agricultural news in marathi Successful turnover by building a network of weekly markets | Page 2 ||| Agrowon

आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी उलाढाल

संदीप नवले
शनिवार, 17 एप्रिल 2021

पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र येऊन श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. पुणे व मुंबईत आठवडी बाजारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मोठे ‘नेटवर्क’ उभारले. ग्राहकाभिमुख शिस्तबध्द विक्री व्यवस्था उभारली. 

पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र येऊन श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. पुणे व मुंबईत आठवडी बाजारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मोठे ‘नेटवर्क’ उभारले. ग्राहकाभिमुख शिस्तबध्द विक्री व्यवस्था उभारली. रोजगार निर्मिती केली. आज शंभर कोटी रुपयांपर्यंत उलाढाल करण्यापर्यंत कंपनीने यशस्वी मजल गाठली आहे.

पुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पुरंदर तालुक्यातील वाल्हेगाव येथील शेतकरी कुटुंबातील नरेंद्र पवार यांनी ‘एमबीए’ ची पदवी घेतली. मात्र शिक्षणाचा उपयोग व्यवसायासाठीच करायचा असे ठरवले होते. शिक्षण सुरू असताना कृषी उत्पन्न बाजार समितीतील खरेदी विक्रीचा अभ्यास सुरू होता. आपल्या मालाची किंमत स्वतः ठरवण्याचा हक्क शेतकऱ्याला का मिळू नये असा प्रश्न त्यांना वारंवार पडे. त्यातून गटाच्या माध्यमातून थेट ग्राहकांना विक्री करण्याची यंत्रणा उभारण्याचे ठरवले. आपल्या चार मित्रांना सोबत घेऊन श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना त्यासाठी केली. नरेंद्र त्याचे अध्यक्ष झाले.

सोसायट्यांमध्ये विक्री
सुरवातीला पुण्यातील उच्चभ्रू निवासी सोसायट्यांमध्ये आठवड्यातून दोन ते तीन दिवस वाहन घेऊन थेट विक्री सुरू केली. मात्र विक्रीस मर्यादा येत होत्या. मग त्याच परिसरातील
सार्वजनिक ठिकाणी आठवडे बाजार भरविण्याची संकल्पना पुढे आली. परंतु त्यावेळी शासनाचे धोरण नसल्याने अडचणी येऊ लागल्या. पण नरेंद्र यांनी जिद्द व चिकाटी सोडली नाही.

शेतकऱ्यांचे गट

 • पुणे, सातारा व नगर या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे उत्पादक गट स्थापन केले. प्रत्येक भागाची शेतमालाबाबत ओळख असते. त्यानुसार पुरंदर तालुक्यातून वाटाणा, पावटा, अंजीर, सीताफळ, जुन्नर भागातून कोबी, फ्लॉवर, पालेभाज्या घ्यायच्या. भोर तालुक्यातून भोपळा, कारली, अशा वेलवर्गीय भाज्या तर महाबळेश्वर भागातून स्ट्रॅाबेरी खरेदी करायची असे नियोजन केले.
 • शेतमाल प्रकारानुसार सुमारे ७० गावांत १६० शेतकरी उत्पादक गट स्थापन झाले. गावात संकलन केंद्र सुरू झाले. आर्थिक स्थैर्य व नफा मिळू लागल्यानंतर टप्याटप्याने विविध गटांनी २२५ टेम्पो घेऊन माल देण्यास सुरवात केली.

आठवडी बाजार रुजला
पुणे शहरातील कोथरूड उपनगरातील गांधी भवन परिसरात जून २०१४ मध्ये शेतकरी आठवडा बाजार भरविण्यासाठी युक्रांद संस्थेचे कुमार सप्तर्षी यांनी जागा उपलब्ध करून दिली. हा प्रयोग यशस्वी झाला. नरेंद्र पणन विभागाच्या सुकाणू समितीवर असल्याने शासनाकडेही पाठपुरावा केला. दरम्यान जुलै २०१६ मध्ये शेतमाल नियमनमुक्तीबाबत तत्कालीन सरकारने धोरण जाहीर केले. मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत मंत्रालयाच्या आवारात १४ ऑगस्ट, २०१६ मध्ये संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडा बाजार सुरू झाला.

गटांकडून सुरवात
शेतकऱ्यांना रास्त भाव तर ग्राहकांना वाजवी दरात ताजा शेतमाल मिळू लागला. आठवडे बाजाराला वाढता प्रतिसाद पाहून स्थानिक नगरसेवक, आमदार व खासदार यांच्याकडूनही असे उपक्रम भरविण्यासाठी सहकार्य मिळाले. शासनाचे आठवडे बाजाराचे धोरण आल्यानंतर नरेंद्र यांच्या कंपनीने पुणे, सातारा व नगर जिल्हंयात शेतकरी उत्पादक गट स्थापन झाले. प्रत्येक गटात किमान दहा याप्रमाणे १६ ते १८ गटांनी आठवडे बाजार भरविण्यास सुरवात केली. त्यासाठी गटांना ‘ड्रेसकोड’, हातमोजे, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा यांचा वापर, व्यसन करायचे नाही अशी शिस्त घालून दिली. त्यातून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला.

उलाढाल वाढली
सध्या कंपनी शेतकरी आठवडी बाजार ही संकल्पना पुणे व मुंबईत प्रत्येकी १२ ठिकाणी राबवत आहे. जवळपास साडेचारहजार शेतकरी व साडेसातशे युवकांचे पाठबळ या जोरावर वार्षिक १०० कोटी रुपयांपर्यंत कंपनीने मजल मारली आहे. ताजा, स्वच्छ व निवडक शेतमाल या संकल्पनेतून कंपनीची वाटचाल यशस्वी सुरू आहे. कोरोना संकटाच्या परिस्थितीतही कंपनीने योग्य खबरदारी घेऊन गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीचे नियोजन पार पाडले. यातून सुशिक्षित ग्रामीण युवक व महिलांना रोजगार संधी उपलब्ध झाल्या.

आठवडे बाजारासाठी कार्यपद्धती

 • अत्यंत काटेकोर व्यवस्थापनातून बाजार यंत्रणा उभारली.
 • ग्रामीण भागात संकलन प्रतवारी केंद्रे
 • शेतकऱ्यांच्या वाहतूक व्यवस्था
 • आधुनिक व ग्राहकाभिमुख पॅकेजिंग व हाताळणी व्यवस्था
 • बाजार ठिकाणी स्वच्छता व व टापटीपपणा
 • मागणी व पुरवठा यातील समतोल धोरण. त्यामुळे शेतमालाच्या नासाडीवर नियंत्रण
 • कायदेशीर बाबींची पूर्तता
 • शेतमाल दरांत स्थिरता व एकसूत्रीपणा
 • कचरा व्यवस्थापन.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून प्रसंशा
पुण्यासह मुंबईत उभारलेले आठवडी बाजारांचे नेटवर्क, त्याचा शेतकऱ्यांना होणारा फायदा,
ग्रामीण भागातील तयार झालेला रोजगार या कंपनीच्या कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी घेतली. आपल्या महत्वाकांक्षी ‘मन की बात’ या कार्यक्रमात कंपनीचे कौतुक करून अशा उपक्रमांसाठी पुढाकार घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले.

वाशीत शेतकरी सुविधा केंद्र
शेतकऱ्यांना बाजारपेठाशी जोडण्यासाठी वाशी (मुंबई) येथे ‘नाफेड’ आणि स्वामी समर्थ शेतकरी कंपनीच्या माध्यमातून नुकतेच शेतकरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. ‘नाफेड’चे मुख्य व्यवस्थापक संजीवकुमार, माजी कृषी सचिव सुधीरकुमार गोयल, कृषी सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार आदी विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संपर्क- नरेंद्र पवार- ८४८३८३८३९२


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी जमा नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
मित्राच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मदतीचा...कोल्हापूर : एकेकाळी महाविद्यालयात एकत्र धमाल...
पाच हजार कोटींचा विमा कंपन्यांना नफा पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचे कवच...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
वेगवान वाऱ्याचा कोकण किनारपट्टीला फटका...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
विमा कंपन्यांना आयुक्तांचा दणका पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः देशात सध्या सोयाबीनचा मोठा तुटवडा जाणवत...
‘महाडीबीटी’वरील बियाणे अनुदान अर्जासाठी...पुणे ः राज्यात खरीप हंगामासाठी ‘महाडीबीटी’वर...
साहेब, टरबूज विक्रीला परवानगी द्या अकोला ः दरवर्षी रमजान महिन्यात टरबुजाला चांगली...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
कांदाकोंडी टाळणेच योग्य पुणेः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात...
मंत्री साहेब, कोटींच नुकसान होईल हो ! नाशिक: जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
साखर निर्यातीचा यंदा विक्रम? कोल्हापूर: साखर निर्यातीची गती पाहता यंदा...
अन्न प्रक्रियेमध्ये अवरक्त किरणांचा वापरअन्न प्रक्रियेदरम्यान पारंपरिक उष्णतेच्या...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...