agricultural news in marathi success story Strawberries bloom in Devrukh area | Agrowon

देवरूख भागात फुलली स्ट्रॉबेरी

राजेश कळंबटे
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

महाबळेश्‍वरसारख्या थंड प्रदेशात मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येणारी स्ट्रॉबेरी कोकणातील लाल मातीमध्येही उगवू लागली आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील देवरूख (जि. रत्नागिरी) येथील शैलेश भस्मे यांनी दीड एकरांवर मागील वर्षी स्ट्रॉबेरीचा प्रयोग केला आहे.

महाबळेश्‍वरसारख्या थंड प्रदेशात मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येणारी स्ट्रॉबेरी कोकणातील लाल मातीमध्येही उगवू लागली आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील देवरूख (जि. रत्नागिरी) येथील शैलेश भस्मे यांनी दीड एकरांवर मागील वर्षी स्ट्रॉबेरीचा प्रयोग केला आहे. फळांच्या विक्रीबरोबरच स्ट्रॉबेरीपासून सिरप, क्रश, पोळी आदी नावीन्यपूर्ण उत्पादनांची निर्मितीही त्यांनी केली आहे. त्यास चांगली बाजारपेठ मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

समाधानकारक उत्पादन 
भस्मे म्हणाले, की स्ट्रॉबेरी फळास थंडी चांगली मानवते. देवरूख भागात असे हवामान उपलब्ध असल्याने या भागात या पिकाची लागवड काही शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. साधारण १४ ते १७ अंश सेल्सिअस तापमान फायदेशीर ठरत आहे. याच भागातील पूर्वी प्रयोग केलेल्या शेतकऱ्यांनी मार्गदर्शन केले आहे. सुमारे ५० दिवसांत उत्पादनाला सुरुवात झाली. दिवसाला सरासरी सध्या १०० किलो स्ट्रॉबेरी मिळत आहे. देवरूख, चिपळूण भागांत किरकोळ व्यावसायिक आहेत. ते शेती पाहण्यासाठी येतात. त्यांनाच विक्री होत आहे. सध्या २५० ते ३०० रुपये प्रति किलो दर मिळत आहे. आतापर्यंत सुमारे ८०० ते ९०० किलोपर्यंत विक्री झाली आहे. साधारण एप्रिलपर्यंत प्लँट ठेवण्याचा विचार आहे. त्यामुळे एक टनाच्या पुढे उत्पादन मिळेल. 

स्ट्रॉबेरीवर प्रक्रिया 
अनेक वेळा ताज्या फळांचे दर कमी झाले, की त्यातून शेतकऱ्याला तोटा होत असतो. अशावेळी प्रक्रिया व मूल्यवर्धन केल्याने नफ्यात वाढ होऊ शकते. भस्मे यांनी देखील हीच संकल्पना कृतीत आणली आहे. त्यांनी मागील वर्षापासून आवळा कॅण्डी, हापूस आंब्याचे पन्हे आदी उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली आहे. स्ट्रॉबेरीपासूनही त्यांनी क्रश, सिरप, कॅण्डी यांसारखे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

स्ट्रॉबेरी क्रशचा उपयोग केक, तसेच अन्य खाद्य उत्पादनांमध्ये होत असल्याने तत्सम व्यावसायिकांकडून त्यास चांगली मागणी असते. सध्या एक टन क्रश तयार केला असून, २६० रुपये प्रति किलो असा त्याचा दर आहे. आंबा पोळीच्या धर्तीवर स्ट्रॉबेरी पोळीसारखे नावीन्यपूर्ण उत्पादनही तयार केले आहे.स्थानिक व्यावसायिकांसोबत बोलणे झाले असून, त्यामार्फत विक्रीचा विचार आहे.  

स्ट्रॉबेरीपासून ३०० ते ४०० किलो कॅण्डीही तयार केली असून, त्याचा ४०० रुपयांपर्यंत दर असेल.  भस्मे म्हणाले, की देवरूख संगमेश्‍वर रस्त्यावर माझे शेत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांची संख्याही भरपूर असते. त्यामुळे शेताजवळच स्टॉल उभारून थेट विक्रीही करता येते. स्ट्रॉबेरीची सुट्टीच्या दिवशी ३० ते ३५ किलोपर्यंत थेट विक्री होते.  

कलिंगड, मिरचीची साथ 
भस्मे यांनी यापूर्वी २० गुंठ्यांत कलिंगड व त्यात मिरचीचे आंतरपीक  घेतले होते. कलिंगडाचे त्यांना १० टनांपर्यंत उत्पादन मिळाले. त्यास प्रति किलो १० रुपये दर मिळाला. तर ७०० किलोपर्यंत मिरची मिळून ५० रुपये प्रति किलो दर मिळाला. 

स्ट्रॉबेरी पोळी, कॅण्डी व क्रशही 
कोकणातील रत्नागिरी जिल्हा आंबा, काजू, नारळ आदी पिकांसाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील संगमेश्‍वर तालुक्यात असलेल्या देवरुख येथील शैलेश भस्मे प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत.  त्यांची तीन एकर शेती आहे. पंधरा वर्षांपासून कलिंगड, पपई, मिरची यांसारखी विविध पिके ते घेत आहेत. शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करणारे भस्मे यांनी नावीन्यपूर्ण प्रयोग म्हणून मागील वर्षी स्ट्रॉबेरीची निवड केली. त्यासाठी दीड एकर क्षेत्र निवडले. महाबळेश्‍वर भागातून रोपे आणून मागील वर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबरच्या दरम्यान पॉली मल्चिंगवर लागवड केली. प्रति रोप सात रुपयांना मिळाले. साधारण २७ हजार रोपे नियोजित क्षेत्रात बसली. 

नवे प्रयोग करण्याच्या उद्देशाने स्ट्रॉबेरी लागवडीचा निर्णय घेतला. आमच्या भागात या फळाची लागवड यशस्वी होत असल्याचे दिसते आहे. स्थानिक बाजारातही मागणी असून, प्रक्रिया पदार्थांमुळे नफ्याचे गणित बांधता येत आहे. 
- शैलेश भस्मे  ९०२१८५८५८०


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पॅलेट स्वरूपातील कोंबडी खतनिर्मितीनाशिक जिल्ह्यातील बल्हेगाव (ता. येवला) येथील...
सुयोग्य व्यवस्थापनाचा आले शेतीतील आदर्शमौजे शेलगाव (खुर्द) (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद)...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
कडक जमिनींसाठी ठरतोय ‘व्हायब्रेटिंग...खोल जमिनीत तयार झालेला कडक थर फोडण्यासाठी तसेच...
पूरक व्यवसायांतून ‘नंदाई’ ने उभारले...साधारण अठरा वर्षांपूर्वी भावाने रक्षाबंधनाला शेळी...
शेतीचे शास्त्र अभ्यासून आदर्श बीजोत्पादनसवडद (जि. बुलडाणा) येथील विनोद मदनराव देशमुख या...
विषाणूजन्य रोग अन् ‘कीडमुक्त क्षेत्रा’...मागील वर्षी राज्यातील टोमॅटो पट्ट्यात कुकुंबर...
पुन्हा जोडतोय शेतीशीपुणे शहराजवळील पडीक शेत जमिनीवर ‘अर्बन फार्मिंग'...
देवरूख भागात फुलली स्ट्रॉबेरीमहाबळेश्‍वरसारख्या थंड प्रदेशात मोठ्या प्रमाणात...
मांस उत्पादनांची ‘ऑनलाइन’ विक्रीकोरोना संकटाच्या कालावधीत अनेकांच्या नोकरीवर गदा...
साठे यांचे लोकप्रिय पेढेयवतमाळ जिल्ह्यातील लोणीबेहळ (ता. आर्णी) येथील...
जलसमृद्धीतून मिळवली संपन्नता नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव (ता.चांदवड) गावाने...
फळबाग शेतीतून गवसला शाश्‍वत उत्पन्नाचा...कौडगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील अरुण बाबासाहेब...
गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादनात ‘मास्टर’सांगली जिल्ह्यातील नेहरूनगर (निमणी) (ता. तासगाव)...
विद्यार्थी बंधूंनी उभारला जैविक स्लरी...पुणे जिल्ह्यातील नानगाव येथील प्रतीक व प्रवीण या...
स्वादिष्ट हुरड्याचे उत्पादन अन् ‘...परभणी जिल्ह्यातील लिमला येथील तरुण शेतकरी...
भाजीपाला, फळबागेतून बसवली आर्थिक घडीसांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील सोमनाथ...
काटों पे चलके मिलेंगे साये बहार के...रुक जाना नहीं तू कहीं हार के काटों पे चलके...