agricultural news in marathi success story of Shevantamata Farmer Producer Company from nanded district | Page 2 ||| Agrowon

औषधी वनस्पती प्रयोगासाठी ‘शेवंतामाता’ सरसावली

कृष्णा जोमेगावकर
शनिवार, 21 ऑगस्ट 2021

नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथे शेवंतामाता शेतकरी उत्पादन कंपनीने सभासदांची आर्थिक सक्षमता वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवून विविध उपक्रम सुरू केले आहेत. अश्‍वगंधा, अन्य औषधी वनस्पती व बांबू लागवडीतून कंपनीने शेतीची व उत्पन्नाची वेगळी वाट पकडली आहे.
 

नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथे शेवंतामाता शेतकरी उत्पादन कंपनीने सभासदांची आर्थिक सक्षमता वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवून विविध उपक्रम सुरू केले आहेत. अश्‍वगंधा, अन्य औषधी वनस्पती व बांबू लागवडीतून कंपनीने शेतीची व उत्पन्नाची वेगळी वाट पकडली आहे.

नांदेड जिल्ह्यात कयाधू नदीच्या काठावर सुपीक शेतीचा प्रदेश म्हणून हदगाव तालुक्यातील निवघा बाजार परिसराला ओळख आहे. काळी कसदार भारी जमीन असल्यामुळे या भागात अनेक पिके जोमदार येतात. इसापूर प्रकल्पाचे पाणी काही भागाला मिळत असले, तरी बारमाही पाण्याची सुविधा सर्वच ठिकाणी नाही. या भागात सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, हरभरा, गहू, करडई अशी हंगामी पिके घेण्यात येतात. अनेक प्रयोगशील शेतकरी या भागात आढळतात. यामध्ये निवघा येथील बालासाहेब कदम, गजानन शिंदे यांचा समावेश होतो. त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून शेवंता माता फार्मर प्रोड्यूसर कंपनी सुरू करण्याचे ठरवले. डिसेंबर २०१८ मध्ये नोंदणीकरणही झाले.

उपक्रमांची आखणी
शेतकऱ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी राष्ट्रीय ‘नाबार्ड’ने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठबळ दिले. यासाठी जिल्हा विकास व्यवस्थापक राजेश धुर्वे तसेच स्वयंसेवी संस्थेचे रमेश राठोड यांचे सहकार्य लाभले. सभासद शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणे हे कंपनीच्या अनेक उद्दिष्टांपैकी महत्त्वाचे उद्दिष्ट होते. त्यानुसार विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली.

सध्या कंपनीचे १२ संचालक आहेत. केवळ गाव परिसरापुरती कंपनी हा उद्देश न ठेवता जिल्ह्याभर सभासद संख्या वाढवण्यासाठी परिसरात दौरा सुरू केला. शेतकऱ्यना कंपनीचे महत्त्व सांगण्यात आले. आजमितीला बाराशे पर्यंत सभासदांची नोंदणी झाली आहे. एक जुलै,२०२० रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना समभाग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

अंमलबजावणी
शेतकऱ्यांना वर्षभर लागणाऱ्या निविष्ठा रास्त दरात मिळाव्यात यासाठी कंपनीतर्फे कृषी निविष्ठा केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामाध्यमातून खते, बियाणे, कीडनाशकांचा पुरवठा करण्यात येत आहे. कंपनीतील तज्ज्ञ संचालक ज्योतीताई देशमुख व संचालकांनी कोरोना संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. सोयाबीन बीजप्रक्रिया, धान्य स्वच्छता व प्रतवारी, कीड-रोगनियंत्रण आदींबाबत शिबिरे घेतली. कृषी विभागाचेही त्यासाठी सहकार्य लाभले.

नाफेडचे धान्य खरेदी केंद्र
कंपनीची मासिक सभा वेळेत घेण्यात येते. हस्तरा रस्त्यावर कार्यालय सुरू केले आहे. यात वेळोवेळी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय घेण्यात येतात. सभासदांचा शेतीमाल खरेदी करता यावा यासाठी मागील वर्षी नाफेडकडून शासकीय धान्य खरेदी केंद्राला मान्यता मिळाली. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने खरेदी सुरू करण्यास प्रारंभही केला. मात्र बाजारपेठेतील दरांमुळे त्यास गती मिळाली नाही.

गांडूळ खतनिर्मिती
तालुक्यातील साप्ती येथे मागील वर्षी डिसेंबरमध्ये गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प सुरू केला. गाव उकिरडामुक्त करण्यासाठी ५० टक्के दराने गांडूळ बेडकिटचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले. यात शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. कंपनीकडील गांडूळ खताला बाजारात मागणी आहे. अडीचशे क्विंटल उत्पादनापैकी सुमारे १०० क्विंटल खताची विक्री झाली आहे. दर्जेदार खताचे पॅकिंग चाळीस किलोच्या बॅगेत केले जाते. सभासदांना प्रति किलो १० रुपये, तर इतरांना १५ रुपये दराने विक्री होते. लिटरला वीस रुपये दराने व्हर्मिवॉशचीही विक्री होते.

नॅपकिसानचे सहकार्य
प्रति सभासद एक हजार रुपये समभागातून भांडवल उभारणी झाली. अन्य कामांसाठी लागणाऱ्या रकमेसाठी नाबार्ड अंतर्गत ‘नॅपकिसान’कडून कंपनीला ५० लाख रुपयांचे अर्थसाह्य मंजूर झाले. पैकी २५ लाख रुपये कृषी सुविधा केंद्रासाठी मिळाले. शिवाय कंपनीने याबाबतचे उल्लेखनीय प्रयत्न म्हणून दोन लाख रुपयांचे अनुदानही देण्यात आले. यातून कंपनीच्या उपक्रमांना अजून बळकटी मिळणार असल्याचे कंपनीचे संचालक सांगतात.

बांबू लागवड प्रयोग
उत्पन्नाच्या नव्या वाटा शोधण्यासाठी बांबू य पिकाची निवड कंपनीने केली आहे. त्यासाठी संचालक मंडळाने कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या बांबू प्रकल्पाला भेट दिली. बांबूचे व्यावसायिक महत्त्व याबाबत कोळी येथे कार्यक्रम घेण्यात आला. येत्या काळात शेतकऱ्यांच्या पडीक, तसेच वहिती जमिनीतही बांबू लागवड करण्याचा प्रयत्न आहे.

औषधी वनस्पतीची शेती
कंपनीच्या माध्यमातून अश्‍वगंधा, तुळस, सफेद मूसळी, शतावरी, पाषाणभेदी यांसारख्या औषधी वनस्पतींची लागवड करण्याचा निर्णय सभासदांनी घेतला आहे. निवघा बाजार परिसरात सुमारे २२ एकरांवर शेतकऱ्यांनी मागील वर्षी औषधी वनस्पतीची लागवड केली आहे. पुणे स्थित एक कंपनी या प्रकल्पातील भागीदार असून त्यासोबत विक्रीचा करार झाला आहे. त्यानुसार अश्‍वगंधा खरेदी वीस हजार रुपये प्रति क्विंटल दराने करण्यात येत आहे.

मागील वर्षी त्याच्या मुळांचे उत्पादन मिळाले. शेतकऱ्यांनी बियाणे तयार करून त्याची विक्री १२० ते १२५ रूपये प्रति किलो दरने केली. कुटाराचीही तीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री करण्यात येणार आहे. या सर्वांतून प्रति शेतकरी किमान एक लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. मागील वर्षी सभासदांना चांगले उत्पन्न मिळाल्यानेच यंदा शंभर एकरांवर सभासदांकडून अश्‍वगंधाची लागवड झाली आहे.

बालासाहेब कदम, अध्यक्ष - ८४८४८४८४१०
गजानन शिंदे, सचिव - ९७६७०४४९०२


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
रोपवाटिका व्यवसायासाठी ‘मॅट पॉट’...प्रगत देशामध्ये पर्यावरणपूरक पेपरपॉट निर्मितीसाठी...
जातिवंत दुधाळ गाई,म्हशींच्या पैदाशीसाठी...तामखडा (ता.फलटण,जि.सातारा) येथील प्रयोगशील...
गुलाबामध्ये तुळशीचे आंतरपीक ठरतेय...कोरोना संकट ही संधी समजून कवडी माळवाडी (ता. हवेली...
तीस वर्षांपासून फळपिकांमध्ये सातत्य...भोसे (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील कृषी पदवीधर डॉ...
वन्यप्राणी, संवर्धन, जनजागृतीसाठी ‘...मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वर्धा...
बटण मशरूमचा ‘कॅम्बीअम गोल्ड’ ब्रँडमूळचे जमालपूर (बिहार) येथील नीलकमल झा यांनी...
सेंद्रिय गुळाचा ‘यादवबाग’ ब्रॅण्ड !घरची वर्षानुवर्षांची ऊसशेती. मात्र मिळणाऱ्या कमी...
केळी, कापूस, जलसंधारणात झाली जळके...जळके (ता.जि. जळगाव) गावाने जलसंधारणात भरीव काम...
नागपूरला फुलला सीताफळाचा बाजारनागपूर येथील महात्मा फुले मार्केट सीताफळाने फुलले...
‘मार्केट डिमांड’नुसार देशी वांग्यांची...देशी वांग्याला अस्सल चव असल्याने...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
शेळी, कोंबडीपालनात युवा शेतकऱ्याची...बुलडाणा जिल्ह्यातील आडविहिर येथील युवा शेतकरी...
राधानगरीच्या दुर्गम भागात रेशीम शेतीचे...पारंपरिक ऊस, भात य पारंपरिक शेतीपेक्षा थोड्या...
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...