agricultural news in marathi Techniques of Coriander Cultivation | Agrowon

तंत्र कोथिंबीर लागवडीचे...

डॉ. एस. एस. विटनोर, डॉ. डी. जी. इंगोले.
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे. बी पेरणीपूर्वी वाफे चांगले भिजवून घ्यावेत. वाफसा आल्यानंतरच पेरणी करावी. पेरणीनंतर बी खत मातीने झाकून हलके पाणी द्यावे.
 

कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे. बी पेरणीपूर्वी वाफे चांगले भिजवून घ्यावेत. वाफसा आल्यानंतरच पेरणी करावी. पेरणीनंतर बी खत मातीने झाकून हलके पाणी द्यावे.

विशिष्ट स्वादयुक्त पानांमुळे कोथिंबिरीला वर्षभर मागणी असते. हे कमी वेळात येणारे आणि चांगला आर्थिक नफा मिळवून देणारे पीक आहे. उन्हाळी हंगामात कोथिंबिरीचे उत्पादन कमी असले तरी मागणी जास्त असते. पाण्याचे योग्य नियोजन केल्यास लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे पीक आहे.

 • मध्‍यम कसदार आणि मध्‍यम खोलीची जमीन पिकासाठी योग्य असते.
 • माती परीक्षण करून खतांचा योग्य पुरवठा केल्यास, हलक्या जमिनीत सुद्धा उत्पादन घेता येते.
 • लागवड कोणत्याही हंगामात करता येते.अति पावसाचा प्रदेश वगळता महाराष्ट्रातील हवामान कोथिंबिरीच्या वर्षभर लागवडीसाठी पोषक आहे.
 • उन्हाळ्यात तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास वाढ कमी होते.

सुधारित जाती
डी.डब्ल्यू.डी-९, जीसी-१,२,३, लाम.सी.एस.-२, लाम.सी.एस.-४, लाम.सी.एस.-६, को-१, कोकण कस्तुरी.

बीजप्रक्रिया 

 • बियाणांची चांगली उगवण होण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे. पेरणीपूर्वी धने फोडून बिया वेगळ्या कराव्यात.
 • पेरणीपूर्वी बी पाण्यात ऊबदार जागी १२ तास ठेवून नंतर लागवड करावी. त्यामुळे उगवण ८ ते १० दिवसांत होऊन काढणीस लवकर तयार होते.

लागवड 

 • उभी आडवी नांगरणी करून जमीन चांगली भुसभुशीत करावी.
 • लागवडीसाठी ३ बाय २ मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. प्रत्येक वाफ्यात ८ ते १० किलो चांगले कुजलेले शेणखत टाकून मिसळावे.
 • पेरणीपूर्वी वाफे चांगले भिजवून घ्यावेत. वाफसा आल्यानंतरच पेरणी करावी.
 • वाफे सपाट करून बी फेकून पेरावे. बी खत मातीने झाकून हलके पाणी द्यावे.
 • लागवडीसाठी हेक्टरी ६० ते ८० किलो बी लागते.
 • प्रादुर्भावग्रस्त जमिनीत सतत कोथिंबीर पीक घेणे टाळावे. शेतामध्ये स्वच्छता ठेवावी.लागवडीसाठी रोग प्रतिकारक जातींचा वापर करावा.

 खत व पाणी व्यवस्थापन 

 • लागवडीपूर्वी जमिनीत हेक्टरी ५ ते ६ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे.
 • उगवल्यानंतर साधारणतः ३५ ते ४० दिवसांनी ४० किलो नत्राची मात्रा द्यावी. त्यासोबत प्रतिलिटर पाण्यात ८ ग्रॅम युरिया मिसळून २ फवारण्या कराव्यात.
 • पिकास नियमित पाण्याची गरज असते. त्यामुळे उन्हाळ्यात दर ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे.

संपर्क : डॉ. एस. एस. विटनोर, ९५२७६७५१०३
डॉ. डी. जी. इंगोले, ८९५६८३३८८९
(छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, जि. औरंगाबाद.)


इतर ताज्या घडामोडी
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...
दुर्लक्षित पिकांनाही येत्या काळात संधीद्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, संत्रा ही राज्याच्या...
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात...गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा...