शेतकरी कंपनीच्या वाटचालीकरिता योग्य व्यवसायाची निवड महत्त्वाची ठरते.
शेतकरी कंपनीच्या वाटचालीकरिता योग्य व्यवसायाची निवड महत्त्वाची ठरते.

शाश्‍वत मूल्यसाखळीची पायाभरणी

शेतकरी कंपनी स्थापनेपूर्वी व स्थापनेनंतर शेतकरी कंपनीची नोंदणी केलेल्या भागातील प्रत्येक पिकाच्या मूल्य साखळीचा अभ्यास केला पाहिजे. या अभ्यासाच्या आधारे व्यवसायाच्या संधी शोधावी.

शेतकरी कंपनी स्थापनेपूर्वी व स्थापनेनंतर शेतकरी कंपनीची नोंदणी केलेल्या भागातील प्रत्येक पिकाच्या मूल्य साखळीचा अभ्यास केला पाहिजे. या अभ्यासाच्या आधारे व्यवसायाच्या संधी शोधावी. शाश्‍वत कृषी मूल्यसाखळी विकास या प्रक्रियेमध्ये पीकनिहाय कालावधीत मोठा बदल संभवतो. सन २०१० ते २०२० या दशकात अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या. मात्र संचालक मंडळाची क्षमताबांधणी न झाल्याने ते व्यवसाय निवडू शकले नाहीत. केवळ शासकीय योजनांचा फायदा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या कंपन्यांतून चांगले उद्योग उभारू शकले नाहीत. यावरून एखादी कंपनी स्थापणे आणि उद्योजकता विकास यामध्ये मोठे अंतर असल्याचे स्पष्ट होते. कोणत्याही योजना राबवताना त्यांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया व तपशील याकरिता खास प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी विविध प्रकल्प आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून यास बळकटीकरण देण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेतील प्रत्येक घटक कृषी मूल्यसाखळी विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. विशेषतः शेतकरी उत्पादक कंपन्यांतील संचालकाच्या क्षमता सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र अद्यापही शाश्‍वत मूल्यसाखळीचा विकास दृष्टिक्षेपात नाही. गेल्या दशकात शासनामार्फत शेतकरी उत्पादक कंपनीची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकल्पांची उभारणी केली. सद्यःस्थितीत शेतकरी उत्पादक कंपन्यांना व्यवसाय निवडीकरिता मार्गदर्शन करण्याची गरज आहे. या मार्गदर्शनातून चालू दशकात किमान ५० टक्के शेतकरी उत्पादक कंपन्या कृषी मूल्यसाखळी उभारणीत सक्षम होतील. पर्यायी बाजारपेठेची निर्मिती होऊ शकेल. कृषी मूल्य साखळी उभारणीपूर्वी योग्य व्यवसायाची निवड व त्यासाठी यंत्रणा उभारणी महत्त्वाची. मात्र बहुतांश शेतकरी कंपन्या या अन्य कंपन्या व व्यवसायांचे अनुकरण करण्यात धन्यता मानतात. विशेषतः कोणत्या योजनेमध्ये अनुदान मिळते, यावर त्यांचे लक्ष असते. अनेक वेळा मुख्य व्यवसाय पूर्णपणे स्थिर झालेला नसतानाही नवीन व्यवसायात शिरण्याची घाई केली जाते. बाजाराची कोणतीही माहिती नसताना अनुदानासाठी पायाभूत सुविधा उभारल्या जातात. शेतकरी कंपनीकरिता व्यवसाय निवड  शेतकरी कंपनी स्थापनेपूर्वी व स्थापनेनंतर शेतकरी कंपनीची नोंदणी केलेल्या भागातील प्रत्येक पिकाच्या मूल्य साखळीचा अभ्यास केला पाहिजे. या अभ्यासाच्या आधारे व्यवसायाच्या संधी शोधावी. आवश्यक तिथे नाबार्ड पॉपी, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प, केंद्र पुरस्कृत १० हजार शेतकरी उत्पादक कंपनी निर्मिती व बळकटीकरण यांसारख्या प्रकल्पातील बेसलाइन सर्व्हे, पणन आराखडा अशा प्रपत्रांचा आधार घेता येईल. व्यवसायाची निवड व पुढील दिशा ठरवण्यासाठी निरीक्षणे उपयुक्त ठरतील. १) सभासद व गावकऱ्यांना पीक लागवडीसाठी निःस्वार्थी मार्गदर्शन आवश्यक. २) माती, पाणी परीक्षणासाठी प्रमाणित प्रयोगशाळा, अल्प दरात तपासणी, पीक लागवडीबाबत योग्य सल्ला तसेच खत, कीडनाशके, बियाणे उपलब्धता व मार्गदर्शन ३) शेतीपयोगी अवजारे, अल्पदरात अवजारांची उपलब्धता. ४) शेती करण्यासाठी लागणाऱ्या विविध सुविधा, यंत्रे व अवजारे. ५) काढणीपश्‍चात व्यवस्थापनाकरिता स्वच्छता केंद्रे, प्रतवारी केंद्रे, आवश्यक यंत्रे, व मार्गदर्शन. ६) ग्रामस्तरावर विक्री व्यवस्था, सध्याचे बाजारभाव व भविष्यात अंदाज देणारे मार्गदर्शन. ७) शेतीमाल वजन करण्याची व वाहतुकीची व्यवस्था. ८) वरील सर्व १ ते ७ प्रकारांतील कामकाजासाठी अल्प व्याजदरात अर्थसाह्य उपलब्ध. वरील सर्व १ ते ८ बाबींसाठी गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण उपलब्ध. कृषी मूल्य साखळीतील समाविष्ट घटक  १) कृषी निविष्ठा विक्रेता २) शेतकरी ३) हुंडेकरी / शेतीमाल संकलित करणारा मध्यस्थ. ४) गावस्तरावरील खरेदीदार ५) बाजार समितीतील मध्यस्थ /दलाल / कमिशन एजंट/ आडते ६) खरेदीदार/ व्यापारी ७) प्रक्रियादार ८) घाऊक खरेदीदार ९) किरकोळ विक्रेता १०) निर्यातदार ११) ग्राहक वरील घटकामध्ये पीकनिहाय काही बदल असले तरी बहुतांश घटक सहभागी असल्याचे दिसून येईल. उदाहरणादाखल खाली मूल्य साखळीद्वारे शेतीमाल प्रवास वर्णन केला आहे. मध्यस्थ / दलाल / कमिशन एजंट/ आडते / व्यापारी वरील घटकांचा अभ्यास केल्यास गाव किंवा तालुका स्तरावर हुशार आणि चाणाक्ष असा घटक म्हणजे मध्यस्थ. गाव पातळीवर पीकनिहाय विविध मध्यस्थ असतात. काही व्यापारी थेट खरेदी करतात तर काही बाजार समितीतील व्यापाऱ्याची भूमिका बजावतात. काही व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करून प्रक्रिया उद्योगाला पुरवितात. वरील सर्व उपघटकांची व्यवस्थित मांडणी करावी. त्यातून आपल्या पिकातील कृषी मूल्य साखळी समजून घेण्यास मदत होईल. - प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com