agricultural news in marathi, supervision of cows through artificial intellegence, Agrowon, Maharashtra | Agrowon

कृत्रिम बुद्धिमत्ता करते गाईंच्या हालचालींचे विश्लेषण
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

परदेशातील पशुपालकांकडे पीक लागवड क्षेत्राच्या बरोबरीने गाईंची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पशुपालकांना मोठ्या संंख्येने कुरणावर चरणाऱ्या गाईंच्या विविध क्रियांवर लक्ष ठेवणे खूप अवघड जाते. या अडचणीवर मात करण्यासाठी पशुपालकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर फायदेशीर दिसून आला आहे.

पोलंड देशातील एका कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गाईंच्या हालचाली टिपणारे सेन्सर्स यांच्या समन्वयाने चालणारे उपकरण विकसित केले आहे. युरोपीय देश आणि अमेरिकेत या उपकरणाचा वापर पशुपालकांनी सुरू केला आहे.

परदेशातील पशुपालकांकडे पीक लागवड क्षेत्राच्या बरोबरीने गाईंची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पशुपालकांना मोठ्या संंख्येने कुरणावर चरणाऱ्या गाईंच्या विविध क्रियांवर लक्ष ठेवणे खूप अवघड जाते. या अडचणीवर मात करण्यासाठी पशुपालकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर फायदेशीर दिसून आला आहे.

पोलंड देशातील एका कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गाईंच्या हालचाली टिपणारे सेन्सर्स यांच्या समन्वयाने चालणारे उपकरण विकसित केले आहे. युरोपीय देश आणि अमेरिकेत या उपकरणाचा वापर पशुपालकांनी सुरू केला आहे.

अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील वेनेस्बोरो येथील पशुपालक रिचर्ड वॅटसन यांना या उपकरणांचा चांगला फायदा झाला. विविध समस्यांवर वेळेवर उपाययोजना करता आल्याने दूध संकलनात १० टक्के वाढ झाली. त्यामुळे आर्थिक उत्पन्नात चांगली भर पडली. या तंत्रज्ञानाच्या उपयोगाबाबत वॅटसन म्हणाले की, गायीच्या प्रत्येक क्रियेबाबत त्वरित माहिती मिळते. परिणामी तत्काळ उपाययोजना करता येतात. त्यामुळे माझ्या फार्मवरील दोन हजार गायींची निगा राखणे मला खूप सोयीस्कर झाले. तंत्रज्ञानाच्या आवश्‍यकतेवर भर देताना कंपनीचे संस्थापक यासिन खोखार म्हणतात की, सद्यस्थितीत शेतीमध्ये वापरण्यात येत असलेले तंत्रज्ञान हे जुने होत चालले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब झाल्यास दुग्ध व्यवसायातील नफ्याचे प्रमाण वाढणार आहे.

उपकरणांची कार्यपद्धती

  • उपकरण गाईच्या मानेभोवती बांधले जाते. गाईच्या विविध हालचालींची नोंद घेऊन सेन्सर्सच्या माध्यमातून संगणकामध्ये नोंदणी होते. संगणकामध्ये माहितीचे विश्‍लेषण होऊन शेतकऱ्याला गाईच्या चालू असलेल्या हालचालीबाबत माहिती मिळत राहाते. या विश्लेषणातून एखादी गाय आजारी असल्याचा किंवा तिची उत्पादनक्षमता घटल्याचा किंवा ती माजावर आल्याचा नेमका अंदाज घेता येतो. परिणामी त्वरित योग्य उपाययोजना करता येते.
  • तंत्रज्ञानाचा वापर करून मिळणारी माहिती मोबाईल फोनवरही पशुपालकाला मिळते. अमेरिकेतील काही पशूपालक मोबाईलवर अशा माहितीचा संदेश देऊ शकतील अशा सेन्सरचा वापर करत आहेत.
  • आयर्लंडमधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एका कंपनीने गाईच्या प्रसूतीची नेमकी वेळ सांगू शकणाऱ्या उपकरणाची निर्मिती केली आहे. हे उपकरण गाईच्या शेपटीवर (ती जेथून सुरु होते) बसविले असता गाईच्या पार्श्‍वभागाच्या आकुंचनाच्या तीव्रतेवरून प्रसूतीची नेमकी वेळ मोबाईलवर संदेशाच्या माध्यमातून देते. याशिवाय कंपनीने बनविलेले एक उपकरण गाय माजावर आल्याची नेमकी वेळ सांगते.

फोटो गॅलरी

इतर कृषिपूरक
गोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...
गाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....
जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
चिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...