agricultural news in marathi Timely vaccination is needed to prevent the disease | Agrowon

आजार टाळण्यासाठी वेळीच लसीकरण गरजेचे...

डॉ.बी.सी.घुमरे,डॉ.बी.एन.आंबोरे
मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021

जनावरांतील औषधोपचारापेक्षा लसीकरणाचा खर्च कमी आहे. यासाठी जनावरांतील रोगप्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. वेळेवर लसीकरण करावे. जनावरांची आरोग्य तपासणी करावी.
 

जनावरांतील औषधोपचारापेक्षा लसीकरणाचा खर्च कमी आहे. यासाठी जनावरांतील रोगप्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. वेळेवर लसीकरण करावे. जनावरांची आरोग्य तपासणी करावी.

जनावरांचे व्यवस्थापन अयोग्य झाल्यास त्यांच्या शरीरात ताण वाढून त्यांच्या रोग प्रतिकारक शक्तीत घट होते. जनावरांच्या शरीरावर ताण वाढू नये म्हणून त्यांना संतुलित आहार द्यावा. निवारा सर्व ऋतूत आरामदायक असावा. गोचीड, माश्या इत्यादी पासून मुक्तता असावी. जनावरांचे शरीर, गोठा आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती इत्यादीच्या बाबतीत सर्वांगीण स्वच्छता आवश्यक आहे.जनावरांच्या पोटात वेगवेगळे जंत होतात. जनावरांच्या शरीरावर गोचीड, गोमाशा , पिसवा यासारखे कीटक वाढतात, हे परोपजीवी असून ते जनावरांच्या शरीरातील रक्त , अन्न रस शोषण करतात. त्यामुळे जनावरांची प्रतिकारक शक्ती कमी होते. अशा जनावरांना टोचलेल्या लशींचा प्रभाव कमी होतो.

रोग प्रतिकारक शक्तीत वाढ करण्याचे उपाय 

 • संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी उपलब्ध रोगांच्या लसी जनावरांना नियमितपणे टोचून घ्याव्यात. त्यामुळे जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते.
 • एखाद्या रोगासाठीची लस जनावरांना टोचल्यानंतर पुढील २१ दिवसांच्या कालावधीत त्या रोगासाठीची प्रतिकारक शक्ती शरीरात तयार होते.ही शक्ती ठराविक कालावधीपर्यंतच टिकून राहते, म्हणून हा कालावधी संपण्यापूर्वी पुन्हा त्याच रोगासाठी लस जनावरांना टोचून घ्यावी. जेणेकरून त्या रोगासाठीची प्रतिकारक शक्ती पुन्हा तयार होऊन जनावरांचे त्या रोगापासून कायमचे संरक्षण होईल.

लसीकरणाबाबत महत्त्वाचे मुद्दे 

 • लसीकरण हे फक्त निरोगी जनावरांना करावे. आजारी जनावरांना लस टोचू नये .
 • कळपातील किंवा गोठ्यातील सर्व जनावरांना लस एकाच वेळी टोचावी.
 • कोणत्याही दोन वेगवेगळ्या लसी टोचण्यामध्ये कमीत कमी २१ दिवसांचे अंतर असावे.
 •  लसीकरण करण्यापूर्वी जनावरांना जंतनाशक दिलेले असावे.
 • लसीकरण हे सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणात करावे.
 • लसीकरण टोचण्याची सुई प्रत्येक जनावरांसाठी निर्जंतुक केलेली असावी.
 • लस टोचण्यासाठी योग्य पद्धत वापरावी. उदा. लाळ खुरकुताची
 • लस थंड अवस्थेत राहणे आवश्यक असते,त्यासाठी ती थर्मास मध्ये किंवा बर्फात ठेवून टोचावी.
 • काही जनावरांना लस टोचल्यानंतर त्या ठिकाणी सूज येणे, ताप येणे, दूध उत्पादनात घट येणे स्वाभाविक आहे, परंतु हे सर्व तात्पुरत्या स्वरूपाचे असते त्यामुळे जनावरांना कोणताही धोका नसतो.
 • जनावरांना देण्यात येणारी लस नामांकित कंपनीची असावी. लसीच्या मुदतीची तारीख आणि बॅच क्रमांक पहावा.

इतर उपाय योजना 
रोगासाठी तपासण्या
जनावरांना होणारे ठराविक रोग, जनावरांसाठी व मानवासाठी घातक आहेत. असे रोग जनावरांना झाल्यास अशी जनावरे आपल्या कळपातून काढून टाकावीत.

कासदाह 
सुप्त प्रकारामध्ये या रोगाचे कोणतेच लक्षण दिसून येत नाहीत. नंतर त्याचे रूपांतर दृश्य स्वरूपाच्या प्रकारात होते. तेव्हा कासेतून खराब दूध येते अशा वेळी औषधोपाचारावर होणारा खर्चही खूप असतो.

संपर्क-
डॉ.बी.सी.घुमरे, ९४२१९८४६८१
डॉ.बी.एन.आंबोरे, ९४२१३८५४२९

(क्रांतिसिंह नाना पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय,शिरवळ, जि.सातारा येथे कार्यरत आहेत.)


इतर कृषिपूरक
बैलामधील खांदेसूजीवर उपाययोजनाशेतीकामामध्ये बैलांकडून जास्त प्रमाणात काम करून...
लाळ्या खुरकूत आजाराचा वाढतोय प्रसारज्या जनावरांच्या पायाच्या खुरी दुभंगलेल्या आहेत,...
आजार टाळण्यासाठी वेळीच लसीकरण गरजेचे...जनावरांतील औषधोपचारापेक्षा लसीकरणाचा खर्च कमी आहे...
कार्प माशांच्या बीजांचे संगोपनमाशांचे निरंतर उत्पादन वाढविण्यासाठी योग्य...
गाईसाठी योग्य आकारमानाचा गोठागोठ्यामध्ये जनावरांसाठी साधारणपणे किती जागा असावी...
गाई,म्हशींच्या संक्रमण काळातील आहार...संक्रमण काळ हा दुभत्या जनावरांच्या आयुष्यातील...
रेबीज बद्दल जागरूक रहा रेबीज हा उष्ण रक्ताच्या प्राण्यांचा, विषाणूद्वारे...
जनावरांतील किटोसिस टाळण्यासाठी आहार...किटोसिस किंवा कितनबाधा हा आजार विशेषत: जास्त दूध...
देशी गोवंश संवर्धनासाठी ‘राष्ट्रीय...भारतीय गोवंशाची रोग प्रतिकारक शक्ती व विविध...
शेतकरी नियोजन ः रेशीमशेतीशेतकरी ः सोपान शिंदे गाव ः पांगरा शिंदे, ता.वसमत...
शेततळ्यात कार्प माशांचे व्यवस्थापनतळयातील बीजाची वाढ ही मुख्यत्वे पाण्याच्या...
शेततळ्यात कार्प प्रजातीचे संवर्धन शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करताना बाजारात मागणी...
कुक्कुटपालनातून ग्रामीण अर्थकारण...ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसायाचा विकास...
कोंबड्यांमधील लसीकरणाचे वेळापत्रकलसीकरणामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढून...
परसबागेत सुधारित कोंबडी जातीसह योग्य...परसबागेतील कोंबड्यांच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन...
कोंबडी खाद्यामध्ये सोयाबीन पेंडीला...सध्याच्या काळामध्ये कोंबडी खाद्याची किंमत वाढत...
जनावरांना द्या संतुलित आहारजनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक...
मधमाशीपालनातील मौल्यवान पदार्थ : बी...मधमाशी पालनातून मिळणाऱ्या विविध पदार्थांच्या...
शेळी प्रजननासाठी तंत्रज्ञानाचा वापरगर्भपात तसेच पुरेसे लक्ष न दिल्याने प्रसूतीच्या...
शेळीप्रजननासाठी भ्रूण प्रत्यारोपण,...सध्याच्या  शेळ्यांची उत्पादकता वेगाने...