agricultural news in marathi Use of calf starter in calf diet | Agrowon

वासरांच्या आहारात काफ स्टार्टरचा वापर

डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. सौ. मत्स्यगंधा पाटील
शनिवार, 26 जून 2021

पशुपालकाला गोठ्यामध्ये जातिवंत वासरांची उत्तम जोपासना करून चांगली गाय, म्हैस तयार करणे फायदेशीर ठरते. वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसरबरोबर काफ स्टार्टरचा वापर करणे जलद वाढीसाठी पोषक ठरते.
 

पशुपालकाला गोठ्यामध्ये जातिवंत वासरांची उत्तम जोपासना करून चांगली गाय, म्हैस तयार करणे फायदेशीर ठरते. वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसरबरोबर काफ स्टार्टरचा वापर करणे जलद वाढीसाठी पोषक ठरते.

काफ स्टार्टर हा लहान वासरांसाठी घन स्वरूपातील पोषणतत्त्वयुक्त खुराक आहे. काफ स्टार्टर वासरांना त्यांच्या वयाच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते चार महिने वयापर्यंत द्यावे. काफ स्टार्टरची सुरुवात १०० ग्रॅमपासून करून हळूहळू प्रमाणात वाढ करून दोन किलोपर्यंत काफ स्टार्टर वासरांना देता येते. काफ स्टार्टरचे प्रमाण वासरांच्या आहारात हळूहळू वाढवावे. सुरुवातीला वासरू हे काफ स्टार्टर  खाद्य खात नाही, हे लक्षात घेऊन वासरांची काफ स्टार्टर खाण्याची इच्छा वाढवण्यासाठी सुरुवातीला थोडे काफ स्टार्टर हातात घेऊन वासरांच्या जिभेवर चोळावे.

  • काफ स्टार्टर तयार करण्यासाठी कडधान्ये, पेंडी, प्राणिजन्य ‍प्रथिनयुक्त पदार्थ, भुसा तसेच जीवनसत्त्व आणि क्षार मिश्रण, प्रतिजैविके आणि इतर खाद्यघटकांचा वापर केला जातो.
  • काफ स्टार्टरमध्ये सर्वसाधारणपणे २३ ते २६ टक्के प्रथिने, ४ टक्के स्निग्ध पदार्थ, ७ टक्यांपर्यंत तंतुमय पदार्थ, ॲसिड इन सोल्युबल ॲशचे जास्तीत जास्त प्रमाण २.५ टक्के, आयोडीनयुक्त मीठ १ टक्का, कॅल्शिअम व फॉस्फरस प्रत्येकी कमीत कमी ०.५ टक्के, तसेच जीवनसत्त्व अ, ड३ ,ई आणि अफ्लाटॉक्सीन बायंडर यांचा समावेश असतो.
  • वासरांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांच्या आहारात प्रथिनांचा वापर आवश्यक असतो. कारण शरीरातील स्नायूंची झपाट्याने वाढ होण्यासाठी अमिनो आम्लांची गरज असते. जसजसे वासरांचे वय वाढेल तसतसे त्यांची प्रथिनांची गरज कमी होत जाते. 
  • जन्मल्यानंतर लगेच वासरामध्ये कोठीपोटाची पूर्णत: वाढ झालेली नसते. त्यामुळे त्यांच्या आहारात जास्त उपलब्धता असणाऱ्या प्रथिनांचा समावेश करणे आवश्यक असते. 
  • कोठीपोटाची वाढ झाल्यानंतर कमी प्रतीच्या प्रथिनांचे चांगल्या प्रतीच्या प्रथिनांमध्ये कोठीपोटातील उपयुक्त जिवाणू रूपांतर करतात. त्यामुळे अशावेळी उच्चप्रतीच्या प्रथिनांबरोबर काही प्रमाणात कमी प्रतीच्या प्रथिनस्रोतांचा वापर केला तर चालतो. वयाच्या तीन महिन्यांपर्यंत नर व मादी वासरांची वाढ सारख्याच गतीने होत असते. परंतु तीन महिन्यांनंतर मादी वासरांची नर वासरांच्या तुलनेत कमी गतीने वाढ होते.
  • काफ स्टार्टर बनवण्यासाठी खाद्य घटकांची निवड करताना त्या घटकांची चव, त्यातील उपलब्ध होण्याऱ्या पोषणतत्त्वांची प्रमाण या बाबी लक्षात घ्याव्यात. वासरांना शक्यतो मासळी, रक्ताची भुकटी, बिअर फॅक्टरीतील दुय्यम पदार्थ आवडत नाहीत. 
  • काफ स्टार्टर हे शक्यतो गोळी/ कांडी पेंडेच्या स्वरूपात असते. या गोळी/ कांडी पेंडेच्या बाह्य स्वरूपाचा खाण्याच्या प्रमाणावर म्हणावा तितका परिणाम होत नाही. 
  • काफ स्टार्टरमध्ये मळीचा वापर ३ ते ५ टक्यांपर्यंत करता येतो. गोळीयुक्त काफ स्टार्टरमुळे वासरांच्या कोठीपोटातील द्रावणाचा सामू कमी होऊ शकतो. त्यामुळे कधी कधी आम्लधर्मीय अपचन झाल्याचे दिसून येते. हे टाळण्यासाठी काफ स्टार्टर व चारापिकांचा वासरांच्या आहारात वापर करावा.
  • एकदा वासरू काफ स्टार्टर चांगल्याप्रकारे खाऊ लागले की, दररोज २ किलोपर्यंत स्टार्टर खाईपर्यंत काफ स्टार्टर खाऊ घालण्यावर निर्बंध लावू नयेत. एकदा वासरू १ ते १.५ किलो काफ स्टार्टर खाऊ लागले की त्यांना आईपासून  वेगळे करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करावी. हळूहळू त्यांना आईपासून वेगळे करावे.

- डॉ. प्रफुल्लकुमार पाटील,  ८३२९७३५३१४, 
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर जि. लातूर)


इतर कृषिपूरक
शेळ्यांना द्या सुबाभुळचा चारा शेळ्यांच्या आहारात ४०% सुबाभळीचा वापर करावा....
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
खायला कोणती अंडी चांगली?तुम्ही अंडी खाल्लीत का ? कोणती खायची? गावरान अंडी...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
हिरव्या चाऱ्यासाठी नेपिअर लागवड तंत्रसंकरित नेपिअर या चारा पिकाच्या फुले जयवंत, यशवंत...
जातिवंत कालवड पैदाशीसाठी आधुनिक प्रजनन...आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरज असेल तेव्हाच पूर्ण...
शेळ्या-मेंढ्यातील अतिसंसर्गजन्य पीपीआर...पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स....
बहुवार्षिक नेपियर गवत पशुपालन व्यवसायात ६० ते ७० % खर्च हा आहार...
गाय निगेटीव्ह एनर्जीमध्ये का जाते?आपल्या गोठ्यातील जनावरांचे संगोपन करत असताना...
संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार...शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात...
गायी-म्हशीमध्ये गर्भपाताची समस्यासंसर्गिक गर्भपात हा एक जीवाणूजन्य रोग असून त्याचा...
खुडूक कोंबडी कशी ओळखावी?अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्या वर्षभरात साधारणतः...
शेतकरी बापाचा शेतकरी पोरगा; 'आयटी'ची...वृत्तसंस्था - जम्मूतील तरुणांना रोजगार देण्यासाठी...
स्टार्टर, ग्रोवर आणि फिनिशर म्हणजे काय? कोंबडीच्या वयानुसार त्यांच्या खाद्यात बदल करावा...
सुप्तअवस्थेतील कासदाह कसा ओळखाल? दुग्धव्यवसायातील सर्वात खर्चिक आजार म्हणजे कासदाह...
जनावरांमध्ये प्रतिजैविकांचा करा योग्य...योग्य प्रमाणात आणि विशिष्ट कालावधीत...
जनावरांच्या वंध्यत्वास कारणीभूत घटक प्रत्येक पशुपालकाला आपल्या गोठ्यात जास्त दूध...
आजारी शेळ्यांची ओळख कशी करावी?शेळी पालन व्यवसायामध्ये संगोपन व व्यवस्थापनाला...