agricultural news in marathi success story of surya farmer producer company from hingoli district | Agrowon

प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी

माणिक रासवे
मंगळवार, 22 जून 2021

तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या शेतकरी उत्पादक कंपनीने हळद पावडर, कडधान्ये, प्राथमिक प्रक्रिया व डाळ उद्योगातून १२ कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत झेप घेतली आहे.

तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या शेतकरी उत्पादक कंपनीने हळद पावडर, कडधान्ये, प्राथमिक प्रक्रिया व डाळ उद्योगातून १२ कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत झेप घेतली आहे. बदलती शेती व बाजारपेठेचा कानोसा घेत विविध व्यावसायिक उपक्रम सुरू करून राज्यात आपला ठसा उमटवला आहे.  

काही वर्षांपूर्वी केळीसाठी प्रसिद्ध असलेला वसमत तालुका (जि. हिंगोली) हळदीसाठी ओळखला जात आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळद मार्केट देशात प्रसिद्ध आहे. सातेफळ (ता. वसमत) येथील प्रल्हाद व कावेरी या बोरगड दांपत्याच्या पुढाकारातून २००४ मध्ये सूर्यकांता महिला शेतकरी बचत गट आणि अन्नदाता शेतकरी मंडळाची स्थापना झाली. त्यातून प्रक्रिया उद्योग व तंत्रज्ञान प्रसाराला चालना मिळाली. कालांतराने परिसरातील शेतकरी गट एकत्र येऊन नागनाथ शेतकरी उत्पादक संघ स्थापन झाला. त्यापुढे जाऊन २४ जानेवारी २०१५ मध्ये सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झाली. यात अध्यक्ष प्रल्हाद बोरगड, सचिव ज्ञानराज गव्हाणे, संचालक संभाजी सिद्धेवाड, सदाशिव पुंड, सोमेश्‍वर पतंगे, कावेरी बोरगड यांचा समावेश आहे. 

कंपनीविषयी 

 • वसमत-परभणी राष्ट्रीय महामार्गावरील तेलगाव शिवारात जमीन खरेदी शेड उभारून कंपनीच्या कामकाजास सुरुवात
 • सुरुवातीला तालुक्यातील सात गावांतील २०७ शेतकरी सभासद व भागभांडवल पाच लाख रु.
 • सध्या ३५ गावांतील ५४८ शेतकरी सभासद. भागभांडवल ३० लाख रु.
 • सभासदांच्या शेतमालाला चांगले दर मिळावेत यासाठी काढणीपश्‍चात, स्वच्छता- प्रतवारी. 

विक्री हे मुख्य उद्देश
सोयाबीन, तूर, हरभरा, हळद आदींची थेट उद्योजकांना विक्री. प्रक्रियेत मध्यस्थ नसल्याने कंपनीच्या सभासदांचा फायदा होत आहे.

उलाढाल

 • सन २०१६-१७- सुमारे ३३ लाख ७८ हजार रु.
 • पुढे ५३ लाखांपर्यंत, त्यानंतर २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये अनुक्रमे २ कोटी ९१ लाख रुपये आणि १२ कोटी ३६ लाख १३ हजार रु. 
 • पहिल्या वर्षी तोट्यात असलेल्या कंपनीच्या नफ्यात दरवर्षी वाढ.

हळद पावडर निर्मिती, विक्री...
कृषी विभागाच्या योजनेतून अर्थसाह्य मिळाल्यानंतर तेलगाव येथील शेडमध्ये हळद पावडरनिर्मिती संयंत्र बसविले. परिसरातील शेतकऱ्यांकडून हळकुंडे खरेदी करून सूर्या ब्रॅंडने राज्यासह देशभर विविध ठिकाणी प्रदर्शनातून हळद पावडरची विक्री होते. वर्षाकाठी १० टनांपर्यंत ही क्षमता पोहोचली आहे. हळदीच्या लोणच्यासह मूग, उडीद, तूर, हरभरा आदी डाळींचीही विक्री होते. 

कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत
सन २०१७ मध्ये ‘सूर्या’ कंपनीतर्फे वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत सुरू करण्यात आली. हळद, सोयाबीन, मूग, तूर, हरभरा आदींची खरेदी केली जाते. गेल्या चार वर्षांत ही उलाढाल तीन लाख ६९ हजार रुपयांवरून तीन कोंटी २८ लाखांवर पोहोचली आहे.

‘एनसीडीएक्स’च्या माध्यमातून विक्री
वसमत येथे नॅशनल कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सेंज (एनसीडीएक्स) यांची गोदाम व्यवस्था आहे. ‘फ्युचर मार्केट’च्या निकषानुसार ‘एनसीडीएक्स’ च्या व्यासपीठावर गुणवत्तापूर्ण हळदीची खरेदी केली जाते. बाजारातील दरांपेक्षा ५ ते १० टक्के अधिक फायदा होतो. गेल्या दोन वर्षांत त्याद्वारे ७१ लाख रुपयांची उलाढाल झाली.

कंपनीचे ठळक उपक्रम 

 • तीन वर्षांपासून तेलगाव येथे हमीभावाने सोयाबीन, तूर, हरभरा आदींची खरेदी.
 • गेल्या वर्षी सहा कोटी २५ लाख रुपयांचा हरभरा तर एक कोटी ३७ लाख रुपयांच्या तुरीची खरेदी.  शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन वसमत येथील गणेशपूर रस्त्यावरील केळी निर्यात सुविधा केंद्रातील जागा भाडेतत्त्वावर घेऊन हळद खरेदी सुरू.  
 • ‘एफपीओ’ मॉडेल - ई नाम (राष्ट्रीय कृषी बाजार), एफपीओ (शेतकरी कंपनी) मॅाडेल अंतर्गत   गेल्या एप्रिलमध्ये हळद खरेदी सुरू. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत खरेदी. या मॉडेल अंतर्गत शेतीमाल खरेदीचा हा देशातील पहिलाच यशस्वी प्रयोग असावा.  
 • पाच वर्षांत ९ कुशल, २१ अकुशल व्यक्ती, तर २१ महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध केली. 

बांगला देशात निर्यात 
गेल्या सप्टेंबरमध्ये नाशिक- मोहाडी येथील ‘सह्याद्री’ शेतकरी कंपनीच्या माध्यमातून बांगला देशात  ३०० टन हळदीची यशस्वी निर्यात झाली. वसमत येथून ट्रकद्वारे मुंबई येथील जवाहरलाल नेहरू बंदरामध्ये आणि तेथून जहाजांद्वारे ही प्रक्रिया घडली. 

कृषी तंत्रज्ञान प्रसार 

 • पीक लागवड व्यवस्थापन, प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानासाठी मेळावे, चर्चासत्र, प्रशिक्षण.
 • सुधारित वाणांचे बियाणे वाटप.
 • ‘बीबीएफ’ पद्धतीने सोयाबीन, हरभरा प्रात्यक्षिके. ‘ड्रोन’द्वारे फवारणी प्रात्यक्षिक.
 • जिल्ह्यात हळदीच्या सेलम वाणाचे क्षेत्र आहे. कंपनीतर्फे कुरकुमीनचे प्रमाण अधिक असलेल्या प्रतिभा वाणाचा दोन वर्षांपासून प्रसार. यंदा या वाणाच्या २५ एकरांवर लागवडीचे नियोजन. 
 • सेंद्रिय उसापासून रस, गन्ना गोला, गूळ विक्रीचा स्टॉल. 

आगामी प्रकल्प 

 • तेलगाव येथे व्हर्टिकल फार्मिगसाठी पाच गुंठ्यांत पॉलिहाउस उभारणी. हळद व मत्स्य उत्पादन घेण्यात येणार. शेडनेटमध्ये रोपवाटिका सुरू करण्यात येणार.  ‘पोकरा’अंतर्गत एक हजार टन क्षमतेच्या गोदामाची उभारणी.
 • स्मार्ट प्रकल्पांतर्गत हळद साठवणुकीसाठी शीतगृह, प्रयोगशाळा
 • ‘मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत निर्यात सुविधा
 • डाळ, पीठनिर्मिती युनिट सुरू करणार.
 • हळद साठवणूक, विक्रीसाठी बीम कंपनीसोबत सामंजस्य करार झाला आहे.
 • ई नाम तसेच अनेक पुरस्कारांनी सन्मानित.

- प्रल्हाद बोरगड  ९८५०३८५७२७


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
सोयाबीनमधील सुधारित तंत्र पोचले...परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पशुचिकित्सा व्यवसायी आंदोलनाने पशुसेवा...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती जिल्ह्यात १८३ जणांना ...अमरावती ः २०१७-१८ मध्ये फवारणीदरम्यान विषबाधेत...
पीकविम्यातील सूचनांचा केंद्राकडून...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांच्या...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साडेअकरा हजार...मुंबई ः राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे...
कोकणात काही ठिकाणी मुसळधार पुणे : कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस...
निविष्ठा वितरणातील अडचणींत लक्ष घालणार...पुणे ः राज्यात निविष्ठा वितरणात अडचणी येत असल्यास...
मराठवाड्यात सव्वा लाख हेक्टरवरील...औरंगाबाद : मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १००३...
साखरेचे किमान विक्री मूल्य तातडीने...कोल्हापूर : सध्या साखर उद्योग संकटात असून,...
सत्तावीस कीडनाशकांच्या बंदीविषयी अहवाल...पुणे ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने मागील वर्षी...
राज्यात 'शेतमाल तारणा'तून २७ कोटी...पुणे ः कृषी पणन मंडळाद्वारे बाजार समित्यांद्वारा...
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे...पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ...
कोकणात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र...