agricultural news in marathi, technology developed to preserve rose till 1 year , Agrowon, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

एक वर्षापर्यंत टिकणारे खरे गुलाब !
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

झाडापासून कापणी झाल्यानंतर फूल जास्तीत जास्त ८ ते १० दिवसांपर्यंत टिकते. मात्र, अमेरिकेतील सॅन अॅन्तोनियो (टेक्सास) येथील एका कंपनीने गुलाबाची फुले एक वर्षापर्यंत टिकवण्याची पद्धत विकसित केल्याचा दावा केला आहे. यामुळे अत्यंत नाशवंत मानल्या जाणाऱ्या फुलांच्या बाजारपेठेतील अनेक संदर्भ बदलले जाणार आहेत.

झाडापासून कापणी झाल्यानंतर फूल जास्तीत जास्त ८ ते १० दिवसांपर्यंत टिकते. मात्र, अमेरिकेतील सॅन अॅन्तोनियो (टेक्सास) येथील एका कंपनीने गुलाबाची फुले एक वर्षापर्यंत टिकवण्याची पद्धत विकसित केल्याचा दावा केला आहे. यामुळे अत्यंत नाशवंत मानल्या जाणाऱ्या फुलांच्या बाजारपेठेतील अनेक संदर्भ बदलले जाणार आहेत.

शेतीमध्ये फुलांचे दर्जेदार उत्पादन महत्त्वाचे आहे. मात्र, त्या इतकाच ग्राहकांच्या हाती पडल्यानंतरचा टिकवण कालावधीही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. योग्य वेळी कापलेल्या लांब दांड्याच्या गुलाब फुलांचा साठवण कालावधी सामान्य तापमानामध्ये जास्तीत जास्त १० ते १५ दिवसांपर्यंत असतो. मात्र, आयव्हरी फ्लोरल डिझाइन या कंपनीने खास द्रावण तयार केले असून, त्यामुळे फुलांची टिकवणक्षमता एक वर्षापर्यंत वाढवणे शक्य असल्याचा दावा केला आहे. कंपनीचे मालक तुआन ली यांनी सांगितले, की फुले अधिक काळ टिकावीत, यासाठी फुलांच्या कापणी करण्यापासूनच प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. फुलांची काढणी झाल्यानंतर त्वरित त्यांना एका द्रावणामध्ये बुडवण्यात येते. हे द्रावण ग्लिसरिन, आवश्यक तेल आणि काही प्रकारची वनस्पतिजन्य घटक यापासून बनवले जाते. त्यानंतर ही फुले सामान्य तापमानामध्ये ठेवता येतात. फुलांसाठी सूर्यप्रकाश किंवा पाण्याची आवश्यकताही नसते. ही फुले विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत. सध्या व्हॅलेंटाइन दिनाच्या निमित्ताने लाल आणि गुलाबी रंगांमध्ये त्याची अधिक उपलब्धता केली आहे. विविध आकारांच्या बॉक्समध्ये मिळणाऱ्या या फुलांची किंमत सुरू होते ती १२५ डॉलरपासून.

आश्चर्याचा धक्का...
मेगान मॅकवॉन्घ यांच्या पतीने सहा महिन्यांपूर्वी लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त गुलाबाची काही फुले दिली. ती एका बॉक्समध्ये होती. आजही ती पहिल्या दिवसाप्रमाणे ताजी दिसतात, हेच त्याचे वैशिष्ठ्य. त्यासाठी ना पाण्याची गरज, ना वेळच्या वेळी दांड्यांना छाटण्याची गरज ! मेगान यांनी सांगितले, की सामान्यतः केवळ कृत्रिम फुलेच इतके दिवस टिकत असल्याचे माहीत होते. अर्थात कृत्रिम फुलांवर धूळही मोठ्या प्रमाणात जमा होते. मात्र, खरी फुले सहा महिन्यांपेक्षाही अधिक काळ टिकल्याने आश्चर्य वाटत आहे. 

टॅग्स

इतर फूल शेती
गॅलार्डिया लागवड तंत्रज्ञान गलांडा नावाने ओळखले जाणारे गॅलार्डियाचे पिवळ्या...
ग्लॅडिओलस लागवड तंत्रज्ञान ग्लॅडिओलस फुलाचे महत्त्व :  लांब...
मोगरावर्गीय फूलपिके लागवड तंत्रज्ञान मोगरावर्गीय फूलपिकांमध्ये मोगरा, जाई, जुई,...
शेवंती लागवड तंत्रज्ञान फूलपिकाची ओळख व क्षेत्र  :  जागतीक...
अॅस्टर लागवड तंत्रज्ञान ॲस्टरची फुले सजावट, फुलदाणी, हार-गुच्छ तयार...
खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान गुलाबाच्या फुलांचा उपयोग...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
झेंडू लागवड तंत्रज्ञान झेंडू फुलांना सणसमारंभात चांगली मागणी असते....
उत्पादनातील सातत्यामुळे झेंडूने दिले...स्वतःची थोडीशीही शेती नाही. पण शेती घ्यायची,...
जिद्द, चिकाटीतून जीवनात फुलविले रंगजिद्द, चिकाटी व वेगळी वाट शोधण्याची वृत्ती असेल...