नव्या रंगामुळे एअर कंडिशनिंगची गरज होईल कमी

जागतिक तापमान वाढीसाठी एअर कंडिशनिंग यंत्रणा आणि त्यातून उत्सर्जित होणारे हरितगृह वायू यांना कारणीभूत मानले जाते. आता इमारतींवर नव्या पांढऱ्या रंग लावल्यास एअर कंडिशनिंग यंत्रणेची गरज कमी होणार असल्याचा दावा पुरदेई विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.
Photographs of white patterns taken with the help of infrared cameras. The dark purple in the center indicates the ability to cool this white surface.
Photographs of white patterns taken with the help of infrared cameras. The dark purple in the center indicates the ability to cool this white surface.

जागतिक तापमान वाढीसाठी एअर कंडिशनिंग यंत्रणा आणि त्यातून उत्सर्जित होणारे हरितगृह वायू यांना कारणीभूत मानले जाते. आता इमारतींवर नव्या पांढऱ्या रंग लावल्यास एअर कंडिशनिंग यंत्रणेची गरज कमी होणार असल्याचा दावा पुरदेई विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. त्यांनी विकसित केलेल्या अल्ट्रा व्हाइट रंगाचे संशोधन ‘जर्नल एसीएस ॲप्लाईड मटेरिअल्स ॲण्ड इंटरफेसेस’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. पुरदेई विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने सर्वाधिक पांढरा रंग (‘अल्ट्रा व्हाइट पेंट’) तयार केला असून, आजवरच्या पांढरेपणाच्या सर्व सीमा किंवा मर्यादा त्याने ओलांडल्या असल्याचे सांगितले जाते. हा नवा रंग पांढरा असल्याचा फायदा काय असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडू शकतो. हा पांढरा रंग आजवरच्या कोणत्याही फॉर्म्युलेशनपेक्षा त्याखाली पृष्ठभाग अधिक थंड ठेवतो. त्याविषयी माहिती देताना पुरदेई विद्यापीठातील यांत्रिकी अभियांत्रिकीचे प्रोफेसर शिउलिन रुयेन म्हणाले, की जर तुम्ही या नव्या पांढऱ्या रंगाने तुमच्या घराचे छत क्षेत्रफळ १००० वर्ग फूटापर्यंत रंगवले तर त्यातून तुम्हाला १० किलोवॉट इतकी शीतकरण ऊर्जा मिळू शकते. ही कोणत्याही घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मध्यवर्ती एअर कंडिशनरपेक्षा अधिक शक्तीशाली आहे. सामान्य पांढऱ्या रंगासोबत तुलना शास्त्रज्ञांच्या मते, हा पांढरा रंग सर्वाधिक काळ्या (त्याला शास्त्रीय भाषेमध्ये ‘व्हॅण्टाब्लॅक’ म्हटले जाते) आणि ९९.९ टक्के दृश्य प्रकाश शोषणाऱ्या रंगाइतका ताकदवान समजू शकता. कारण या नव्या पांढऱ्या रंगाच्या फॉर्म्युलेशनद्वारे परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशाचे प्रमाण सुमारे ९८.१ टक्के इतके असू शकते. यापूर्वी शीतकरणासाठी वापरल्या जात असलेल्या पांढऱ्या रंगाची परावर्तन क्षमता ही ९५.५ टक्के इतकीच होती. या नव्या रंगामुळे अवरक्त किरणे, उष्णता त्यावेळी दूर फेकली जाईल. सामान्य व्यावसायिक पांढरा रंग हा थंड होण्याऐवजी स्वतः उष्ण होतो. सध्याच्या रंग बाजारपेठेमध्ये सूर्यप्रकाशाच्या परावर्तनाची क्षमता केवळ ८० ते ९० टक्के इतकी आहे. कशामुळे मिळतो इतका शुभ्र पांढरा रंग? रंगांना अति पांढरेपणा देणारे दोन घटक असतात.

  •  रंगामध्ये बेरियम सल्फेट नावाच्या रासायनिक संयुगाची अतिउच्च तीव्रता. हे रसायन सामान्यतः फोटो पेपर आणि सौदर्य प्रसाधनातील पांढऱ्या रंगासाठी वापरला जातो. या प्रकल्पावर काम करणारे पोस्ट डॉक्टर संशोधक शियांग्यु ली म्हणाले की, व्यावसायिकरित्या वापरल्या जाणाऱ्या विविध पांढऱ्या उत्पादनाचा अभ्यास केला असता आम्हाला त्यात बेरियम सल्फेटचा वापर केल्याचेच आढळले. यामुळे सैंद्धातिक पातळीवर खरोखरच उत्तम परावर्तन गुणधर्म असलेला पांढरा रंग मिळवता येतो.
  • रंगामध्ये बेरियम सल्फेटचे विविध आकाराचे सूक्ष्म कण वापरणे. या कणांच्या आकारावरून ते नेमका किती प्रकाश परावर्तित करणाऱ्या हे ठरत असते. त्यामुळे वेगवेगळ्या आकाराच्या बेरियम सल्फेट कणांचे योग्य मिश्रण सूर्यप्रकाशातील अधिक प्रकाशाचे परावर्तन करू शकतात.
  • या दोन नियमित मार्गाव्यतिरीक्त पांढरा रंग अधिक पांढरा करण्याचे (रंगाचे गुणधर्म न बदलता) फारच कमी शक्यता उरतात. कारण अधिक पांढरा रंग मिळवण्यासाठी बेरियम सल्फेटच्या कणांची तीव्रता किंवा प्रमाण वाढविण्याला मर्यादा आहेत. जितकी अधिक तीव्रता आपण करत जाऊ तितका त्या रंगाचे तुकडे पडण्याची किंवा साल निघून येण्याची शक्यता वाढत जात असल्याचे ली सांगतात. इतका थंडावा मिळू शकतो... रंग किंवा पृष्ठभागाचे बाह्य तापमान अधिक अचूकतेने मोजण्यासाठी शास्त्रज्ञ थर्मोकपल्स या तंत्राचा वापर करतात. त्यांच्या मते, बाह्य वातावरणामध्ये रंगामुळे पृष्ठभाग हा अन्य परिसरापेक्षा रात्रीच्या वेळी १९ अंश फॅरनहिटपर्यंत थंड राहू शकतो. दिवसा कडाक्याच्या उन्हामध्ये परिसरापेक्षा रंगामुळे ८ अंश फॅरनहिट पर्यंतची शीतलता मिळू शकते. जर रंगाचे परावर्तन अधिक कार्यक्षम असेल, तर हिवाळ्याच्या मध्यावरही ते काम करू शकते. बाह्य वातावरणाच्या चाचणीमध्ये ४३ अंश फॅरनहिट तापमान असताना रंगामुळे पृष्ठभागाचे तापमान हे १८ अंश फॅरनहिटने कमी ठेवणे शक्य होते. सहा वर्षाच्या संशोधनाचे फलित एअर कंडिशनरला पर्याय म्हणून शीतकरण रंगाचा वापर करण्याला १९७० पासून सुरवात झाली. रुयेन यांच्या प्रयोगशाळेमध्ये सर्वाधिक पांढऱ्या आणि थंड अशा रंगाच्या निर्मितीसाठी गेल्या सहा वर्षापासून संशोधन केले जात आहे. या संशोधनामध्ये प्रथम वेगवेगळ्या १०० मुलद्रव्यांवर काम करण्यात आले. त्यातून अनावश्यक घटक कमी करत करत ते १० मुलद्रव्यांपर्यंत पोचले. या प्रत्येक मूलद्रव्यांचे सुमारे ५० फॉर्म्युलेशन्स तपासण्यात आली. त्यांनी सुरवातीला मिळवलेला पांढरा रंग हा कॅल्शिअम कार्बोनेटपासून बनवला होता. हे मूलद्रव्य पृथ्वीवरील दगड आणि सागरी शिंपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र व्यावसायिक आणि बेरियम सल्फेट आधारित रंगाच्या तुलनेमध्ये बाह्य वातावरणामध्ये वापरण्यामध्ये काही अडचणी येऊ लागल्या. त्यावर मात करण्याचे तंत्र विकसित करण्यात आले असून, कोणत्याही व्यावसायिक रंगासोबत स्पर्धा करू शकेल, असा सर्वाधिक पांढरा रंग मिळवण्यात त्यांना यश आले आहे. या रंगाच्या पेटंटसाठी पुरदेई रिसर्च फौंडेशन यांच्यामार्फत अर्ज करण्यात आला आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com