agricultural news in marathi success story of Sustainable agriculture and development of ghatanji village from yavatmal | Agrowon

शाश्‍वत शेती, ग्राम विकासाची गंगा

विनोद इंगोले
रविवार, 28 मार्च 2021

घाटंजी (जि.यवतमाळ) येथे १९९६ मध्ये विकासगंगा समाजसेवी संस्थेची स्थापना झाली. ग्राम आणि शेती विकास, मुलांचे शिक्षण, तसेच गावपातळीवरील महिलांचे सक्षमीकरण हा संस्थेचा उद्देश आहे. या उद्देशपूर्तीच्या दिशेने संस्थेची वाटचाल सुरू आहे. 

घाटंजी (जि.यवतमाळ) येथे १९९६ मध्ये विकासगंगा समाजसेवी संस्थेची स्थापना झाली. ग्राम आणि शेती विकास, मुलांचे शिक्षण, तसेच गावपातळीवरील महिलांचे सक्षमीकरण हा संस्थेचा उद्देश आहे. या उद्देशपूर्तीच्या दिशेने संस्थेची वाटचाल सुरू आहे. सेंद्रिय शेतीमाल उत्पादनाला प्रोत्साहन आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे. 

गेल्या तेवीस वर्षांपासून विकासगंगा स्वयंसेवी संस्था ही कृषी आणि ग्रामविकासाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. भंडारा, यवतमाळ, अमरावती, वर्धा, गोंदिया, हिंगोली, चंद्रपूर, वाशीम, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतील ४१६ गावांमध्ये १७ मित्र संस्थांच्या सहकार्यातून ही संस्था कार्यरत आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातील रंजित बोबडे संस्थेचे अध्यक्ष आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी स्वतःच्या पांढूर्णा खुर्द गाव परिसरातील शेतकरी, महिला गटांची बांधणी केली. महिलांमध्ये बचतीची सवय रुजवली. त्यामुळे सावकाराकडून कर्जाची उचल करण्याचे प्रमाण कमी होत गेले. 

महिला सक्षमीकरणाची चळवळ 
यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यासाठी संस्थेने ७०० महिला स्वयंसाह्यता समूहांची उभारणी केली. यासाठी घाटंजी आणि राळेगाव तालुक्‍यांना प्राधान्य दिले. महिला समूहांना बॅंकेशी जोडले. या माध्यमातून महिला समूहांना कर्जाची उपलब्धता झाली. या रक‍मेचा विनियोग महिला समूहांनी शेळी, कुक्‍कुटपालन उद्योगवाढीसाठी केला. आतापर्यंत सात शेतकरी कंपन्यांची उभारणी करण्यात आली असून, सात हजारांवर शेतकरी भागधारक जोडलेले आहेत. त्यामध्ये महिला समूहातील सक्रिय सदस्यांचा समावेश आहे. आजपर्यंत ६७७ बचत गटांच्या माध्यमातून सात हजारांवर महिलांना सावकारी कर्जातून मुक्‍त करण्यात आले. संस्थेने धूरमुक्‍त गावाची संकल्पना राबविली आहे. त्या अंतर्गत एलपीजी गॅसचे वाटप केले. घाटंजी, राळेगाव, पुसद तालुक्‍यांतील ७३ गावांमधील १,२९४ कुटुंबीयांना गॅस जोडणीचे वाटप करण्यात आले. 

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन 
पीक उत्पादन खर्च कमी होण्यासोबतच जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी कापूस, तूर या पिकांमध्ये सेंद्रिय व्यवस्थापन पद्धतीला प्रोत्साहन देण्यात आले. या उपक्रमात घाटंजी आणि राळेगाव तालुक्‍यातील सुमारे तीन हजार शेतकरी सहभागी झाले होते. तांत्रिक मार्गदर्शन, जैविक कीटकनाशक निर्मिती आणि वापर, कंपोस्ट खत उत्पादन अशा विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सेंद्रिय कापसाच्या विक्रीसाठी कोलकता येथील एका जिनिंग व्यावसायिकांशी करार करण्यात आला होता. त्यापोटी कापूस उत्पादकांना बाजारापेक्षा जादा दर मिळविण्यात संस्थेला यश आले. 

गाळमुक्‍त धरण, गाळयुक्‍त शिवार

 • सन २०१७ मध्ये जेमतेम ६० टक्‍के पाऊस पडला. त्यामुळे पुढील वर्षी पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण झाले. या पार्श्‍वभूमीवर शासनाने ‘गाळमुक्‍त धरण, गाळयुक्‍त शिवार’ अभियानाची घोषणा केली. २०१८ मध्ये या अभियानात संस्थेने सक्रिय योगदान दिले. मुंबई येथील केअरींग फ्रेंड आणि एटीइ फाउंडेशन तसेच विदर्भातील १७ सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात आला. 
 • यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि वाशीम जिल्ह्यांतील ६१ धरणांतून ६ लाख घनमीटर गाळ १ हजार ३६० शेतकऱ्यांनी २ हजार ४२७ हेक्‍टर क्षेत्रात मिसळला.
 • धरणातून गाळ काढून शेतात पसरविण्यासाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च आला. यातील सहा कोटी ५० लाख रुपयांचा भार शेतकऱ्यांनी उचलला.या प्रक्रियेत ४०० ट्रॅक्‍टरधारक व ३० जेसीबीधारकांचा इंधनाचा खर्च बाजूला काढला, तरी साडेचार कोटी रुपयांचा रोजगार मिळाला. 
 • यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नेतृत्वात हे अभियान राबविण्यात आले. मार्च, एप्रिल व मे २०१८ या दरम्यान ११ तालुक्‍यांतील ४४ प्रकल्पांतून काढलेला ५.०४ घनमीटर गाळ १,०६५ शेतकऱ्यांनी २,०६१ हेक्‍टर क्षेत्रात पसरविला. 

संस्थेचे मुख्य उपक्रम 

 • माती-पाणी व्यवस्थापनातून पर्यावरणाचा समतोल. 
 • पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी जलसंधारणाचे विविध उपचार. 
 • शेतकऱ्यांचे संघटन करून सामूहिकस्तरावर कृषी क्षेत्रातील उत्पादन व उत्पन वाढविणे. 
 • मुले, युवकांसाठी शैक्षणिक व कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी. 
 • दुष्काळ निवारण प्रकल्पांतर्गत मजूरांना रोजगार उपलब्धता. 
 • निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी भोजन व्यवस्था. 
 • शासनास १०५ गावांचा विकास आराखडा सादर.

ज्येष्ठांकरिता भोजनाची सोय 
पार्डी न. येथे २०१७ पासून वात्सल्य भोजनालयाच्या माध्यमातून संस्थेने १९ निराधार ज्येष्ठ नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाची निःशुल्क सोय केली आहे. घाटंजी तालुक्‍यातील १०५ गावांमध्ये बालहक्‍क संरक्षण अंतर्गत बालविवाह रोखण्यात देखील संस्था यशस्वी झाली. घाटंजी तालुक्यातील तीस शाळांमध्ये डिजिटल स्कूल उपक्रम सुरू आहे. दरवर्षी दत्तक घेतलेल्या ५२ अनाथ व एकलपाल्य मुलांना शैक्षणिक साहित्य, स्वच्छता कीट, कपडे, किराणा साहित्य व दिवाळीचा खाऊवाटप केले जाते.

जल, मृदासंधारणातून समृद्धी

 • २२,६०० हेक्‍टरवर बांधबंदिस्ती, शेततळे, वनराई बंधारे, सिमेंट प्लग, दगडी बांध, नाला खोलीकरण व रुंदीकरण.
 • सुमारे २९५ एकर क्षेत्रावर संरक्षित सिंचनाची सोय. घाटंजी तालुक्‍यातील कुंभारी, ससानी, येवती, रामपूर, पांढुर्णा खुर्द गावांमध्ये जलसंधारणाची कामे. नालाखोलीकरण व रुंदीकरण, कम्पार्टमेंट बंडिग, शेततळे, खोदकामासाठी संस्थेच्या वतीने यंत्रणेची उपलब्धता. 
 • दुष्काळी परिस्थितीत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून मजुरांना काम. 
 • पांढुर्णा बु. (ता. घाटंजी) गावातील तलावाचे पुनरुज्जीवन. तलावातील गाळ उपसा करून तो शेतीमध्ये वापरण्यात आला. जमीन सुपीकता वाढण्यासोबत गावाची पाणी समस्येतून मुक्‍तता झाली. २०१२ ते २०१८ या कालावधीत संस्थेद्वारे जल व भूमी संधारणाच्या कामामुळे सरासरी २० टक्‍के पाझर झाला. जलसाठ्यामुळे पीक उत्पादनात ३० ते ४० टक्‍के वाढ झाली. संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मृदा व जलसंधारण कामाची दखल घेत अमित गाडबैल, विनोद गुजलवार, विजय लाखेकर या संस्थेच्या कार्यकर्त्यांची शासनाने जलनायकपदी निवड. 
 • वृक्ष लागवड व संगोपनासाठी संस्थेतर्फे प्रोत्साहन. दहा हजार रोपक्षमतेच्या रोपवाटिकेची उभारणी. 

- रंजित बोबडे  ९४२३३३१४८०


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
गाजराने दिले उत्पन्नासह चाराहीनगर जिल्ह्यात अकोल तालुक्यातील गणोरे येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून घडवली...नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक...
अल्पभूधारकांसाठी कमी खर्चातील रायपनिंग...तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी.वाय. पाटील...
शेतकरी गट ते कंपनी उभारली प्रगतीची गुढीशेतकऱ्यांसाठी अल्प दरात विविध अवजारे उपलब्ध...
जिरॅनियम तेलनिर्मिती, करार शेतीतून...देहरे (ता. जि. नगर) येथील वैभव विक्रम काळे या...
कांदा, कलिंगड पिकातून बसवले आर्थिक गणितकरडे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भाऊसाहेब बाळकू...
शिक्षकाची प्रयोगशील शेती ठरतेय फायद्याचीआश्रम शाळेत गेल्या २३ वर्षांपासून शिकविणारे सहायक...
बचत गटांना पूरक उद्योगांची साथपारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता उमेद अभियानाच्या...
तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे...फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक...
फुलशेतीतून सुखाचा बहर जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक...
म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी : इरावडीइरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील...
ओल्या काजूगरासाठी प्रसिद्ध कुणकवणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव...
माळरानावर फळबागांतून समृद्धीरांजणगाव देवी (ता. नेवासा, जि. नगर) येथील संयुक्त...
प्रयत्नवाद, उद्योगी वृत्तीने उंचावले...पणज (जि. अकोला) येथील अनिल रामकृष्ण रोकडे यांनी...