गंधक : एक आवश्यक अन्नद्रव्य

गंधक हे प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढवण्यास मदत करते. यामुळे पिकाच्या अन्ननिर्मितीला चालना मिळते.वनस्पतीमध्ये गंधक हे प्रथिने, जीवनसत्वे आणि स्निग्ध पदार्थांमध्ये आढळते. पीक उत्पादन आणि गुणवत्तावाढीसाठी गंधक आवश्यक आहे.
Sulfur is an important ingredient in onion production.
Sulfur is an important ingredient in onion production.

गंधक हे प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढवण्यास मदत करते. यामुळे पिकाच्या अन्ननिर्मितीला चालना मिळते.वनस्पतीमध्ये गंधक हे प्रथिने, जीवनसत्वे आणि स्निग्ध पदार्थांमध्ये आढळते. पीक उत्पादन आणि गुणवत्तावाढीसाठी गंधक आवश्यक आहे. पीक व्यवस्थापन करताना मुख्यतः नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे उर्वरित अन्नद्रव्यांची कमतरता वाढत जाते. अलीकडे जमिनीत गंधकाची कमतरता जाणवू लागली आहे. गंधक मातीचा सामू कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे चुनखडीयुक्त चोपण जमिनीमध्ये त्याचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जमिनीतून गंधकयुक्त खतांचा वापर केल्यामुळे नत्र, स्फुरद आणि खतांचा कार्यक्षम वापर होऊन पीक उत्पादनाची भरीव वाढ होते. गंधकासोबत इतर अन्नद्रव्यांचा वापरामुळे आंतरपीक प्रक्रियेवर अनुकूल परिणाम होऊन पीक उत्पादन वाढ आणि प्रत सुधारण्यास मदत होते. विविध खतांमधून सल्फेट या संयुगाच्या स्वरूपात गंधक आता उपलब्ध झाले आहे. वनस्पतीमधील अमिनो आम्ल तयार करण्यासाठी गंधक आवश्यक घटक आहे. जीव रासायनिक प्रक्रियेमध्ये गंधकाचा सहभाग महत्त्वाचा असून वनस्पती श्वसनक्रिया, तेल निर्मिती व हरितद्रव्य तयार करण्यासाठी गंधक महत्त्वपूर्ण भूमिका करते. जमिनीमध्ये गंधक कमतरतेची कारणे 

  • मातीच्या ऱ्हासामुळे आणि निचऱ्याद्वारे होणारी गंधकाची कमी. 
  • गंधकविरहित किंवा गंधकाचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या खतांचा वापर. 
  • जमिनीतून पिकांद्वारे सातत्याने होणारी उचल. 
  • शेतातील पिकांचे अवशेष, सेंद्रिय खते आणि काडी कचऱ्याचे चक्रीकरणातून होणारा कमी वापर.
  • पिकांमधील कार्य  

  • गंधक हे प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढवण्यास मदत करते. यामुळे पिकाच्या अन्ननिर्मितीला चालना मिळते.
  • वनस्पतीमध्ये गंधक हे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि स्निग्ध पदार्थांमध्ये आढळते. हे तेलयुक्त पदार्थ वनस्पतींना तिखट वास प्रदान करते. उदा. कांदा, लसूण.
  • गंधक हे अमायनो अॅसिड तयार करण्यास मदत करते. तो त्याचा घटक आहे. उदा. सिस्टीन व सिस्टाईन म्हणजेच प्रथिने तयार होण्यास गंधक आवश्यक आहे.
  • गंधक हा मिथीओनाईन, थायमीन आणि बायोटीन यांचा महत्त्वपूर्ण घटक आहे. 
  • गंधक हरितद्रव्यांचा घटक नसला तरी हरितद्रव्य तयार होण्यास गंधकाची आवश्यकता असते. जर गंधक कमी पडल्यास १८ टक्क्यांपर्यंत हरितद्रव्य कमी तयार होते.
  • गंधक द्विदल कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये वाढ होण्यास व जिवाणूद्वारे नत्र स्थिर करण्यास मदत करते.
  • वनस्पतींच्या निरनिराळ्या विकरांच्या व चयापचयाच्या क्रियेत मदत करते.
  • फळे तयार होण्यास गंधकाची अत्यंत आवश्यकता असते.
  • कमतरतेची लक्षणे  केळी 

  • केळीची नवीन पाने गोलाकार न होता पिवळसर पांढरी होतात. 
  • झाडांची वाढ खुंटते. लहान फळे तयार होतात. पाने पिवळी पडतात. 
  •   कापूस जुन्या पानांवर गंधकाची कमतरता लवकर दिसून येते. नवीन पाने, पिवळी पात्याचा रंग लालसर दिसतो.

    भुईमूग 

  • गंधकाची कमतरता असल्यामुळे सर्वसाधारण झाडापेक्षा लहान झालेले आढळतात. 
  • शेंगा व नत्रासाठी यांची वाढ खुंटते व परिपक्व होण्यास वेळ लागतो. 
  • सोयाबीन 

  •  नवीन पाने हिरवट पिवळसर होतात. 
  •  गंधकाची जास्त कमतरता असल्यास पूर्ण झाड पिवळे होऊन परिपक्व होण्यापूर्वी ते गळून जातात. फुले कमी होऊन फळधारणा कमी होते. 
  • ऊस 

  •   नवीन पानांवर पिवळसर हिरवा रंग येतो. 
  •   गंधकाची कमतरता असल्यास पूर्ण पान पांढरे होतात, वाढतात. 
  • मका 

  • नवीन पानांच्या शिरा पिवळ्या पडतात. पानांच्या कडा लालसर दिसतात. 
  • पानांची कडा लालसर होऊन खोड खालच्या बाजूने लालसर होताना पिवळी पडतात. 
  • गहू 

  • सर्वसाधारण पूर्ण झाड पिवळे पडते. 
  • गंधकाच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ खुंटते. लोंब्या धरण्याचे प्रमाण कमी होते व फुले कमी दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.
  • कांदा :

  • गंधकाचे प्रमाण कमी झाल्यास पानाचा आकार लहान होतो. पाने पिवळी पडतात. 
  • पानांची शेंडे पिवळसर पडून वाळतात. 
  • - (मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग,डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com