agricultural news in marathi success story Woven threads of silk farming in remote areas of Radhanagari | Page 2 ||| Agrowon

राधानगरीच्या दुर्गम भागात रेशीम शेतीचे विणले धागे

राजकुमार चौगुले
मंगळवार, 28 सप्टेंबर 2021

पारंपरिक ऊस, भात य पारंपरिक शेतीपेक्षा थोड्या वेगळ्या अंगाने जात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीच्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीला आपलेसे केले आहे. प्रति बॅचमधून ताजे उत्पन्न यानुसार वर्षाला चांगले अर्थार्जन मिळवण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यातून वेगळा आत्मविश्‍वास मिळाला आहे
 

पारंपरिक ऊस, भात य पारंपरिक शेतीपेक्षा थोड्या वेगळ्या अंगाने जात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीच्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीला आपलेसे केले आहे. प्रति बॅचमधून ताजे उत्पन्न यानुसार वर्षाला चांगले अर्थार्जन मिळवण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यातून वेगळा आत्मविश्‍वास मिळाला आहे

कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडील जास्त पावसाचा म्हणून राधानगरी तालुक्याची ओळख आहे. ऊस, भात हीच तालुक्याची मुख्य पिके आहेत. छोट्या- छोट्या तुकड्यांतील शेती हे या भागाचे वैशिष्ट्य असल्याने बहुतांश शेतकऱ्यांकडे भात लागवड दिसून येते. अलीकडील काळात शेतकरी उत्पन्नस्रोत वाढवण्यासाठी विविध पर्याय शोधताना दिसत आहे. तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या राधानगरी गावातील अकरा शेतकऱ्यांनी त्यातूनच दोन वर्षांपासून रेशीम शेतीची वेगळी वाट निवडली आहे.
गेल्या दोन वर्षांत कोरोना व लॉकडाउनच्या संकटाने समाजाला ग्रासले. या काळात
या शेतकऱ्यांना रेशीम शेतीने मात्र दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

फुलली रेशीम शेती
राधानगरी येथील दीपक शेट्टी यांची संयुक्त कुटुंबाची दहा एकर शेती आहे. ऊस, केळी, भात ही पिके ते घेतात. गेल्या दोन-तीन वर्षांपासून महापूर, कोरोना व अन्य कारणांमुळे शेतीमालाला दर नसणे, उत्पन्न घटणे आदी बाबींमुळे शेट्टी त्रस्त झाले होते. त्यांना रेशीम शेतीच्या पर्यायाचा शोध लागला.

विविध स्रोतांमधून अभ्यास करून त्यांनी त्याबाबतची माहिती संकलित केली. रेशीम शेती एकट्याने करण्यापेक्षा आणखी काही शेतकऱ्यांना सोबत घेतले तर उत्पादनासोबत विक्री व्यवस्थाही तयार होईल हे त्यांनी जाणले.

ग्रामपंचायतीने घेतला पुढाकार
रेशीम कोषांना मिळणारे दर व बाजारपेठ यांचा अभ्यास करताना राधानगरीसारख्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी ही चांगली संधी समोर दिसत होती. शेट्टी यांच्या पत्नी कविता राधानगरी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत. त्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा करून ‘मनरेगा’मार्फत गावात रेशीम शेतीचा प्रसार करण्याचे ठरवले. कोल्हापूर जिल्हा रेशीम कार्यालय, शिवाजी विद्यापीठातील रेशीम शास्त्र विभाग तसेच डॉ. डी. वाय. पाटील कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथील पदाधिकाऱ्यांनी सहकार्य व पाठबळ देण्याची तयारी दर्शविली. युवराज पाटील, प्रदीप गुरव, सुनील तायशेटे, रविकिरण शेट्टी, मंगेश पाटील, शुभम पाटील, सुंदर शेट्टी, विजय शेट्टी, मिलिंद गुरव, राजेंद्र पाटील आदी शेतकरी रेशीम शेतीत सहभागी झाले. प्रत्येकी एक एकर क्षेत्रावर दोन वर्षांपूर्वी तुतीची लागवड झाली. ‘मनरेगा’ योजनेतून तीन लाखांचे अनुदान टप्प्याटप्प्याने रेशीम उत्पादकांना मिळते. त्या रकमेतून रेशीम शेड उभारणी व अन्य खर्चाची तरतूद झाली. काही शेतकऱ्यांनी त्या व्यतिरिक्त स्वखर्चातून तुतीचे क्षेत्र वाढवले.

ताज्या उत्पन्नाने वाढला उत्साह
रेशीम शेतीतून प्रत्येक बॅचला म्हणजे ताजे उत्पन्न हाती येत असल्याने वर्षाचे आर्थिक नियोजन करणे सोपे जाते. या मानसिकतेतून शेतकऱ्यांचे रेशीम शेतीला प्राधान्य राहिले. पहिल्याच वर्षी हा अनुभव आला. शेट्टी यांनी पहिल्या बॅचमधून ३५३ किलो कोषांचे उत्पादन घेतले. साधारणपणे प्रतिकिलो साडेतीनशे रुपये दर मिळाला. कमी कालावधीत चांगली रक्कम हाती पडल्यानंतर पुढील बॅचेस घेण्यास सुरुवात झाली. अन्य शेतकऱ्यांतही उत्साहाचे वातावरण तयार झाले.

रेशीम शेतीतील अर्थकारण
राधानगरी भागातील शेतकऱ्यांची रेशीम शेती व त्याचे अर्थकारण ढोबळमानाने पुढीलप्रमाणे आहे.

  • वर्षाला सुमारे चार ते पाच बॅचेस
  • प्रति बॅच २०० ते ४०० अंडीपुंजांची.
  • प्रति १०० अंडीपुंजांमागे ७० ते ९० किलो कोषनिर्मिती
  • प्रति एकर तुती क्षेत्रात प्रति २०० अंडीपुंजांच्या वर्षात पाच बॅचेस घेतल्यास ८०० ते ९०० किलो कोष उत्पादन.
  • प्रति किलो २५० रुपयांपासून ३००, ३५० रुपये दर.

लॉकडाउनमध्ये दिलासा
शेतकऱ्यांनी जयसिंगपूर बाजार समिती, आरळे रेशीम प्रक्रिया केंद्र यासह कर्नाटकातील चिकोडी आदी ठिकाणी कोषांची विक्री केली. मध्यंतरी लॉकडाउनच्या काळात काही प्रमाणात दर कमी आले. मात्र बाजारपेठेत मागणी कायम होती. त्यामुळे नफ्याचे प्रमाण भले कमी झाले असेल पण तोटा सहन करावा लागला नाही. लॉकडाउनमध्ये भाजीपाला, फळभाज्या, फुलांसह अन्य शेतमालाचे दरांमुळे नुकसान झाले. पण रेशीम शेतीने दिलासा दिला.

प्रतिक्रिया

भात ऊस या मुख्य पिकांना आर्थिक भक्कम जोड देणे गरजेचे होते. त्यातून सुरू केलेली सामूहिक रेशीम शेती आमच्या अपेक्षा पूर्ण करीत आहे. मनोबल वाढवत आहे. तुती लागवडीतून शिल्लक राहणाऱ्या चाऱ्याच उपयोग करून शेळीपालन करण्याचा विचार आहे.
- दीपक शेट्टी, ९८५०३०७५७६ -

राधानगरी सारख्या दुर्गम भागात रेशीम शेतीचे जाळे विणले जात आहे ही मोठी सकारात्मक बाब आहे, दीपक व कविता या शेट्टी दांपत्याने शिवाजी विद्यापीठात रेशीम शास्त्राची पदविका घेतली आहे. त्यांना आम्ही प्रशिक्षणही दिले आहे. शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसारखा थोडा वेगळा विचार केल्यास त्यातून चांगले अर्थार्जन होऊ शकते.
- डॉ अधिकराव जाधव, ९८२२७०१९२५
(समन्वयक, रेशीम शास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

आम्ही भारतीय कृषी कौशल्य परिषदेच्या माध्यमातून राधानगरी येथील शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. व्यवस्थापन पद्धती विषयी सखोल मार्गदर्शन केल्याने गावातील शेतकरी रेशीम शेतीसाठी तयार होत आहेत. पुढील काळात रेशीम उत्पादकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न आहे.
- दीपाली मस्के, ८४८४०६८९६५
(विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) कृषी विज्ञान केंद्र तळसंदे, जि. कोल्हापूर)
 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
अन्नप्रक्रिया यंत्रनिर्मितीतील सावंत...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रकाश सावंत...
अधिक ‘कुरकुमीन’ युक्त हळदीचा यशस्वी...पास्टुल (जि. अकोला) येथील संतोष घुगे यांनी आपल्या...
मुक्तसंचार व तंत्रशुध्द पद्धतीने...सातारा जिल्ह्यातील चौधरवाडी येथील हाफीज काझी...
शेतीला मिळाली दुग्ध व्यवसायाची जोडपुण्याच्या पश्‍चिम भागातील मुळशी तालुक्याच्या...
सीताफळाचा ‘कांचन’ ब्रॅण्ड अन्...पंधरा वर्षांपासून सीताफळ लागवडीत हातखंडा, फळाचा...
लाकडी घाण्यावरील तेलाची युवा...कापसेवाडी (जि. सोलापूर) येथील युवा अभियंता संदीप...
नरवाडने जोपासली पानमळ्याची परंपरासांगली जिल्ह्यातील नरवाड हे गाव खाऊच्या पानांसाठी...
एकरी ४० टन सातत्यपूर्ण दर्जेदार केळी...नेवासे (जि. नगर) येथील पठाण कुटुंबाने ऊस पट्ट्यात...
मधमाशीपालनातून मिळाली स्वयंरोजगाराची...उत्तर प्रदेशातील मदारपूर केवली (ता. गोसाईगंज, जि...
प्रयोगशीलतेला दिली तंत्रज्ञानाची जोडप्रयोगशीलता आणि तंत्रज्ञान वापर या दोन बाबी शेतीत...
वडजीत फुलतात वर्षभर गुलाबाचे मळेसोलापूर जिल्ह्यातील वडजी गावशिवारात वर्षभर देशी...
रोपनिर्मिती व्यवसायाने दिला हातभारगळवेवाडी (जि. सांगली) येथील राजाराम गळवे अनेक...
`चॉकी सेंटर’ सुरू करून गुणवत्तापूर्ण...परिसरातील रेशीम शेतकऱ्यांची गरज ओळखून वाकी...
संघर्षमय आयुष्यात मोगऱ्याच्या सुगंधाचा...नाशिक जिल्ह्यात पेठ या आदिवासी तालुक्यातील आड...
संघर्षमय वाटचालीतून शेतीत उभारले वैभवपरभणी जिल्ह्यातील मरसुळ येथील देवराव शिंदे यांनी...
वाशीमच्या शेतकऱ्यांनी उभारली बांधावरची...वाशीम जिल्ह्यातील एरंडा येथील जयकिसान शेतकरी...
पर्यावरणपूरक तंत्रे देणारे वर्ध्याचे...दत्तपूर (वर्धा) येथे ग्रामोपयोगी विज्ञान...
कापडणीसांचे एक्स्पोर्ट क्वालिटी’चे भारी...नाशिक जिल्ह्यातील आसखेडा येथील अमृत कापडणीस यांनी...
बायोगॅसपासून वीज अन्‌ प्रॉम खतनिर्मितीबारामती येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स, डेअरी‘मध्ये...
बचत गटाने उभारली भाजीपाला रोपवाटिकाशिक्रापूर-राऊतवाडी (ता. शिरूर,जि.पुणे) येथील...