agricultural news in marathi Use BBF machinery... | Agrowon

वापर बीबीएफ यंत्राचा...

वैभव सूर्यवंशी
रविवार, 23 मे 2021

बीबीएफ ही पद्धत कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरते. तसेच अधिक व सततच्या पावसामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने ही पद्धत उपयोगी ठरते.
 

बीबीएफ ही पद्धत कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरते. तसेच अधिक व सततच्या पावसामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने ही पद्धत उपयोगी ठरते.

रुंद वरंबा सरी पद्धत ही पद्धत अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याच्या तसेच जलसंधारण दृष्टीने उपयुक्त आहे. रुंद वरंबा सरी पद्धत ही विशेषतः भारी तसेच मध्यम ते भारी जमिनीमध्ये अतिशय उपयुक्त आहे. या पद्धतीमध्ये जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळी वरंब्यावर येतील यानुसार नियोजन करून वरंब्याच्या दोन्ही बाजूंना सऱ्या काढण्यात येतात. यासाठी रुंद वरंबा सरी यंत्र उपयुक्त आहे.

 •  यंत्राच्या मदतीने एकाच वेळी रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे केली जातात. यामध्ये पेरणीचे फण आणि दोन फाळ यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते. त्याच बरोबर सऱ्यांची रुंदीही कमी जास्त करता येते.
 • बीबीएफ ही पद्धत कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरते. तसेच अधिक व सततच्या पावसामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने ही पद्धत उपयोगी ठरते. या पद्धतीमुळे २५ टक्के उत्पादनात वाढ दिसून येते. सर्वसाधारणपणे २० ते २७ टक्क्यांपर्यंत जलसंधारण होते.
 • तण नियंत्रण व आंतरमशागतीच्या दृष्टीने ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्राचा वापर करता येतो. यामध्ये पेरणीचे फण काढून तेथे आंतरमशागत आणि तण नियंत्रणासाठी ‘व्ही` आकाराची पास बसविता येते. हे पास पिकाच्या दोन ओळीमध्ये बसवावे लागतात. तसेच सरीमध्ये रिजर ठेवून आंतरमशागत होते, याशिवाय स्वतंत्र आंतरमशागत यंत्र वापरता येते.
 • ट्रॅक्टरचलित आंतरमशागत यंत्राचा वापर आंतरमशागत आणि तण नियंत्रणाच्या दृष्टीने बीबीएफ पद्धतीमध्ये करता येतो, फक्त यासाठी इंग्रजी ‘व्ही` आकाराच्या पास वापराव्यात.
 • रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये पिकाच्या ओळीनुसार ‘व्ही` पासची संख्या ठेवता येते. 
 • ‘व्ही’ आकाराच्या पासमुळे त्या स्वयंचलितपणे स्वच्छ होतात. त्यामध्ये गवत अडकत नाही. कसळ पास वापरल्या तर त्यात गवत अडकते कारण त्या आडव्या असतात. त्यामुळे अवजार थांबवून पास स्वच्छ कराव्या लागतात, परंतु तसे ‘व्ही` आकाराच्या पासमध्ये होत नाही.
 • अवजारामध्ये सऱ्यांमध्ये फाळ ठेवून आंतरमशागत होते, तसेच सऱ्यामध्ये तणही प्रभावीपणे काढता येते. यामध्ये रुंद वरंब्यावर पिकाच्या किती ओळी आहेत, त्याप्रमाणे व्ही पात्यांची संख्या ठेवता येते. गरजेनुसार असे अवजार बनविता येते.

यंत्र खरेदी करताना 

 • कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याकडून यंत्राची खरेदी करावी.यंत्राचे सर्व भाग तपासून पाहावेत.
 • यंत्राचा शासनाने घेतलेले चाचणी अहवाल विक्रेत्याकडून मागवून त्याप्रमाणे सर्व भाग आहेत का ते तपासून पाहावेत.
 • विक्रेत्याकडून यंत्राच्या सर्व सुट्या भागाची यादी घेऊन यंत्राची जुळणी योग्य पद्धतीने करावी.
 • यंत्र खरेदी केल्यानंतर पेरणीपूर्वी समायोजन (कॅलिब्रेशन) करून घ्यावे. खत व बी यांची प्रति हेक्टरी मात्रा योग्य प्रमाणात पडते की नाही, याची खात्री करून घ्यावी.
 • पिकाच्या शिफारशीनुसार फण व रीजर योग्य अंतरावर बसले आहेत हे तपासावे.त्यास बियाणे व खत नळ्या व्यवस्थित जोडल्या आहेत की नाही ते पहावे.
 • यंत्रास गती देणारे भाग (पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम) चेन, स्प्रॉकेट व बिव्हेल गिअर सरळ रेषेत आहेत का ते तपासावे. हे भाग मोकळे फिरतात का ते पहावे.
 • टोकण यंत्रामध्ये पेरणी करण्यासाठी निश्चित केलेल्या बियाणे प्लेटची निवड करून त्यावरील स्प्रिंग नट घट्ट आवळावा.
 • खत नियंत्रण पट्टी आवश्यकतेनुसार योग्य ठिकाणी बसवावी, त्यात खत भरावे.

- वैभव सूर्यवंशी, ९७३०६९६५५४
(विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी), कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव)


इतर टेक्नोवन
हळद लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रात...नांदेड जिल्ह्यात हळदीकडे नगदी पीक म्हणून शेतकरी...
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्रशेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे...
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...
सलग सोयाबीनपेक्षा सुधारित पट्टापेर...सोयाबीन पिकात फुलोऱ्यानंतरच्या वाढीच्या...
भातशेतीसाठी उपयुक्त यंत्रेडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तसेच काही...
ट्रॅक्टरचलित पाच ओळींचे बीबीएफ, रासणी...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जमिनीतील ओलावादर्शक उपकरणशेतीच्या सिंचनासाठी पाण्याचे स्रोत कमी होत आहेत,...
टोमॅटो परागीभवनासाठी रोबो!बेल्जियम येथील बायोबेस्ट ग्रुप आणि इस्राईल येथील...
निसर्गाप्रमाणे प्रकाशाचे ग्रहण करणारा...निसर्गामध्ये वनस्पती आणि जिवाणूंकडून...
लहान ट्रॅक्टरचलित बियाणे, खते पेरणी...अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
एसआरटी’ तंत्रामुळे भाताची एकरी पाच...पुणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी पारंपरिक...
जनावरांच्या देखरेखीसाठी ‘स्मार्ट टॅग’पूर्वी आपल्याकडे जनावरे गायरान किंवा परिसरातील...
मल्चिंग पेपर अंथरणी केवळ पाचहजार...नाशिक जिल्ह्यातील आडगाव टप्पा (ता. चांदवड) येथील...
मधमाशी पालन व्यवसायास लागणारी उपकरणे,...मधमाशांच्या वसाहती विशिष्ठ प्रकारच्या...
पेरोव्हस्काइट सौरसेल ः सौर...अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेचे महत्त्व...
कपाशी पिकाच्या अवशेषांपासून मूल्यवर्धित...भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत मुंबई येथे...
बीबीएफ’ तंत्रामुळे खर्चात बचत अन्...ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान...
वापर बीबीएफ यंत्राचा...बीबीएफ ही पद्धत कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या...
पीक संरक्षणासह परागीकरणासाठी शेतात...किडीच्या नियंत्रणासाठी भक्षक कीटकांचा वापर केला...