कंपन्यांच्या माध्यमातून शाश्‍वत मूल्यसाखळी

अजूनही शाश्‍वत मूल्यसाखळी विकसित झालेली नाही. शाश्‍वत कृषी मूल्यसाखळी विकास ही एकदिवसाची प्रक्रिया नसून पीकनिहाय कालावधीमध्ये मोठा बदल संभवतो.
Selling farm produce directly to consumers through a farmer company in the urban market.
Selling farm produce directly to consumers through a farmer company in the urban market.

अजूनही शाश्‍वत मूल्यसाखळी विकसित झालेली नाही. शाश्‍वत कृषी मूल्यसाखळी विकास ही एकदिवसाची प्रक्रिया नसून पीकनिहाय कालावधीमध्ये मोठा बदल संभवतो.  यापूर्वीच्या लेखांमध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. आता कंपन्यांचा प्रवास हा  पीक उत्पादनवाढीवरुन पीकनिहाय मुल्यसाखळी  निर्मितीकडे सरकत आहे. यामध्ये प्रामुख्याने विचार केला, तर राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि त्या माध्यमातून विविध प्रकल्प, विविध पिकांच्या मूल्यसाखळ्या तयार करण्याचे बरेच प्रयत्न झाले, आजही होत आहेत. यासोबतच जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी, आशियायी विकास बँक व इतर अनेक अर्थसाह्य करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून मूल्यसाखळ्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यापुढील काळात या प्रयत्नांची तीव्रता वाढत आहे.  शाश्‍वत मूल्यसाखळी विकासाची गरज

  • शेतकरी गटनिर्मिती, शेतकरी कंपनीनिर्मिती, महिला बचत गटांचे फेडरेशन, सहकारी संस्था असे एक ना अनेक ‍विस्ताराचे मॉडेल शासनातील विविध विभागांमार्फत विकसित करण्यात आले. विस्ताराचे मॉडेल विकसित झाले, परंतु सहकारी संस्था वगळता इतर मॉडेल्समधून कृषी मूल्य साखळ्या तयार झालेल्या नाहीत. 
  • विविध मॉडेल्स यशस्वी होण्याची आणि न होण्याची ‍विविध कारणे आहेत. सहकारी संस्था उभारणी, बळकटीकरण, उद्योग व्यवसाय उभारणी याकरिता सुमारे १०० वर्षे व त्यापेक्षा जास्त कालावधी लागला. 
  • देशात सहकार आणि त्यासंबंधी उद्योगांचा विचार केला तर खते, अन्नप्रक्रिया, कृषी, दुग्ध व्यवसाय इत्यादींशी निगडित प्रक्रिया उद्योगांमध्ये सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मोठी प्रगती झाल्याने शेतकरी व त्यांच्याशी निगडित वर्गाची आर्थिक उन्नती झाली. परंतु या प्रगतीने गती घेणे अपेक्षित आहे. 
  • खेड्यांचे रूपांतर शहरीकरणाकडे  होत आहे. यामुळे सहकार क्षेत्राने आता कात टाकण्याची आवश्यकता आहे. शासनाच्या माध्यमातून आता पुढील पावले उचलण्यास सुरुवात झालेली असून, येत्या काही वर्षांत परिस्थीतीत बदल घडून सहकार क्षेत्रामार्फत निर्मित कृषी  व इतर मुल्यसाखळयामध्ये परिवर्तन घडू शकेल.
  • महिला बचत गट व लघु व बचत गटांचे फेडरेशन यांचे मार्फत सुक्ष्म ‍वित्त पुरवठा आणि सूक्ष्म प्रक्रिया उद्योग यांच्या माध्यमातून विविध कृषी, अन्न व इतर शेती व्यतिरिक्त उद्योगांमध्ये बदल झाले परंतु असे बदल त्यांची दखल घेण्याजोगे न झाल्याने बाजारपेठेत स्वतःचे स्थान ‍निर्माण करण्यात यशस्वी झाले नाहीत. 
  • बचत गटांचे फेडरेशन सुद्धा बाजारपेठेतील विविध विक्रीच्या साखळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आपला ठसा उमटविण्यात पूर्णपणे सक्षम झालेले नाहीत. यातील हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या संस्था सोडल्या, तर शासनाच्या यंत्रणेचा सहभाग न घेता या संस्था अजूनही शासकीय कार्यक्रम व्यवस्थेत गुंतून पडल्या आहेत.
  • खासगी क्षेत्राप्रमाणे या संस्थांनी स्वतंत्र व्यवसायनिर्मिती करून आपला ठसा उमटविणे अपेक्षित असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार‍निर्मितीसाठी रणनीती तयार करणे आवश्यक आहे.
  • शेतकरी उत्पादक कंपनीतून मूल्यसाखळी 

  • शेतकरी उत्पादक गट व शेतकरी उत्पादक कंपनी हे विस्ताराचे मॉडेल मागील काही वर्षात कृषी मूल्यसाखळ्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु मॉडेल चांगले असले तरी त्यांच्या उभारणीतील उद्देश मुळात शासकीय अनुदान व वैयक्तीक लाभ या चौकटीत गुंतून पडत असल्याने शेतकरी गटांची निर्मिती व शेतकरी कंपनी उभारणी यामध्ये पायाभरणी योग्य रीतीने होण्याची आवश्यकता आहे. 
  • शेतकरी गटांमध्ये नेतृत्वगुण असून, ही त्यांची प्रगती महिला बचत गटांप्रमाणे झाली नाही. कृषिमूल्य साखळी विकास संकल्पना या दोन्ही गटांच्या मॉडेलमध्ये काही प्रमाणात अस्तिवात होती, परंतु ती शाश्‍वत नव्हती. शासनामार्फत या दोन्ही मॉडेलसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले, परंतु या संस्थांमार्फत त्याचा लक्षात राहील असा फायदा व त्याचे परिणाम दिसून आले नाहीत. काही फायदे व परिणाम दिसले परंतु ते दखल घेण्याजोगे नव्हते.
  • शेतकरी गट फक्त वैयक्तिक प्रगतीत गुरफटून राहिल्याने व ते बनविणाऱ्या यंत्रणेला त्यातील भेद लक्षात न आल्याने हे गट योजना वितरणाचे माध्यम बनले. त्यामुळे शेतकरी गटांची निर्मिती झाली, परंतु त्यांच्यामार्फत शाश्‍वत कृषी मूल्यसाखळी विकास घडला नाही. यापुढील काळात तशी शक्यता या गटांमार्फत दिसत नाही. या सर्व बाबींवर विस्तृत अभ्यास होऊन शेतकरी उत्पादक कंपनीचे मॉडेल कृषी मूल्यसाखळी विकासास हातभार लावू शकते असे ‍चित्र निर्माण होत आहे. 
  • शेतकरी कंपन्यांचे बळकटीकरण 

  • शेतकरी कंपनी निर्मिती व बळकटीकरणाच्या माध्यमातून पर्यायी बाजार व्यवस्था उभारणीसाठी शासनामार्फत विविध योजनांचा अंतर्भाव करून प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने नाबार्ड अंतर्गत पॉपी योजना, केंद्र शासनाची १०,००० शेतकरी उत्पादक कंपनी निर्मिती व बळकटीकरण योजना यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.
  • कृषी मूल्य साखळी विकास निर्मितीसाठी आशियायी बँक अर्थसह्यित मॅग्नेट, जागतिक बँक अर्थसहाय्यीत स्मार्ट व पोकरा प्रकल्प, आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी अंतर्गत नव तेजस्विनी प्रकल्प, राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रकल्प यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. 
  • - ९९७०३६४१३० (कृषी व्यवसाय व पणन तज्ज्ञ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com