agricultural news in marathi Summer management for buffalos | Page 4 ||| Agrowon

उन्हाळ्यातील म्हशींचे व्यवस्थापन

डॉ.संदीप ढेंगे, डॉ.मंगेश वैद्य
शनिवार, 1 मे 2021

जनावरांसाठी पुरेसे पाणी, खाद्याची व्यवस्था ठेवावी. यामुळे शरीरक्रिया सुरळीत चालते. म्हशी स्वतःचे शारीरिक तापमान बाहेरील तापमानाशी स्वनियंत्रित करतात. गाभण जनावरांना अतिरिक्त मात्रेत खनिज मिश्रणे आणि जीवनसत्त्वे नियमित खाद्यात पुरवावीत.
 

जनावरांसाठी पुरेसे पाणी, खाद्याची व्यवस्था ठेवावी. यामुळे शरीरक्रिया सुरळीत चालते. म्हशी स्वतःचे शारीरिक तापमान बाहेरील तापमानाशी स्वनियंत्रित करतात. गाभण जनावरांना अतिरिक्त मात्रेत खनिज मिश्रणे आणि जीवनसत्त्वे नियमित खाद्यात पुरवावीत.

दूध उत्पादनासाठी प्रामुख्याने जाफराबादी, मुऱ्हा, सुरती, निलीरावी आणि मेहसाणा या  या म्हशींच्या जाती प्रसिद्ध आहेत. मुऱ्हा जातीची म्हैस जास्त उत्पादनक्षम असल्याने पशूपालकांच्याकडे ही म्हैस प्रामुख्याने दिसते. साधारणपणे, म्हैस एका वेतात सरासरी १८०० ते २००० लिटर दूध देते. दुधातील फॅटचे प्रमाण ६ ते ८ टक्के असते. दुधातील फॅटमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असून टोकोफेरालचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय,  दुधात जीवनसत्त्व अ, कॅल्शिअम आणि फॉस्फरस जास्त प्रमाणात असून सोडिअम आणि पोटॅशिअमचे प्रमाण कमी असते, कॅरोटीन आढळत नाही.

 • साधारणपणे म्हशीच्या रेडीची पहिली गर्भधारणा होईपर्यंत ३ उन्हाळ्याचा कालावधी जात असल्याने वातावरणातील काही घटक (तापमान, हवेचा वेग आणि दिशा, आर्द्रता) त्यांच्या आरोग्यावर अपायकारक परिणाम करतात. म्हशीचा रंग काळा आणि घाम ग्रंथी कमी असल्यामुळे शरीरातील उष्णता उत्सर्जित करताना अडचणी येतात. म्हशी शारीरिक तापमान स्वनियंत्रीत करू शकत नाहीत आणि त्यामुळेच, म्हशींना उष्णतेचा ताण किंवा त्रास होत असतो.उष्णतेच्या ताणामुळे रेडीचे ऋतुचक्र विस्कळते आणि त्या उन्हाळ्यात माजावर येत नाहीत. त्यामुळेच,उन्हाळ्यातील काळ व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो.
 • उन्हाळ्यात कमी प्रमाणात हिरवा चारा, खाद्य आणि योग्य निवारा व्यवस्था नसल्यामुळे रेडीची शारीरिक वाढ खुंटते. प्रजोत्पादनक्रिया काहीशा प्रमाणात विस्कळल्याने भविष्यात मिळणाऱ्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असते.
 • सुरवातीपासूनच रेडीचे योग्य व्यवस्थापन असल्यास प्रजोत्पादनक्रिया लवकर कार्यान्वित होते. साधारणपणे पहिले वेत वयाच्या चौथ्या वर्षी होऊ शकते. काही कारणांनी रेडीचे पहिले वेत उशिरा होत असल्यास  दैनंदिन व्यवस्थापन खर्चात नाहक वाढ होते.  
 • वातावरणातील अति जास्त तापमान आणि आर्द्रता या घटकांचा रेडीच्या शारीरिक वाढीवर विपरीत परिणाम होत असल्याने शरीरातील संप्रेरकीय संतुलन बिघडून पहिल्यांदा उशिरा माजावर येतात, काही वेळेस गाभण रेडीचा गर्भपात होतो किंवा व्याल्यानंतरच्या समस्या उद्भवतात.  उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनयुक्त पोषक खाद्य व योग्य निवारा उपलब्ध असल्यास उष्णतेच्या ताणापासून  संरक्षण करून वाढ चांगली होते. 

उन्हाळ्यातील व्यवस्थापन  

 • जनावरांसाठी पुरेसे पाणी, खाद्याची व्यवस्था ठेवावी. यामुळे शरीरक्रिया सुरळीत चालते. म्हशी स्वतःचे शारीरिक तापमान बाहेरील तापमानाशी स्वनियंत्रित करतात. 
 • सकाळी लवकर बाहेर चरायला सोडावे किंवा दुपारी ४ वाजेनंतर पुन्हा चरायला सोडावे. 
 • दुपारी शरीरावर ३ ते ४ वेळा थंड पाण्याचे तुषार पडतील अशी व्यवस्था करावी. 
 • मुक्त संचार गोठ्यातील टाकीत कायम पाणी भरून ठेवावे. 
 • म्हशी थंड वातावरण असताना वैरण योग्य रीतीने खातात. या कालावधीत पुरेशी वैरण द्यावी.
 • प्रजननक्षम रेडीची योग्य देखभाल करावी. माजावर येत आहे का ? किंवा मुक्या माजाची लक्षणे दाखवितात याकडे लक्ष ठेवावे. 
 • गाभण जनावरांना अतिरिक्त मात्रेत खनिज मिश्रणे आणि जीवनसत्वे नियमीत खाद्यात पुरवावीत. 
 • जनावरांमध्ये उष्माघाताची लक्षणे आढळल्यास थंड आणि शांत ठिकाणी बांधावे, थंड पाणी पाजावे. शरीरावर थंड पाणी शिंपडावे. पशुवैद्यकीय उपचार करावेत. 

- डॉ.संदीप ढेंगे,  ९९६०८६७५३६
(सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख, पशू शरीरक्रियाशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)


इतर कृषिपूरक
उष्णतेच्या ताणापासून दुधाळ जनावरांची...वातावरणातील तापमान व हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
गाई, म्हशींमधील छातीचे आजारजनावरांमधील छातीच्या आजारामुळे दुग्धोत्पादनावर...
वराहपालन सुरू करताना...वराहपालनातून स्वयंपूर्ण होता येईल का, हे जाणून...
गीर संवर्धन करणारा भरवाड समुदायभरवाड समुदायासाठी गीर गोवंश संपत्ती आहे....
बहुगुणी मधाची शुद्धता अन् उपयोग मधमाश्यांपासून मधासोबतच अन्य मौल्यवान...
कृषी उत्पादन वाढीसाठी मधमाश्या...जागतिक मधमाशी दिवस विशेष वाढते शेतीक्षेत्र,...
आहारात असावा आरोग्यदायी क्विनोआआंध्र प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात क्विनोआची...
दुधाळ जनावरांमधील माज ओळखण्याच्या...दुधाळ जनावरांतील व्यवस्थापनामध्ये मुख्य कार्य...
वासरांची वाढ खुंटण्याची कारणे अन्...वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसर, बाळ खुराक इ....
संगोपन जानी म्हशीचे...चांगल्या दर्जाचे जनावर टिकून राहावे म्हणून जानी...
दूध उत्पादन वाढीसाठी दर्जेदार पशुआहारचारा कुट्टी करत असताना त्याचा योग्य आकार...
दूधनिर्मिती अन् प्रत टिकविण्यासाठी...दुधाचा दर हा गुणवत्तेवर अवलंबून असतो. त्यामुळे...
देशी, जर्सी, एचएफ गाईंचे अर्थशास्त्रशेतीला पूरक म्हणून पशुपालन हा व्यवसाय...
शिफारशीनुसार जनावरांना लसीकरण आवश्यक...जनावरे आजारी पडल्यामुळे दूध उत्पादनात घट, गर्भपात...
उन्हाळ्यातील म्हशींचे व्यवस्थापन जनावरांसाठी पुरेसे पाणी, खाद्याची व्यवस्था ठेवावी...
जनावरातील मूतखड्यावर गोखरू, कुलशी...मूतखडा हा आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात...
नियोजन चारा, खाद्यमिश्रणाचे..जनावरांना वर्षभर लागणाऱ्या पशुखाद्य घटक, हिरवा...
शेळीपालनातील महत्त्वाच्या बाबीआपल्या गोठ्यातील शेळी स्थानिक जातीची असली तरी...
उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनगोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी...
फलोत्पादनासाठी शासनाच्या योजनाकृषी विभागातर्फे फलोत्पादनवाढीसाठी विविध योजना...