिवंत गाभण कांकरेज गायींची प्रति ४५ हजार रुपयांप्रमाणे खरेदी केली. नैसर्गिक रेतनासाठी दांतीवाडा कृषी विद्यापीठांच्या ‘कांकरेज गोवंश संशोधन व संवर्धन केंद्रातून ५५ हजार रुपये किमतीचा जातिवंत नंदी आणला. 

सुकमल देशी गोसंवर्धन  

 • ‘सुदृढ गाय अन् गुणवत्तापूर्ण शुद्ध दूध’ संकल्पनेवर आधारित २० गुंठ्यांत व्यवसाय.
 • वडील व आई यांच्या प्रेरणेमुळे दोघांच्या नावाची अक्षरे घेऊन ‘सुकमल देशी गोसंवर्धन’ असे नामकरण.
 • मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब. दुभत्या, गाभण गायी व वासरांसाठी स्वतंत्र व्यवस्था.
 • स्वच्छता व निर्जंतुकीकरणाकडे विशेष.
 • पहाटे साडेपाच ते संध्याकाळी उशिरापर्यंत कामांत व्यस्तता  सध्या १४ गायी, ५ कालवडी, १ नंदी, ६ गोऱ्हे व ४ वासरे.   

व्यवस्थापनातील ठळक बाबी  

 • दैनंदिन कामकाज नोंदी. (आहार, आजारपण, उपचार) 
 • प्रत्येक गायीचे नामकरण व टॅगिंग. 
 • मजूरटंचाईवर मात करत स्वयंचलित दूध काढणी यंत्र     बदलत्या ऋतुमानात बैठकीसाठी रबर मॅटचा वापर  दर तीन महिन्यांनी आयुर्वेदिक पद्धतीने जंतनिर्मूलन  दरवर्षी जुलैत लाळ्या खुरकूत, घटसर्पासाठी लसीकरण  स्वच्छ व शुद्ध पाण्यासाठी टाक्यांमध्ये दर १५ दिवसांनी चुन्याच्या निवळीची प्रक्रिया.     खनिज द्रव्यांच्या पूर्ततेसाठी चाटणविटांची सोय. दर महिन्याला ५० किलो सैंधव मिठाची आहारात मात्रा.

चारा व पशुखाद्य व्यवस्थापन  

 • गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनासाठी पाच एकरांत सेंद्रिय पद्धतीने ऊस, नेपिअर गवत, लसूणघास. 
 • यंत्राद्वारे हिरव्या चाऱ्याची कुट्टी. 
 • जवस, तीळ, शेंगदाणे, मोहरी, खुरसणी या कच्च्या घाणीच्या ढेपांपासून घरगुती पद्धतीने पशुखाद्य निर्मिती. यात संतुलित प्रमाणात आवळा, हिरडा, बेहडा, शतावरी, सुंठ, हळद असे विविध आयुर्वेदिक घटक, सैंधव मीठ व खनिज द्रव्ये एकत्र करून एकसारखे दळून घेतले जातात.  
 • हिरव्या व सुक्या चाऱ्याचे योग्य संतुलन. 
 • कोरड्या खाद्यात कडधान्य चुनी, भाताचा कोंडा व मक्याचा भरडा.
 • डोंगराळ भागातून वाळलेले गवत, भाताचे तणस, भुईमूग पाला, गहू भुस्सा. 
 • गायी चरण्यासाठी मोकळ्या सोडल्या जातात. 

उत्पादने 
‘बिलोना’ पद्धतीने तूपनिर्मिती :  मातीचे भांडे, चुलीच्या उष्णतेवर दूध कोमट करून विरजण लावून दही, लोणी या प्रक्रियेतून तूपनिर्मिती केली जाते. ३० लिटर दुधापासून एक किलो तूप बनते.  

शेण-गोमूत्राचे मूल्यवर्धन  

 • गोमूत्र व निंबोळी अर्कापासून घर स्वच्छतेसाठी ‘गोनाईल  शेणापासून धूपबत्ती. गोवरी व कोळसा यापासून दंतमंजन
 • औषधी पंचगव्य नस्य, गोअर्क, पंचगव्य साबण, घनवटी अशी उत्पादने.
 • भाजीपाला रोपवाटिका व ‘टेरेस फार्मिंग’ करणाऱ्यांची मागणी अभ्यासून गोखूर शेणखत. शेण, गोमूत्र, गूळ व ताक मिश्रणातून ‘सजीव जल’. भाजीपाला उत्पादकांकडून ताकाची मोठ्या प्रमाणात मागणी. 

ब्रँडिंग, थेट विक्री  

 • ‘फूड सेफ्टी’ विषयातील (एफएसएसएआय) संस्थेचा परवाना. आकर्षक ब्रँडिंगसह रस्त्यालगत काउंटर. यात आई कमलबाई यांची मदत.
 • मागणीनुसार १०० रुपये प्रति लिटर दराने दूधविक्री. उत्पादनांचे आरोग्यदायी फायदे, त्यातील घटक यांची उपयुक्त माहिती प्रदर्शित.  

गोवंश सुधारण्यावर भर  
व्यवसायाची वार्षिक उलाढाल २५ लाखांपर्यंत नेली आहे. मात्र जातिवंत कालवड पैदास कार्यक्रम हा अर्थकारणाचा उद्देश ठेवून कामकाज सुरू आहे. रेतनासाठी जातिवंत नंदीचा वापर तीन वर्षे केला जातो. जन्मलेल्या वासराला पहिले दोन महिने भरपूर दूध पाजले जाते. गाय जितकी समाधानी तितकी दूध अधिक देते असे संजय सांगतात. २४ महिने पूर्ण झाल्यानंतर कालवडीचे रेतन केले जाते.  

कुटुंबाला लागला लळा 

 • ताडगे कुटुंब सुशिक्षित असून संजय यांचे भाऊ निनाद,अजित यांच्यासह कुटुंबीयांचाही सहभाग.
 • सर्वांना गायींचा लळा.
 • संजय यांचे पुत्र अनंत नोकरी सांभाळून, तर पुतणे अर्चित व पुरुषोत्तम शिक्षण घेत मदत करतात.
 • गोपालनातील आनंदातून रक्तदाब, दवाखाना कमी झाला. 
 • अध्यात्म व विज्ञान यांची व्यवसायात सांगड. 
 • देशभरातील गोपालकांच्या ‘स्मार्ट काऊ ओनर्स’ या समूहाचे संजय सदस्य. त्याद्वारे माहितीचे आदानप्रदान. 

- संजय ताडगे  ९४२१९३८८८८


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
केळी निर्यातीत ‘सुरचिता’चे पदार्पण करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुरचिता ॲ...
फळबागांसाठी प्रसिद्ध झाले सोनोरीपुणे जिल्ह्यात सासवड शहरापासून काही किलोमीटरवर...
पेठमधील मोगऱ्याचा नाशिकमध्ये दरवळनाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात आदिवासी...
सणासुदीच्या आशेवर कोल्हापूरचा फुलबाजार...गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत कमी दरांवर...
यांत्रिकी पूरक उद्योग ठरताहेत...औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील आठवडी...
दर्जेदार रेशीम कोष उत्पादनात पाटील...जळगाव जिल्ह्यात देवपिंप्री येथील विकास पाटील...
उपक्रमशीलतेतून महिला झाल्या सक्षमटिमटाळा (जि.अमरावती) येथील सरस्वती स्वयंसाह्यता...
सुरू उसाचे एकरी १२२ टन उत्पादनअभ्यासपूर्ण, शास्त्रीय व्यवस्थापन व तंत्रज्ञान या...
बटाटा चिप्सचा ‘नेचर टॉप’ ब्रॅण्डपुणे जिल्ह्यातील साबळेवाडी येथील आदेश सुदाम काटकर...
आधुनिक तंत्र शेतीच्या लाटेवर मंगरूळपरभणी जिल्ह्यातील मंगरूळ बुद्रूक गेल्या चार...
बारमाही भाजीपाला उत्पादन : ‘गेडेकर...सुसूत्रता, पीक विविधता, तंत्रज्ञानाचा प्रभावी...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून जोपासलेली नारळ...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता. वेंगुर्ला)...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
पंचवीस वर्षांपासून सीताफळाची जोपासनासांगली जिल्ह्यात अंजनी (ता.. तासगाव) येथील...
उस्मानाबादी शेळ्यांचा यशस्वी जोपासलेला...परभणी शहरापासून नजीक पारवा शिवारात सतीश रन्हेर व...
जल प्रदूषण मुक्तीसाठी ‘गोदावरी नदी संसद...नांदेड जिल्ह्यात ‘गोदावरी नदी संसद’ ही जलसंवर्धन...
भाजीपाला, पूरक उद्योगातून गटांची प्रगतीरत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गटातील सदस्यांनी...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
खोडवा उसाची अधिक उत्पादनक्षम शेती.महाराष्ट्र- कर्नाटक राज्याच्या सीमेवरील सिदनाळ (...
कृषीसह पिंपळगावाने केले वसुंधरेलाही...नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत गावाचा कृषी...