agricultural news in marathi Tractor driven multi-crop planter | Agrowon

ट्रॅक्टरचलित बहुपीक टोकण यंत्र

डॉ. सचिन नलावडे
रविवार, 21 नोव्हेंबर 2021

टोकण यंत्राद्वारे पेरणी केल्यास रोपांची संख्या आणि अंतर योग्य राखता येते. टोकण पद्धतीने बियाणे लागवड करताना मजुरांच्या मदतीने एकसमान अंतरावर लहान छिद्रे पाडून त्यात बियाणे खोचले जाते.

टोकण यंत्राद्वारे पेरणी केल्यास रोपांची संख्या आणि अंतर योग्य राखता येते. टोकण पद्धतीने बियाणे लागवड करताना मजुरांच्या मदतीने एकसमान अंतरावर लहान छिद्रे पाडून त्यात बियाणे खोचले जाते.

शेतातून अधिक आणि शाश्‍वत उत्पादन मिळविण्यासाठी शेतीकामे योग्यवेळी करणे आवश्‍यक असते. हवामान बदल, पावसाचे असमान वितरण इत्यादी कारणांमुळे काही वेळा दुबार पेरणी करावी लागते. परिणामी, उत्पादन खर्चात वाढ होते. त्यासाठी श्रम आणि वेळेची बचत करणारी विकसित यंत्रे शेतीकामांमध्ये वापरणे सोयीचे ठरते. सुधारित यंत्राच्या वापरामुळे निविष्ठांचा योग्य प्रमाणात आणि आवश्‍यक तितकाच वापर करता येतो.

बियाणे पेरणी योग्य अंतरावर केल्यामुळे खत आणि पाणी व्यवस्थापन करणे सोयीचे होते. हेक्टरी रोपांची संख्या योग्य राखली जाते. त्यामुळे रोपांची दाटी होत नाही आणि पुरेसा सूर्यप्रकाश रोपांना मिळतो. तसेच विरळणी आणि पुनर्लागवड करण्याची गरज भासत नाही. शिवाय यंत्राद्वारे आंतरमशागत, खते देणे इत्यादी कामे जलद गतीने करता येतात.

हस्तचलित टोकण यंत्र 
शेतीमध्ये यांत्रिकीकरण येण्याआधी पेरणीसाठी बैलचलित पाभरीचा वापर केला जायचा. पाभरीच्या साह्याने पेरणी करताना दोन ओळींतील आणि रोपांतील अंतर समान राखणे शक्य होत नाही. त्यामुळे काही वेळा विरळणी आणि पुनर्लागवडीची कामे करावी लागतात.

  • टोकण यंत्राद्वारे पेरणी केल्यास रोपांची संख्या आणि अंतर योग्य राखता येते. टोकण पद्धतीने बियाणे लागवड करताना मजुरांच्या मदतीने एकसमान अंतरावर लहान छिद्रे पाडून त्यात बियाणे खोचले जाते.
  • बाजारामध्ये विविध प्रकारची हस्तचलित यंत्रे उपलब्ध आहेत. काही एक नळी, दोन नळी प्रकारची टोकण यंत्रे आहेत. तर काही यंत्रावर गोलाकार फिरत्या चाकावर बसविलेल्या पहारीच्या साह्याने खड्डे करून त्यात बिया टोकणारी यंत्रणा बसवलेली असते.
  • एक नळीच्या साह्याने बिया टोकण करणाऱ्या यंत्रामध्ये खालील बाजूस उघडझाप होणारी पहार जोडलेली असते. या पहारीची उघडझाप क्लचच्या साह्याने केली जाते. यामध्ये एकामागून एक असे बियाणांचे वितरण होते. परंतु अशा प्रकारच्या हस्तचलित टोकण यंत्राची प्रक्षेत्र क्षमता कमी असते. त्याऐवजी ट्रॅक्टरचलित टोकण यंत्राचा वापर जास्त केला जातो.

ट्रॅक्टरचलित फुले बहुपीक टोकण यंत्र 
आपल्याकडे शेतीकामांसाठी १२ ते २५ अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. या ट्रॅक्टरच्या साह्याने ऊस तसेच फळबागांमध्ये आंतरमशागतीची तसेच पेरणीची कामे केली जातात. या कामांमध्ये सुसंगता येण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ‘फुले बहुपीक टोकण यंत्र’ विकसित केले आहे.

वैशिष्ट्ये 

  • यंत्र १२ अश्‍वशक्ती आणि त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे ओढता येते.
  • मजुरी, वेळ आणि श्रमाची बचत होते.
  • ज्वारी, सोयाबीन, हरभरा, मका, भुईमूग, सूर्यफूल, गहू इत्यादी पिकांची टोकण करण्यासाठी उपयुक्त.
  • बियांसोबतच दाणेदार खतांची पेरणी करता येते.
  • पारंपरिक पद्धतीमध्ये होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत ४० ते ५० टक्के बचत होते.
  • पारंपारिक पद्धतीपेक्षा वेळेमध्ये ५० ते ६० टक्के बचत होते.

- डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९
(डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)


इतर टेक्नोवन
मध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...
विविध वाण, तंत्रवापरातून दर्जेदार...वढोदा (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील संदीप पाटील...
पेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी...मनुष्यचलित भात रोपे पुनर्लागवड यंत्र २...
पूरक शेतीद्वारेच शेतकऱ्यांच्या...शेतकऱ्यांसाठी परंपरेने चालत आलेली सरकारी धोरणाची...
छोट्या कृषी उपकरणांसाठी कर्जपुरवठ्याची...उत्पादनातील नावीन्य आणि छोट्या शेतकऱ्यांच्या...
हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग तंत्राद्वारे १२...गेल्या काही वर्षामध्ये प्लॅस्टिक हे जीवनाचे...
पेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी...मनुष्यचलित भात बी पेरणी यंत्र या...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
अवघ्या ९० सेंकदात होणार माती परिक्षण;...वृत्तसेवा - मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटी...
सांगलीत जीपनंतर जुगाड 'मिनी फोर्ड'...सांगली - देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार...
केंब्रिज विद्यापीठात शोधले गवतवर्गीय...एका वनस्पतींवर दुसऱ्या वनस्पतींचे कलम केले....
चावा घेणाऱ्या माश्यांना आकर्षित करणारे ...पशुपालनामध्ये चावा घेणाऱ्या आणि रक्त शोषणाऱ्या...
यांत्रिकीकरणातून शेती केली सुलभ,...परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथील ओंकारनाथ शिंदे...
गावातील पाईपलाईन गळतीची समस्या सुटणार;...औरंगाबाद - ग्रामीण भागातील घरांना पाणी पुरवठा...
आता स्वतःच करा माती परीक्षण !कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी)...
ट्रायकोडर्मा वितरणाची नावीन्यपूर्ण...निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी आहे. काही...
नव्या गहू जातीने पेलला क्षार, पाणथळ...पंजाबच्या नैर्ऋत्येकडील भागामध्ये जमिनी क्षारपड...
एकाच मूळ वनस्पतीचे गुणधर्म नेता येतील...कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठातील...
नव्या हरभरा जाती विकसनासाठी कृत्रिम...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट हरभऱ्याचे सर्वोत्तम...