agricultural news in marathi Technique of sesame cultivation | Page 2 ||| Agrowon

तंत्र तीळ लागवडीचे

संजय बडे
शुक्रवार, 18 जून 2021

तीळ पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून घेता येते. जमिनीत योग्य वाफसा आल्यावर जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिला आठवड्यात पेरणी करावी.  
 

तीळ पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून घेता येते. जमिनीत योग्य वाफसा आल्यावर जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिला आठवड्यात पेरणी करावी. पेरणी ४५ बाय १० सेंमी किंवा ३० बाय १० सेंमी अंतरावर अनुक्रमे ४५ सेंमी अंतराच्या पाभरीने पेरणी करावी.

तीळ हे भारतातील सर्वांत जुने तेलबिया पीक आहे. तिळाच्या तेलास खाद्य तेल व औषधी तेल म्हणून जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. तीळ हे पीक दुबार, मिश्रपीक व आंतरपीक पद्धतीसाठी उपयुक्त ठरते. तसेच सलग पेरणी करताना योग्य व्यवस्थापनाद्वारे चांगले उत्पादन तीळ लागवडीतून मिळू शकते. म्हणून सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून तीळ लागवडीस प्राधान्य द्यावे. तीळ हे पीक कमी कालावधीत येत असल्याने दुबार पीक पद्धतीसाठी योग्य आहे.

आरोग्यदायी महत्त्व 

 • तिळामध्ये तेलाचे ५० टक्के व प्रथिनांचे २५ टक्के प्रमाण असते.
 • तिळापासून मिळालेले तेल दीर्घकाळ चांगले टिकते, खवट होत नाही.
 • कॅल्शिअम, फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते.
 • पशू व कोंबडीसाठी पेंड उत्तम खाद्य.
 • तिळाचा साबण, रंग, वनस्पती तूप, औषधी तेल व सुगंधी तेल इत्यादींच्या निर्मितीमध्ये उपयोग होतो.

जमीन व पूर्वमशागत 

 • लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
 • खरिपात पाणी साचणार नाही अशी जमीन निवडावी.
 • एक नांगरणी आणि २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी.

बीजप्रकिया 

 • पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यांस थायरम किंवा कार्बेन्डाझिम २.५ ते ३ ग्रॅम याप्रमाणे चोळावे. किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास वापरावे.
 • त्यानंतर ॲझोटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात लावावे. त्यामुळे बियाण्यांची उगवण चांगली होऊन उत्पादनात वाढ होते.

बियाणे प्रमाण 
एकरी १ किलो बियाणे पेरणीसाठी पुरेसे आहे.

लागवडीसाठी योग्य जाती 
एकेटी -६४, आरटी- ३४६, जे.एल.टी.- ७ (तापी) फुले तीळ नं.१, जे.एल.टी.-४०८

लागवड 

 • जमिनीत योग्य वाफसा आल्यावर जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिला आठवड्यात पेरणी करावी.
 • पेरणी ४५ बाय १० सेंमी किंवा ३० बाय १० सेंमी अंतरावर अनुक्रमे ४५ सेंमी अंतराच्या पाभरीने पेरणी करावी.
 • तिळाचे बियाणे फार बारीक असल्यामुळे त्यात समप्रमाणात वाळू, राख, माती किंवा शेणखत मिसळावे.

आंतरपिके 
आंतरपीक पद्धतीमध्ये प्रामुख्‍याने तीळ + सोयाबीन (३:१), तीळ + तूर (२:१), तीळ + कापूस (३:१), तीळ + मूग (३:३), तीळ + ज्वारी (३:१) याप्रमाणात ओळीमध्ये पेरणी फायदेशीर ठरते.

विरळणी / नांगे भरणे 

 • पेरणीनंतर ७ ते ८ दिवसांनी नांगे भरावेत.
 • पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली व त्यानंतर ८ दिवसांनी दुसरी विरळणी करून दोन झाडांत १० ते १५ सेंमी अंतर ठेवावे.

खत व्यवस्थापन 

 • पूर्वमशागतीवेळी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत वापरावे.
 • तीळ पिकांस हेक्टरी २५ किलो नत्र व २५ किलो स्फुरदची मात्रा द्यावी.
 • पेरणीच्यावेळी अर्धे नत्र (हेक्टरी १२.५ किलो) व संपूर्ण स्फुरद द्यावे. उर्वरित नत्राची मात्रा पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे.
 • सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास पेरणीवेळी २० किलो गंधक प्रति हेक्टरी द्यावे.

व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी 

 • भारी जमिनीत बी झाकण्यापूर्वी १२ ओळींनंतर लगेच दोन ओळींमध्ये (फटीत) बळीराम नांगराच्या साह्याने चर काढावेत. यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरेल व अतिरिक्त पाणी बाहेर निघून जाण्यास मदत होईल. मुरलेल्या पाण्याचा पावसाच्या ताणावेळी पिकास फायदा होतो.
 • अधिक उत्पादनासाठी पीक फुलोऱ्यात आणि बोंडे वाढीच्या अवस्थेत असताना २ टक्के युरियाची फवारणी करावी.
 • हे पीक प्रामुख्याने जिरायत क्षेत्रात घेतले जाते. पाण्याची सोय असल्यास व पावसात जास्तीचा खंड पडल्यास फुले व बोंडे मध्ये दाणे भरताना संरक्षित पाणी द्यावे.

- प्रा. संजय बडे, ७८८८२९७८५९.
(सहायक प्राध्यापक (कृषिविद्या), दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगांव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद)


इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...