दिवस-रात्रीच्या तापमान फरकातूनही मिळवता येईल विद्युत ऊर्जा

एमआयटी येथील बिल्डिंगच्या छतावर गेल्या काही महिन्यांपासून चाचण्या सुरू आहेत. त्यात काळ्या रंगाच्या बॉक्समध्ये उपकरण (उजव्या बाजूला) असून, मागे हवामान निरीक्षण यंत्र (पांढऱ्या रंगाचे) आहे. (स्रोत ः जस्टिन रेमण्ड)
एमआयटी येथील बिल्डिंगच्या छतावर गेल्या काही महिन्यांपासून चाचण्या सुरू आहेत. त्यात काळ्या रंगाच्या बॉक्समध्ये उपकरण (उजव्या बाजूला) असून, मागे हवामान निरीक्षण यंत्र (पांढऱ्या रंगाचे) आहे. (स्रोत ः जस्टिन रेमण्ड)

कमाल आणि किमान तापमानातील बदलाद्वारे विद्युत ऊर्जा मिळवणारे उपकरण मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील संशोधकांनी विकसित केले आहे. या यउपकरणाद्वारे शेतासह विविध ठिकाणी लावण्यात येणाऱ्या लहान सेन्सरच्या ऊर्जेची गरज भागवणे शक्य होणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. हे संशोधन जर्नल नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित केले आहे.

शेतीसह विविध कामांसाठी सेन्सरचा वापर वाढत आहे. मात्र, या सेन्सरला ऊर्जा पुरवण्यासाठी आवश्यक विद्युत ऊर्जा सध्या प्रामुख्याने बॅटरीद्वारे पुरवली जाते. या बॅटरीची टिकण्याची क्षमता कमी असल्यास त्याचा परिणाम एकूण उपकरणाच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो. हे टाळण्यासाठी मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथील संशोधक विद्यार्थी अॅन्टोन कॉट्रील यांनी प्रो. कार्बोन पी. डब्ज यांच्या मार्गदर्शनाखाली नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यात उपकरणाच्या एका बाजूचे तापमान दुसऱ्या बाजूपेक्षा अधिक असते, अशा वेळी त्यातील फरकाचा फायदा घेत थर्मोइलेक्ट्रिक उपकरणाद्वारे विद्युत ऊर्जा तयार केली जाते. या तंत्रज्ञानाला थर्मल रेझोनेटर असे म्हणतात. यात दिवस- रात्रीतील तापमानामध्ये पडणाऱ्या फरकांचाही फायदा घेतला जातो. अशी आहे रचना अत्यंत अल्प तापमान ऊर्जेचे ग्रहण करण्यासाठी खास धातू मिळवण्यात आला. त्यामध्ये मेटल फोम (कॉपर किंवा निकेलपासून बनवलेले) वर ग्राफीनचा एक थर देण्यात आला आहे. फोमवर ऑक्टाडेकेन नावाचे मेण लावण्यात आले आहे. ते तापमानातील बदलानुसार घनरूप किंवा द्रवरूप होते. दिवस आणि रात्रीच्या तापमानामध्ये १० अंशांइतका बदल झाल्यास त्यातून ३५० मिलिव्होल्ट क्षमतेची आणि १.३ मिलिवॉट ऊर्जा तयार होते. इतकी ऊर्जा सेन्सरसाठी पुरेशी होते.

असे होतील फायदे

  • या उपकरणातून सलग विद्युत ऊर्जा तयार होऊ शकते.
  • सध्या अत्यंत कमी प्रमाणात तयार होत असलेल्या या ऊर्जेचा वापर सेन्सरसाठी करण्याचे नियोजन आहे. सध्या सेन्सरला ऊर्जा देण्यासाठी बॅटरींचा वापर केला जातो.
  • या उपकरणासाठी सरळ सूर्यप्रकाशाची गरज नाही. त्याचप्रमाणे थोड्या वेळासाठी आलेले ढग, वाऱ्याची स्थिती किंवा अन्य वातावरणातील घटकांचा फारसा परिणाम होत नाही.
  • अगदी सोलर पॅनेलच्या खालीही ते ठेवता येते, त्यामुळे सोलर पॅनेलमध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या उर्जेचाही वापर या  उपकरणाद्वारे करता येऊ शकतो.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com