agricultural news in marathi Thylariasis in sheep and goats | Page 2 ||| Agrowon

शेळ्या-मेंढ्यांमधील थायलेरिओसिस

डॉ. विठ्ठल धायगुडे, डॉ. जयंत सुकारे
गुरुवार, 11 नोव्हेंबर 2021

रोगग्रस्त जनावरांना गोचीड रक्त शोषण्यासाठी चावतात तेव्हा थायलेरिया या रक्तआदिजीवीच्या जीवन चक्रातील विकसित झालेले विशिष्ट टप्प्यातील जंतू अशा गोचिडांच्या शरीरात प्रवेश करतात. असे बाधित गोचीड निरोगी शेळ्या-मेंढ्यांना चावल्यामुळे मुख्यत्वेकरून या रोगाचा संसर्ग आणि प्रसार होतो.

रोगग्रस्त जनावरांना गोचीड रक्त शोषण्यासाठी चावतात तेव्हा थायलेरिया या रक्तआदिजीवीच्या जीवन चक्रातील विकसित झालेले विशिष्ट टप्प्यातील जंतू अशा गोचिडांच्या शरीरात प्रवेश करतात. असे बाधित गोचीड निरोगी शेळ्या-मेंढ्यांना चावल्यामुळे मुख्यत्वेकरून या रोगाचा संसर्ग आणि प्रसार होतो.

थायलेरिओसिस (गोचीड ताप) हा आजार संकरित गायी व म्हशींमध्ये आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पशुवैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये झालेल्या सुधारणा व पशुवैद्यकांमध्ये प्रयोगशालेय रोगनिदानाबाबत झालेल्या जागरूकतेमुळे आजारी शेळ्या- मेंढ्यांचे रक्त तपाणीकरिता प्रयोगशाळेत येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. २०१९ मध्ये सर्वांत प्रथम सातारा जिल्ह्यात मेंढ्यांमध्ये याचे निश्‍चित निदान झाले आहे. या आजाराबाबत योग्य निदान न झाल्यास आणि योग्य औषधोपचार न झाल्यास मोठ्या प्रमाणात मरतुक होते. या आजाराच्या उपचारासाठीची औषधेही महाग असल्याने त्याचा प्रतिबंधासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

कारणे 
मेंढ्यामध्ये हा रोग मुख्यत्वेकरून थायलेरिया लेस्टोकार्डी या रक्तआदिजीवीमुळे होतो. थायलेरिया उलेबर्गी आणि थायलेरिया लुवेंशुनीमुळेही हा आजार होऊ शकतो.

संसर्ग आणि प्रसार 
 रोगग्रस्त जनावरांना गोचीड रक्त शोषण्यासाठी चावतात तेव्हा थायलेरिया या रक्तआदिजीवीच्या जीवन चक्रातील विकसित झालेले विशिष्ट टप्प्यातील जंतू अशा गोचिडांच्या शरीरात प्रवेश करतात. असे बाधित गोचीड निरोगी शेळ्या-मेंढ्यांना चावल्यामुळे मुख्यत्वेकरून या रोगाचा संसर्ग आणि प्रसार होतो.

लक्षणे 
गोचीड चावल्यानंतर साधारण ९ ते १५ दिवसांनंतर आजाराची लक्षणे दिसण्यास सुरूवात होते.

 •  सडकून ताप येतो (१०४-१०६ अंश फॅरनहाइट)
 • लसीका गाठींना सूज येते.
 •  भूक मंदावणे, चारा खाणे बंद होते.
 • नाकातून पाण्यासारखा स्राव वाहतो.
 • काही दिवसांनंतर रक्तक्षय म्हणजेच ॲनेमियाची लक्षणे दिसतात, यामध्ये डोळे, तोंडाची श्‍लेष्मल त्वचा पांढरट पडते.
 • प्रतिजैवकांच्या उपचारास प्रतिसाद देत नाहीत.
 • दिवसेंदिवस मेंढ्यामध्ये दुर्बलता येते.
 • अतिशय तीव्र स्वरूपाच्या आजाराची लक्षणे सुरू झाल्यावर ३ ते ४ दिवसांत जनावर दगाऊ शकते.
 • कमी तीव्र स्वरूपाच्या आजारात जनावर वरील लक्षणांसह बरेच दिवस जीवंत राहू शकते.

निदान 

 • लक्षणांवरुन तसेच निश्‍चित निदानाकरिता पशुवैद्यकाकडून तीव्र स्वरूपाच्या आजारात लसीका गाठीची काचपट्टीवर प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी.
 • क्रोनिक (जुनाट) आजारात रक्ताची तपासणीही प्रयोगशालेय निदानाचा महत्त्वाचा भाग आहे.

प्रतिबंध आणि उपचार 

 • विविध पद्धतींचा किंवा मार्गाचा अवलंब करून गोचिडांचे समूळ उच्चाटन करणे हा प्रतिबंधात्मक उपायांचा महत्त्वाचा भाग आहे.
 • आजाराची लक्षणे दिसताच पशुवैद्यकांकडून तातडीने उपचार करावे.

- डॉ. विठ्ठल धायगुडे, ९०८२२९२३४१
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)


इतर कृषिपूरक
शेतकरी बापाचा शेतकरी पोरगा; 'आयटी'ची...वृत्तसंस्था - जम्मूतील तरुणांना रोजगार देण्यासाठी...
स्टार्टर, ग्रोवर आणि फिनिशर म्हणजे काय? कोंबडीच्या वयानुसार त्यांच्या खाद्यात बदल करावा...
सुप्तअवस्थेतील कासदाह कसा ओळखाल? दुग्धव्यवसायातील सर्वात खर्चिक आजार म्हणजे कासदाह...
जनावरांमध्ये प्रतिजैविकांचा करा योग्य...योग्य प्रमाणात आणि विशिष्ट कालावधीत...
जनावरांच्या वंध्यत्वास कारणीभूत घटक प्रत्येक पशुपालकाला आपल्या गोठ्यात जास्त दूध...
आजारी शेळ्यांची ओळख कशी करावी?शेळी पालन व्यवसायामध्ये संगोपन व व्यवस्थापनाला...
पशुपालकांना मिळणार KCC अंतर्गत पैसे किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी ही एक योजना...
पशुपालन क्षेत्रात गुंतवणुकीची गरज भारतीय कृषी-अन्न व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाच...
दुधाळ जनावरांसाठी कॅल्शियमचे महत्त्व गाय म्हैस विल्यानंतर त्यांच्या शरीरात कॅल्शियमची...
भारताच्या डेअरी निर्यातीत पुढील दशकात...भारतातील दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत पुढील...
गोपैदाशीचे धोरण अन् उद्दिष्टे...उच्च आनुवंशिकता आणि दुग्धोत्पादन क्षमता असलेली...
कोंबड्यांना द्या योग्य गुणवत्तेचे पाणीकोंबड्यांना पाणी देण्यापूर्वी शुद्धीकरण करावे....
जनावरांमधील आंत्रविषार आजारजनावरांना विशेषतः शेळ्या-मेंढ्यांना पावसाळ्यात...
जनावरे वारंवार उलटण्याची समस्यापशुपालकांनी आपल्या गोठ्यातील जनावरांची माजाची...
कृत्रिम रेतनाची योग्य वेळ महत्त्वाची जनावरांमध्ये कृत्रिम रेतन करताना गर्भधारणा यशस्वी...
मध निर्यातीला चालना देण्यावर अपेडाचा भर पुणे - युरोप आणि इतर देशांमध्ये मधाच्या...
अंडी शाकाहरी कि मांसाहारी?मुळातचं अंडी देणं ही कोंबडीची नैसर्गिक प्रक्रिया...
जनावरांमधील थायलेरीया आजारथायलेरीया हा परोपजीवीमुळे होणारा आजार असून याची...
उष्णता ताणाचे वासराच्या आरोग्यावर दीर्घ...दुधाळ जनावरांवर उष्णतेच्या ताणाचा...
शाश्‍वत मत्स्यसंवर्धनात नवीन संधीशाश्‍वत मत्स्यसंवर्धन हे अनेक प्रकारे शेतीशी...