agricultural news in marathi Summer management for citrus orchards | Agrowon

मोसंबी बागेसाठी उन्हाळ्यातील व्यवस्थापन

डॉ. एम. बी. पाटील
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

फळझाडाला पाणीपुरवण्यासाठी मडका सिंचन पद्धतीचा वापर करता येतो. मडक्याच्या सच्छिद्र रचनेमुळे पाणी पाझरत राहते. त्यातील पाणी हळूहळू पसरून जमिनीत ओलावा तयार होतो. त्यामुळे झाडाच्या मुळांना सातत्याने आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा पुरवठा संथ गतीने होत राहतो. मडके रिकामे झाल्यानंतर पुन्हा भरावे.
 

फळझाडाला पाणीपुरवण्यासाठी मडका सिंचन पद्धतीचा वापर करता येतो. मडक्याच्या सच्छिद्र रचनेमुळे पाणी पाझरत राहते. त्यातील पाणी हळूहळू पसरून जमिनीत ओलावा तयार होतो. त्यामुळे झाडाच्या मुळांना सातत्याने आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा पुरवठा संथ गतीने होत राहतो. मडके रिकामे झाल्यानंतर पुन्हा भरावे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, मोसंबी लागवड पट्ट्यामध्ये पाण्याची टंचाई तीव्रतेने भासत असते. ज्या प्रदेशामध्ये पाण्याची कमतरता भासत असते, त्या ठिकाणी रब्बी हंगामापासूनच पाण्याच्या नियोजनाला महत्त्व द्यावे लागते. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी योग्य त्या पद्धतींचा अवलंब करावा.

अल्प मुदतीकरिता करावयाच्या उपाययोजना
आच्छादनाचा वापर 

जमिनीतील पाणी बाष्पीभवनाद्वारे, तर झाडातील पाणी पानातून होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेमुळे झपाट्याने कमी होते. जमिनीतील ओलावा टिकवून धरण्यासाठी आच्छादनाचा फायदा होतो.

 • आच्छादनासाठी पॉलिथिन फिल्मचा किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर करता येतो. ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य आहे, त्यांनी ८० ते १०० मायक्रॉन जाडीची फिल्म आच्छादनासाठी वापरावी.
 • सेंद्रिय आच्छादनामध्ये वाळलेले गवत, लाकडी भुस्सा, उसाचे पाचट, पालापाचोळा, गव्हाचे काड, भाताचे काड, गिरिपुष्प यांचा समावेश होतो. अशा अवशेषांचा फळझाडाच्या आळ्यामध्ये विशेषतः ड्रीपरच्या खाली ४ ते ६ इंच जाडीचा थर द्यावा. त्या ठिकाणी तंतुमय मुळे पसरलेली असतात. वाळवीचा प्रादुर्भाव होणार नाही, याकडे लक्ष ठेवावे. आवश्यकतेनुसार शिफारशीत दाणेदार कीटकनाशकांचा वापर करता येईल. सेंद्रिय आच्छादनामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.

मडका सिंचन 
फळझाडाला पाणीपुरवण्यासाठी मडका सिंचन पद्धतीचा वापर करता येतो. ही पद्धत तुलनेने कमी खर्चिक असून, पाण्याचा कार्यक्षम वापर करणारी आहे. कमी वयाच्या फळझाडासाठी ५ ते ६ लिटर क्षमतेचे, तर मोठ्या झाडासाठी १५ लिटर क्षमतेचे मडके निवडावे. त्याच्या तळाशी लहानसे छिद्र पाडून त्यात कापडाची वात बसवून घ्यावी. मडक्याचे तोंड जमिनीच्या वर राहील, अशा प्रकारे मडके झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीत पुरावे. ते पाण्याने भरून मडक्याच्या तोंडावर झाकण ठेवावे. मडक्याच्या सच्छिद्र रचनेमुळे ते पाझरत राहते. त्यातील पाणी हळूहळू पसरून जमिनीत ओलावा तयार होतो. त्यामुळे झाडाच्या मुळांना सातत्याने आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा पुरवठा संथ गतीने होत राहतो. मडके रिकामे झाल्यानंतर पुन्हा भरावे.

काळजी

 • आंतरमशागतीच्या वेळी मडके फुटणार नाही व शेतामध्ये जनावरांकडून तुडवले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.
 • मडके सच्छिद्र असावे.

अतिउष्णतेपासून खोडाचा बचाव करण्यासाठी 
उन्हाळ्यात व पाण्याचे दुर्भीक्ष असलेल्या काळात मोसंबी खोडास बोर्डो पेस्ट लावणे फायद्याचे ठरू शकते. यासाठी फळझाडाच्या खोडास बोर्डो पेस्टचा (१ किलो मोरचूद, १ किलो कळीचा चुना, १० लिटर पाणी) लेप द्यावा. त्यामुळे खोडाचा उष्णतेपासून बचाव होईल.

व्यवस्थापन 

 • खोडास बोर्डो पेस्ट लावताना स्वच्छ ब्रशचा वापर करावा.
 • बोर्डो पेस्टची कार्यक्षमता मिश्रणाच्या तीव्रतेवर, सामूवर अवलंबून असते. योग्य त्या प्रमाणात ताज्या स्वरूपात तयार करून बोर्डो पेस्टचा वापर करावा.
 • तयार मिश्रणामध्ये निळा लिटमस पेपर किंवा लोखंडी खिळा, चाकू बुडवून पाहावा. त्यावर तांबट थर दिसल्यास मोरचुदाचे प्रमाण जास्त झाल्याचे समजावे. त्या योग्य प्रमाणात चुन्याचे द्रावण ओतून तांबूस थर दिसणार नाही, असे मिश्रण तयार करावे.
 • बोर्डो पेस्ट प्लॅस्टिकच्या किंवा मातीच्या भांड्यात स्वतंत्रपणे तयार करावी. त्यासाठी लोखंडी बादली वापरू नये.

दीर्घ मुदतीच्या उपाययोजना 
ठिबक सिंचनाचा वापर 

उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी ठिबक सिंचन उपयोगी ठरते. ठिबकद्वारे विद्राव्य खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्येही देता येतात.

काळजी

 • वेळोवेळी ड्रीपरची तपासणी करावी. त्यातून योग्य प्रमाणात पाणी पडते का, चोकअप नाही ना याची खात्री करावी.
 • दररोज ठिबक चालवण्याची गरज नाही. वाफसा स्थिती आल्यानंतरच ठिबक संच चालवावा.
 • क्षारयुक्त पाण्याचा ठिबक संचाद्वारे वापर केल्यास ते चोकअप होण्याची शक्यता असते.

फळगळची समस्या 
या वर्षीच्या हंगामात आंबे बहर चांगल्यापैकी आहे. मात्र हवामानामुळे दोन तीन वेळा बहर आलेला आहे. तापमानातील चढउतार होत असल्यामुळे गळही जास्त होताना दिसते. यासाठी पाणी योग्य प्रमाणात व वेळेवर देणे महत्त्वाचे आहे.

 • आंबे बहर असेल तर जास्त काळजी घ्यावी.
 • या वर्षी वातावरणातील बदलामुळे अनेक ठिकाणी झाडांना उशिराने फुले लागलेली आहेत. अनेक ठिकाणी नवीन पालवी आणि फुले लागणे एकाच वेळी होत आहे. त्यासाठी विशेष काळजी घ्यावी.
 • मोसंबी बागेमध्ये अंबिया बहराची नवती आणि फुले येण्यास सुरुवात झाली आहे. या नवतीवरच सिट्रल सीला या किडीचा प्रादुर्भाव होऊन कोवळ्या पानांफुलांची कतरण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही बागेमध्ये मावा आणि तुडतुडे या रसशोषक किडीचाही प्रादुर्भाव आहे.

या किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
पहिली फवारणी : डायमिथोएट २ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस १ मि.लि.
त्यानंतर १२ ते १५ दिवसांनी
दुसरी फवारणी :  इमिडाक्लोप्रिड ०.५ मि.लि. किंवा थायामेथोक्झाम ०.३ ग्रॅम.

 • अनेक शेतकऱ्यांना मोसंबी झाडे फुलांवर असताना फवारणी घेण्याविषयी साशंक असतात. मात्र नवीन पालवी आणि फुलकळ्या, फुलांवर किडीचा प्रादुर्भाव असल्यास पीक संरक्षणाच्या दृष्टीने फवारणी आवश्यक ठरते.
 • आंबे बहरात या अवस्थेत पाण्यासोबतच अन्नद्रव्येही पुरवणे आवश्यक असते. त्यासाठी एप्रिल महिन्यात सुमारे ७० लिटर, तर मे महिन्यात ८० लिटर पाणी देणे गरजेचे समजावे.

सध्या परिसरातील मोसंबी बागांमध्ये फळगळ होताना दिसते. त्यामागील कारणे साधारणपणे पुढील प्रमाणे

 • वातावरण बदल आणि त्यातील चढउतार.
 • पाण्याच्या दोन पाळ्यातील अंतर कमी जास्त असणे.
 • पूरक खताच्या मात्रा न देणे.
 •  नत्रयुक्त खतांच्या मात्रा कमी देणे.
 • पाण्याची गरज न जाणताच कमी अधिक पाणी देणे.

ही फळगळ रोखण्यासाठी हे महत्त्वाचे 

 • प्रति झाड ५०० ग्रॅम युरिया देणे.
 • एप्रिलमध्ये ७० लिटर तर मे महिन्यामध्ये ८० लिटर प्रति झाड पाणी देणे.

गळ थांबवण्यासाठी

 • युरिया एक किलो अधिक बोरीक ॲसिड ३०० ग्रॅम अधिक नॅप्थील ॲसेटिक ॲसीड (एनएए) ३० मि.लि. प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे एप्रिल महिन्यात एक फवारणी करावी.
 • मे महिन्यात पोटॅशिअम नायट्रेट दीड किलो अधिक २ ते ३ ग्रॅम जीए ३ प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी.

- डॉ. एम. बी. पाटील, ७५८८५९८२४२
(फळ संशोधन केंद्र, हिमायत बाग, औरंगाबाद)


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...