गूळ पावडर सुकवण्याचे तंत्रज्ञान

गूळनिर्मिती उद्योगामध्ये पावडरनिर्मिती हा आणखी एक उप व्यवसाय तयार झालेला आहे. गूळ पावडर तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी खर्चामध्ये उच्च दर्जाची गूळ पावडर तयार करता येते.
Efficient jaggery processing technology
Efficient jaggery processing technology

गूळनिर्मिती उद्योगामध्ये पावडरनिर्मिती हा आणखी एक उप व्यवसाय तयार झालेला आहे. गूळ पावडर तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी खर्चामध्ये उच्च दर्जाची गूळ पावडर तयार करता येते. पू्र्वीप्रमाणे गुळाचे मोठे रवे आणून फोडून ते वापरण्याची पद्धत तुलनेने कमी झाली आहे. कुटुंबांचा आकार लहान होत गेला तसतसे सामान्यतः अर्धा किलो, एक किलो अशा वापरण्यास सोप्या रव्यांचे प्रमाण वाढले आहे. अर्थात, यातही फोडून शिल्लक राहिलेल्या गुळाला पाणी सुटणे व अन्य अडचणी उद्‍भवतात. यामुळे शहरी भागामध्ये गूळ पावडर वापरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. याचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे ही गूळ पावडर चमच्याने साखरेप्रमाणे सहज वापरता येतो. म्हणजेच दैनंदिन चहा, कॉफी, दूध याबरोबरच नेहमीच्या गोड पदार्थांमध्ये (शिरा, खीर इ.) गूळ पावडरचे प्रमाण वाढत आहे. गूळ पावडर तयार करण्याचे तंत्र

  • वाफ्यामध्ये पावडर तयार करणे.
  • गुळाचे खडे किंवा रवे फोडून त्याची भुकटी करणे.
  • मुख्य समस्या  गूळ पावडरमध्ये सर्वसाधारणपणे ५ ते ८ टक्के इतकी आर्द्रता (पाण्याचे प्रमाण) असते. या पाण्यामुळे गूळ पावडर चिकट होण्याचा धोका कायम असते. ती फ्री फ्लोइंग (भुसभुशीत) होत नाही. पाण्याचे हे प्रमाण गूळ पावडरच्या टिकवण क्षमतेलाही बाधक असते. भुकटी तयार करण्याची पद्धत  पारंपरिक पद्धत बरेच गूळ उद्योग गूळ पावडर उन्हात कपड्यावर किंवा पत्र्यावर पसरवून उन्हामध्ये सुकवतात. उन्हात सुकवताना ऊर्जेचा खर्च लागत नाही. मात्र मोकळ्या वातावरणात वाऱ्यामुळे काडीकचरा (चोथरीचे बारीक कण) व पक्ष्यांचे पीस, विष्ठा इ. घटकांमुळे गूळ पावडर दूषित होण्याचा धोका असतो. पावडर पसरवणे व जमा करणे यामध्ये अधिक मनुष्यबळ लागते. त्यात माणसांचा संपर्क वाढतो. स्वच्छताचे (हायजीन) निकष पूर्ण होत नाहीत. आधुनिक तंत्रज्ञान कार्यक्षम गूळ प्रक्रिया तंत्रज्ञानामध्ये वाफ्यात गुळाच्या चाचणीला घोटून तयार झालेली पावडर सुकवण्यासाठी ड्राइंग रूमचा (सुकवण्याची खोली) वापर केला जातो. या सुकवण्याच्या खोलीमध्ये भुकटी ठेवण्यासाठी ट्रे व ट्रॉली यावर आधारित संरचना वापरली जाते.

  • एका ट्रेमध्ये साधारणपणे २ ते २.५ किलो इतकी पावडर भरता येते. एका ट्रॉली मध्ये २४ ते ४८ ट्रे ठेवण्याची क्षमता असते.
  • गूळ पावडरने भरलेल्या ट्रेवरून गरम हवेचा झोत (५० ते ६५ अंश सेल्सिअस तापमानाचे) सोडले जातात.
  • ही गरम हवा तयार करण्यासाठी कार्यक्षम गूळ प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या चिमणीतून बाहेर पडणारी टाकाऊ उष्णता (वेस्ट हीट) वापरली जाते.
  • परंपरागत गुऱ्हाळात चिमणीमधून बाहेर पडणाऱ्या धुराचे तापमान साधारणपणे ५०० ते ७०० अंश सेल्सिअस असते. रात्रीच्या वेळी पाहिल्यास चिमणीमधून बाहेर येत असलेल्या ज्वाला स्पष्टपणे दिसू शकतात. मात्र आधुनिक तंत्रज्ञानामध्ये ही वाया जाणारी उष्णता वापरल्यानंतर चिमणीतून बाहेर पडणाऱ्या धुराचे तापमान २०० ते २५० अंश सेल्सिअस इतके असते.
  • सुकवण खोलीमध्ये एका वेळी साधारणपणे ८० ते १०० किलो पावडर सुकवण्यात येते.
  • त्यासाठी साधारणपणे दीड ते अडीच तास एवढा कालावधी लागतो. सुकविण्यासाठी लागणारा कालावधी हा वातावरणाचे तापमान व आर्द्रता यावर अवलंबून असतो.
  • ड्राइंग रूम चालवण्यासाठी १ एच. पी. या क्षमतेचे सिंगल फेस इलेक्ट्रिकल कनेक्शन लागते.
  • गूळ पावडरनिर्मितीमुळे होणारे मूल्यवर्धन गोडीसाठी साखरेच्या तुलनेमध्ये गुळाला प्राधान्य देणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. आरोग्यासाठीचे महत्त्व कळाल्याने चोखंदळ ग्राहक चांगल्या गुळास पसंती व अधिक दर देण्यास तयार आहेत. किरकोळ बाजारामध्ये गुळाची किंमत ४५ पासून सुरू होते, तर गूळ पावडर ही सामान्यतः ५५ रुपयांपासून पुढे मिळत जातात. त्यातही काही ब्रॅण्ड हे सेंद्रिय गूळ पावडरची विक्री १२०-३०० रुपये प्रति किलो इतक्या किमतीने विकत असल्याचे दिसून येते. म्हणजे साध्या गुळाच्या तुलनेमध्ये किमान १५ रुपये व ब्रॅण्डिंगसह अन्य सेंद्रिय वगैरे गुणधर्म त्यात अंतर्भूत केल्यास आणखी मूल्यवर्धन शक्य होते. अर्थात, बाजारभावापेक्षा अधिक दराची अपेक्षा करत असताना त्या पदार्थाची गुणवत्ता ही कायम टिकवावी लागते. त्यातील सातत्य अत्यंत महत्त्वाचे असते. ग्राहकांच्या मनातील ब्रॅण्डवरील विश्‍वास हा केवळ आकर्षक पॅकिंगमधून येत नाही, तर तो गुणवत्तेच्या सातत्याने वाढत जातो. गूळ पावडरसारख्या मूल्यवर्धित पदार्थाची गुणवत्ता राखण्यासाठी व टिकवण क्षमता वाढवण्यासाठी ड्रायर हे वरदान ठरू शकते. - डॉ. विशाल सरदेशपांडे, ८७८८४६ ०७६६ (लेखक हे ग्रामीण हेतू औद्योगिक विकल्प केंद्र सितारा आय. आय. टी. मुंबई येथे अनुबंध सहप्राध्यापक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com