उन्हाळी मूग लागवड तंत्र

उन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी उत्तम असून, या काळात मुगाचे चांगले उत्पादन मिळू शकते. उन्हाळी हंगामासाठी शिफारशीत सुधारीत वाणांची निवड करावी.
Recommended varieties should be selected for summer mung bean cultivation.
Recommended varieties should be selected for summer mung bean cultivation.

उन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी उत्तम असून, या काळात मुगाचे चांगले उत्पादन मिळू शकते. उन्हाळी हंगामासाठी शिफारशीत सुधारीत वाणांची निवड करावी. पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी रब्बी हंगामातील पिकानंतर उन्हाळी मूग लागवड फायदेशीर ठरते. मूग पीक साधारण ६० ते ६५ दिवसांत पक्व होते. या काळात पाण्याच्या किमान ५ ते ६ पाळ्या देणे गरजेचे आहे. जमीन  मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी जमिनीची निवड करावी. पेरणी 

  • पेरणी फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा ते मार्चचा पहिला पंधरवडा या काळात करावी.
  • पेरणी तिफणीच्या साह्याने करावी. दोन ओळींत ३० सेंमी आणि दोन रोपांत १० सेंमी ठेवावे.
  • बियाणे एकरी ५ ते ६ किलो बियाणे पुरेसे आहे. घरचे बियाणे वापरल्यास दर ३ वर्षांनी त्यात बदल करावा. बीजप्रक्रिया  प्रति किलो बियाण्यांस

  •  कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम
  •  ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम
  • जैविक बीजप्रक्रिया बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया केल्याच्या ३ तासांनंतर रायझोबिअम व पीएसबी या जिवाणू संवर्धकाची २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. जैविक बीजप्रक्रियेमुळे पिकाच्या मुळांवरील गाठींचे प्रमाण वाढण्यास मदत होते. खत व्यवस्थापन 

  • पूर्वमशागतीवेळी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट हेक्टरी १० ते १५ गाड्या द्यावे.
  • लागवडीवेळी एकरी ८ किलो नत्र (युरिया १७.५ किलो) आणि स्फुरद १६ किलो याप्रमाणे खतमात्रा द्यावे.
  • पीक फुलोऱ्यात असताना २ टक्के युरिया (२० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून) फवारणी करावी.
  • शेंगा भरत असताना, २ टक्के डीएपी (२० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी.
  • पाणी व्यवस्थापन 

  • उन्हाळी मुगास वेळेवर पाण्याच्या पाळ्या देणे अतिशय गरजेचे असते. पिकास फुले येताना आणि शेंगा भरताना पाण्याच्या कमतरता पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • पिकास साधारणपणे ५ ते ६ पाळ्या द्याव्यात. पेरणीनंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
  • लागवडीसाठी वाण  बी.पी.एम.आर-१४५, वैभव, पी.के.व्ही. ग्रीन गोल्ड, बी.एम.-२००२-०१, बी.एम. वरील प्रमाणे सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून उन्हाळी मुगाची जातीपरत्वे ४ ते ५ क्विंटल प्रति एकरी उत्पादन मिळु षकते. - संजय बडे, ७८८८२९७८५९ (सहायक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com