agricultural news in marathi success story of tomato grower farmer from nashik district | Page 2 ||| Agrowon

तंत्रज्ञान, व्यवस्थापनासह टोमॅटो विक्री व्यवस्थेत हातखंडा

मुकुंद पिंगळे
गुरुवार, 19 ऑगस्ट 2021

नाशिक जिल्ह्यातील दरी येथील सतीश, सचिन व नितीन या पिंगळे बंधूंनी उत्कृष्ट व शास्त्रीय व्यवस्थापनाआधारे टोमॅटोच्या आदर्श शेतीचा वस्तुपाठ उभारला आहे. वाण निवड, तंत्रज्ञान, बाजारपेठेचा अभ्यास व विपणन या त्यांच्या बाबी आदर्श आहेत.
 

नाशिक जिल्ह्यातील दरी येथील सतीश, सचिन व नितीन या पिंगळे बंधूंनी उत्कृष्ट व शास्त्रीय व्यवस्थापनाआधारे टोमॅटोच्या आदर्श शेतीचा वस्तुपाठ उभारला आहे. वाण निवड, तंत्रज्ञान, बाजारपेठेचा अभ्यास व विपणन या त्यांच्या बाबी आदर्श आहेत.

नाशिक जिल्ह्यातील दरी येथील सतीश, सचिन व नितीन या पिंगळे बंधूंनी टोमॅटो शेतीत नाव कमावले आहे. सन १९८८ मध्ये वडील मधुकर यांचे निधन झाले. पुढे २००२ मध्ये कुटुंब विभक्त झाल्यानंतर वडिलोपार्जित शेती या तिघा बंधूंच्या वाट्याला आली. त्या वेळी पारंपरिक पिके घेतली जायची. त्यात बदल करून भाजीपाला व द्राक्षपीक निवडले. त्या वेळी या पिकांतील पुरेशी तांत्रिक व मार्गदर्शनाचा अभाव होता. अनुभव व अभ्यासातून नवीन संकल्पना व तंत्रज्ञान समजत गेले.   

अभ्यासवृत्तीतून प्रयोगशीलता 
मोठे बंधू सतीश व सचिन शेतीची जबाबदारी पाहात होते. दरम्यान धाकटे बंधू नितीन पदवी मिळवीत असताना नोकरी नको म्हणून शेतीत रमू लागले. अनुभव पाठीशी नसल्याने अडचणी येत होत्या. त्यामुळे कधी नैराश्यही वाट्याला आले. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ यांची चर्चासत्रे, अधिवेशने यात सहभागी होऊन तांत्रिक ज्ञान वाढवले. पुढे ज्ञानची भूक वाढत गेल्याने कृषी व फलोत्पादन पदविका त्यांनी मिळविली. एका नामांकित कंपनीत नोकरीही मिळाली. पण नितीन फार काळ रमले नाहीत.  

पिंगळे यांची शेती दृष्टिक्षेपात 

 • शेती- ३० एकर बागायती.
 •  सन २००४ मध्ये १५ एकरांत निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतले जायचे. नैसर्गिक आपत्ती व बागेचे वयोमान १४ वर्षांचे झाल्यानंतर उत्पादकता घटली. त्यात दराची अस्थिरता व २०११ मध्ये वादळ व गारपिटीमुळे काढणीस आलेल्या तयार ८०० क्विंटल मालाचे व ६० लाखांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे २०१८ मध्ये संपूर्ण १५ एकर बाग काढण्याचा निर्णय घेतला. खचून न जाता पुन्हा त्याच जिद्दीने भाजीपाला शेतीकडे वळाले.
 • आज टोमॅटो, ढोबळी मिरची, काकडी, वाल, कारल, भोपळा, कोबी, फ्लॉवर आदी पिके घेत आहेत. चार वर्षांपासून टोमॅटो हे मुख्य पीक झाले आहे. द्राक्ष बागेचे तयार स्ट्रक्चर वापरले जाते. मखमलाबाद येथे पाच एकर उन्हाळी तर दरी येथे खरिपात सरासरी १२ एकर क्षेत्रावर उत्पादन घेण्यात येते. 

व्यवस्थापन, तंत्रज्ञान
जमीन निचरा होणारी असल्याने सुपीकता टिकविण्यासाठी शेणखत, कंपोस्ट व मशरूम खताचा वापर

नियोजनानुसार रोपांची आगाऊ नोंदणी

 • बेडवर एक फूट अंतराने सघन पद्धतीने पॉली मल्चिंगवर रोगमुक्त व सशक्त रोपांची लागवड
 • क्षेत्रनिहाय ‘सेंट्रलाइज्ड’ सूक्ष्मसिंचन. चालू वर्षी ‘डबल इनलाइन’ पद्धतीचा अवलंब
 • एकात्मिक कीडनियंत्रण, कामगंध सापळ्यांचा वापर.  कायमस्वरूपी ५ ते ६ तर किरकोळ कामांसाठी २५ ते ४० मजूर उपलब्धता
 • उन्हाळ्यात लागवडीपश्‍चात १५ दिवस छत आच्छादनाद्वारे उन्हाच्या तीव्र झळांपासून बचाव

अत्याधुनिक फवारणी यंत्राचा वापर

 •  स्थानिक व निर्यातीसाठी मागणी असलेल्या वाणांची लागवड. जनुकीय गुणधर्मांबाबत शास्त्रीय माहिती, प्रतिकारशक्ती, फळधारणा, उत्पादकता व टिकवणक्षमता या बाबीही विचारात घेतल्या जातात. मालाचा रंग, आकार, चकाकी व टिकवणक्षमता चांगली राहील  याकडे विशेष लक्ष.
 • मालाचा पुरवठा होण्यासाठी खरिपात चार टप्प्यांत १५ दिवसांच्या फरकाने लागवड.
 • हवामान अंदाज व स्थिती तपासून प्रतिबंधात्मक व आंतरप्रवाही कीडनाशकांच्या फवारण्या.
 • फूलगळ रोखण्यासाठी कॅल्शिअम, बोरॉन फवारण्या.  जास्त पाऊस असताना ठिबकमधून बुरशीनाशकांचा वापर. 
 • अमावास्येच्या आदल्या दिवशी अळी नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणी

उत्पादन व उत्पन्न 
एकूण उत्पादन खर्च दीड लाख ते पावणेदोन लाख रुपये येतो. एकरी सरासरी उत्पादन ५५ ते ६० टन मिळवतोच. त्याला सरासरी दर १० ते १२ रुपये प्रति किलो प्रमाणे मिळतो. साधारणपणे ५.५ ते ६ लाख रुपये उत्पन्न मिळते. 

काटेकोर खत व्यवस्थापन
माती परीक्षण केल्याने अन्नद्रव्यांची गरज लक्षात येते. त्यामुळे मर्यादित खर्च करून उत्पादन घेणे शक्य होते. संतुलित अन्नद्रव्ये मिळाल्याने झाडे सशक्त होऊन प्रतिकारशक्ती वाढते. चालू वर्षी १५ दिवस सतत पाऊस असताना झाड निरोगी ठेवण्याचा प्रयत्न झाला. निरीक्षणांवरूनही अन्नद्रव्ये कमतरता लक्षात घेण्याचा प्रयत्न होतो.   

असाही आदर्श 
सन २००९ मध्ये टोमॅटो गादीवाफ्यावर (बेड) घेण्याचा प्रयोग केला. बेडच्या अंतरानुसार यंत्रे बनवून चाचण्या घेतल्या. सिंचनासाठी ‘इनलाइन’ ड्रिप वापरले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. बेडलगत १२ फूट अंतरावर दोन बांबू व दोन तारा अशी पद्धत सर्वप्रथम अवलंबली. इस्राइलमध्ये जाऊन फलोत्पादनसंबंधी २७ दिवसांचे प्रशिक्षण घेतले आहे. भाजीपाल्यासाठी इस्राइलहून आयात करून लाल शेडनेट उभारणी केली. रसशोषक किडींसाठी पिवळ्या प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केला. 

शेती राबणाऱ्याची आहे...
वडिलांचे निधन झाल्यानंतर आई कमलबाई यांनी संस्कारांचा पाठ घालून दिला. एकूण १३ जणांचे कुटुंब आहे. शेती राबणाऱ्याची आहे, कष्टाला नियोजनाची जोड दिल्यास ती नाराज करत नाही असे नितीन आवर्जून सांगतात. मोठे बंधू सतीश शेतीची देखरेख, पीक नियोजन सचिन तर उत्पादन व विक्री ही जबाबदारी नितीन पाहतात. कामांच्या नोंदी अचूक ठेवल्या जातात. सकाळी ६ वाजल्यापासून नियोजन सुरू होते. प्रत्येकाची जबाबदारी निश्‍चित असल्याने सुसूत्रता आली आहे. त्यामुळे आर्थिक उन्नती करत कामातून कुटुंबाने ओळख मिळविली आहे.

विक्री व्यवस्था  
जिल्ह्यात गिरणारे, पिंपळगाव बसवंत, नाशिक ही तीन प्रमुख विक्री केंद्रे आहेत. खरेदीत स्पर्धा होईल त्या ठिकाणी टोमॅटो विक्रीसाठी नेला जातो. एका दिवसाला ५०० क्रेट विक्रीसाठी असतात. त्यामुळे दरात थोडी जरी घसरण झाली तरी फटका बसतो. त्यामुळे विक्रीचे नियोजन नजीकच्या केंद्रावर मागणी व आवकेनुसार होते.

 बाजारपेठ विश्‍लेषण
मागणी पुरवठा, अन्य राज्यांतील लागवडी व उत्पादन असे अंदाज घेतले जातात. स्थानिक बाजारासाठी लाल रंग तर निर्यातीसाठी कवडी आलेला माल तोडला जातो. आकारानुसार हाताळणी व प्रतवारी होते. स्थानिक माल मुंबई, गुजरातमध्ये तर निर्यातक्षम माल  बांगलादेशात पाठवला जातो. मागणीनुसार बाजारपेठ शोधण्यासाठी नितीन जबाबदारी पाहतात.

- नितीन पिंगळे  ८६६८५४७८७६, ७५८८५५१४११


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
रोपवाटिका व्यवसायासाठी ‘मॅट पॉट’...प्रगत देशामध्ये पर्यावरणपूरक पेपरपॉट निर्मितीसाठी...
जातिवंत दुधाळ गाई,म्हशींच्या पैदाशीसाठी...तामखडा (ता.फलटण,जि.सातारा) येथील प्रयोगशील...
गुलाबामध्ये तुळशीचे आंतरपीक ठरतेय...कोरोना संकट ही संधी समजून कवडी माळवाडी (ता. हवेली...
तीस वर्षांपासून फळपिकांमध्ये सातत्य...भोसे (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील कृषी पदवीधर डॉ...
वन्यप्राणी, संवर्धन, जनजागृतीसाठी ‘...मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वर्धा...
बटण मशरूमचा ‘कॅम्बीअम गोल्ड’ ब्रँडमूळचे जमालपूर (बिहार) येथील नीलकमल झा यांनी...
सेंद्रिय गुळाचा ‘यादवबाग’ ब्रॅण्ड !घरची वर्षानुवर्षांची ऊसशेती. मात्र मिळणाऱ्या कमी...
केळी, कापूस, जलसंधारणात झाली जळके...जळके (ता.जि. जळगाव) गावाने जलसंधारणात भरीव काम...
नागपूरला फुलला सीताफळाचा बाजारनागपूर येथील महात्मा फुले मार्केट सीताफळाने फुलले...
‘मार्केट डिमांड’नुसार देशी वांग्यांची...देशी वांग्याला अस्सल चव असल्याने...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
शेळी, कोंबडीपालनात युवा शेतकऱ्याची...बुलडाणा जिल्ह्यातील आडविहिर येथील युवा शेतकरी...
राधानगरीच्या दुर्गम भागात रेशीम शेतीचे...पारंपरिक ऊस, भात य पारंपरिक शेतीपेक्षा थोड्या...
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...