agricultural news in marathi, sugarcane crop advisory , Agrowon, Maharashtra | Agrowon

उस पीक सल्ला
डाॅ. प्रमोद चौधरी, डाॅ. आनंद सोळंके
बुधवार, 21 मार्च 2018

खोडवा ऊस :

खोडवा ऊस :

  • कमीतकमी हेक्टरी १ लाख ऊससंख्या असलेल्या क्षेत्रातच खोडवा ठेवावा. कीडग्रस्त क्षेत्रातील खोडवा ठेवू नये.
  • खोडवा ठेवताना पाचट पेटवू नये. पाचट कुट्टी करू नये. पाचट एकआड एक सरीत ठेवू नये किंवा शेताबाहेर काढू नये.
  • ऊसतोडणीनंतर पाचट शेतात दाबून घ्यावे.
  • उसाचे बुडखे मोकळे करून धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत. छाटलेल्या बुडख्यांवर कार्बेन्डाझिम  १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात  फवारणी करावी.
  • पाचट कुजविण्यासाठी पाचटावर प्रतिहेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे. त्यानंतर १० किलो पाचट कुजविणारे जीवाणू शेणखतात मिसळून पाचटावर टाकावेत.
  • पहिले पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वाफसा आल्यावर पहारीच्या साह्याने हेक्टरी १५० किलो नत्र (३२५ किलो युरिया), ७० किलो स्फुरद (४३७ किलो सिंगल सुपर फॉस्फेट), ७० किलाे पालाश (११७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) या रासायनिक खतांचे मिश्रण द्यावे. तसेच प्रतिहेक्टरी झिंक सल्फेट २० किलो, फेरस सल्फेट २५ किलो याप्रमाणात शेणखतात मिसळून द्यावे. सूक्ष्मअन्नद्रव्य देताना ती एकत्र करून बुडख्यापासून सरीच्या एका बाजूला ३० सें.मी. अंतरावर व १५ सें.मी. खोलीवर पहारीच्या साह्याने द्यावीत.
  • ठिबकसिंचनाची सोय असल्यास १ ते ४ आठवड्यांच्या दरम्यान खोडव्यास प्रतिएकरी ६.५ किलो युरिया, १.५ किलो मोनो-अमोनियम फॉस्फेट व १.५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही अन्नद्रव्ये ७ दिवसांच्या अंतराने द्यावीत. ५ ते ९ आठवड्यादरम्यानच्या खोडवा पिकास प्रतिएकरी ६.५ किलो युरिया, ४.५ किलो मोनो-अमोनियम फॉस्फेट व २ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही खते ७ दिवसांच्या अंतराने द्यावीत.
  • दोन महिने वयाच्या खोडवा पिकास १ लिटर द्रवरूप अॅसेटोबॅक्टर जीवाणूयुक्त खताची ५०० लिटर पाण्यात मिसळून सकाळच्यावेळेस फवारणी करावी. तसेच स्फुरद विरघळविणारे जीवाणूयुक्त खत १० किलाे प्रति १०० किलाे कंपोस्ट खतामध्ये मिसळून सरीमधून द्यावे.

संपर्क : डॉ. प्रमोद चौधरी, ८२७५५६३५८०
(मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा.)

 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...