शेतकरी उत्पादक कंपनीसाठी प्रशिक्षण

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे अंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांच्या उत्पादित कृषी मालासाठी शाश्‍वत बाजारपेठ उपलब्ध करणे, शास्त्रोक्त पद्धतीने निविष्ठा पुरवठा करणे, कृषिमालाचे मूल्यवर्धन करणे, नाशवंत शेतीमालाची प्रक्रिया करणे, त्यासाठी शेतकऱ्यांची संघटन शक्ती मजबूत करण्यात येत आहे.
Dissemination of new technology through training
Dissemination of new technology through training

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे अंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांच्या उत्पादित कृषी मालासाठी शाश्‍वत बाजारपेठ उपलब्ध करणे, शास्त्रोक्त पद्धतीने निविष्ठा पुरवठा करणे, कृषिमालाचे मूल्यवर्धन करणे, नाशवंत शेतीमालाची प्रक्रिया करणे, त्यासाठी शेतकऱ्यांची संघटन शक्ती मजबूत करण्यात येत आहे. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे अंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांच्या उत्पादित कृषी मालासाठी शाश्‍वत बाजारपेठ उपलब्ध करणे, शास्त्रोक्त पद्धतीने निविष्ठा पुरवठा करणे, कृषिमालाचे मूल्यवर्धन करणे, नाशवंत शेतीमालाची प्रक्रिया करणे, त्यासाठी शेतकऱ्यांची संघटन शक्ती मजबूत करण्यात येत आहे. तसेच “जे विकेल ते पिकेल” त्यासाठी ग्रामीण भागात क्षमता विकसित करून त्यातील संधीची ओळख करण्यासाठी राज्यातील  शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, शेतकरी, युवक यांच्यासाठी विविध नावीन्यपूर्ण विषयांचे ३ ते ५ दिवसांचे निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.  महामंडळास प्राप्त मानांकने 

  • नाबार्डमार्फत पॉपी अंतर्गत अधिकृत प्रशिक्षण यंत्रणा म्हणून महामंडळाची निवड.
  • भारत सरकारच्या कृषी कौशल्य विकास परिषद यांची महामंडळ ही मान्यता प्राप्त संस्था. 
  • नाबार्डमार्फत राज्यातील विविध पॉपी प्रकल्प अंतर्गत स्थापन शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी महामंडळाची रिसोर्स सपोर्ट एजंन्सी(RSA) म्हणून निवड. 
  • वेगवेगळी शासकीय प्रशिक्षणे घेण्यास मान्यता प्राप्त अधिकृत संस्था.
  • प्रशिक्षणाचा उद्देश 

  • सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट, यांचे व्यावसायिक व्यवस्थापन, आर्थिक बळकटीकरण व रोजगारनिर्मिती करणे.
  • शेतकरी उत्पादक कंपनी व सहकारी संस्थांना कर्ज व गुंतवणुकीच्या  स्वरूपात वित्त पुरवठ्याबाबत मार्गदर्शन करणे.
  • शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पिकविलेल्या शेतीमालाचे मूल्यवर्धन व उत्पन्नाचे स्रोत वाढविणे.
  • शेतकरी उत्पादक कंपन्यांना ऑनलाइन तसेच शाश्‍वत बाजारपेठ उपलब्ध करून देणे.
  • वेगवेगळ्या यशस्वी शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांचा अभ्यास करणे.
  • शेतकरी उत्पादक कंपन्यांना निर्यात वृद्धीबाबत मार्गदर्शन करणे. 
  • ग्रामीण युवकांमध्ये उद्यमशिलता, कौशल्य विकास करणे. 
  • शेतीमाल विक्री व खरेदी व्यवस्थापन, बाजार व पायाभूत सुविधा विकास
  • शास्त्रोक्त पद्धतीने गोदाम बांधकाम, धान्य, प्रतवारी व साठवणूक व्यवस्थापन.
  • उद्योग वाढीसाठी पॅकेजिंग, लेबलिंग, आवश्यक प्रमाणपत्रे व परवाने यांचे महत्त्व.
  • प्रशिक्षणाचे विषय  महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, बचत गट यांच्यासाठी विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

  • शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व कार्यपद्धती
  • शेतकरी उत्पादक कंपनी संचालक मंडळ प्रशिक्षण.
  • शेतकरी उत्पादक कंपनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशिक्षण.
  • बंदिस्त शेळीपालन एक यशस्वी उद्योग
  • आत्मनिर्भर भारतासाठी ॲग्री बिझनेस स्टार्ट अप.
  • मधुमक्षिका पालन एक शेतीपूरक व्यवसाय.
  • बांबू शेती - एक फायदेशीर व्यवसाय
  • गृहनिर्माण संस्थांसाठी `कॉपशॅाप`.
  • कृषी पर्यटन -ग्रामीण भागातील शेतीला सक्षम जोडव्यवसाय.
  • शेडनेट हाउस-पॉलिहाउस तंत्रज्ञान, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान व कोल्ड स्टोअरेज तंत्रज्ञान यामधील संधी.
  • प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन प्रमोटिंग इन्स्टिट्यूट. 
  • सहकारी भांडार/ कॉपशॉप व वाहतूक व्यवस्थापन प्रशिक्षण.
  • सेंद्रिय शेती-आधुनिक काळाची गरज.
  • गृहनिर्माण संस्थांमध्ये यशस्वी आंबा व्यावसायिक होण्यासाठी कार्यशाळा.
  • कालावधी   निवासी प्रशिक्षण हे ३ ते ५ दिवसांकरिता आयोजित करण्यात येते. त्यामध्ये प्रत्यक्ष भेट व त्या त्या क्षेत्रामधील काम करणाऱ्या निष्णात व्यक्तींचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येते. ज्यामुळे प्रक्रिया, विपणन व्यवस्था विकसित करून गावपातळीवर व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला रास्त दर कशाप्रकारे प्राप्त करता येईल, या दृष्टीने प्रशिक्षणार्थींना व्यावसायिक व्यवस्थापनासोबत इनपुट कंपन्या, तांत्रिक कौशल्य विकास, विपणन/प्रक्रिया कंपन्या, बाजार जोडणी याबाबत क्षमता बांधणी करण्यात येते. प्रशिक्षणात कोण सहभागी होऊ शकते 

  • शेतकरी उत्पादक कंपनी सभासद
  • शेतकरी उत्पादक कंपनी मुख्य कार्यकारी अधिकारी
  • सहकारी संस्था सभासद
  • बचत गट प्रतिनिधी / स्वंयसेवी संस्था प्रतिनिधी
  • वैयक्तिक शेतकरी
  • कृषी विभागातील अधिकारी / कर्मचारी
  • कृषी उत्पन्नावर आधारित प्रक्रिया / विपणन व्यवस्थेमध्ये कार्य करण्यास इच्छुक व्यक्ती 
  • कोणती ही समुदाय आधारित संस्था
  • कार्पोरेट सोशल रिस्पॅासिबिलिटी (CSR)निधी अंतर्गत काम करणाऱ्या संस्था
  • - हेमंत जगताप,  ८२७५३७१०८२ (प्रशिक्षण अधिकारी, एमसीडीसी, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com