agricultural news in marathi use of Mechanization in pomegranate and vegetable crops | Page 2 ||| Agrowon

डाळिंब, भाजीपाला पिकात केले यांत्रिकीकरण

अभिजित डाके
गुरुवार, 8 जुलै 2021

आटपाडी (जि.. सांगली) येथील किशोरकुमार देशमुख यांनी डाळिंब व भाजीपाला पिकांसाठी यांत्रिकीकरण केले आहे. मल्चिंग पेपर, रोटर, बेड मेकर आदी यंत्रांचा वापर करून त्यांनी वेळ, मजुरीखर्च, श्रम यात बचत केली आहे.  

आटपाडी (जि.. सांगली) येथील किशोरकुमार देशमुख यांनी डाळिंब व भाजीपाला पिकांसाठी यांत्रिकीकरण केले आहे. मल्चिंग पेपर, रोटर, बेड मेकर आदी यंत्रांचा वापर करून त्यांनी वेळ, मजुरीखर्च, श्रम यात बचत केली आहे. शिवाय भाडेतत्वावर यंत्रे देऊन उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोतही तयार केला आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी हा तसा दुष्काळी पट्टा आहे. हवामान व पाण्याची मर्यादा लक्षात घेऊन येथील अनेक शेतकऱ्यांनी आपली शेती चांगल्या पद्धतीने विकसित केली आहे. किशोरकुमार देशमुख हे या पैकीच एक शेतकरी आहेत. त्यांची ३४ एकर शेती आहे. सन २०१० पासून डाळिंबाची बाग फुलवली आहे. चौदा फूट बाय नऊ फूट अंतरावर लागवड आहे. मृग बहार निवडण्यावर त्यांचा भर असतो. लहानवयात असल्यापासूनच किशोरकुमार शेतीत रमले. नवे प्रयोग करण्यावर त्यांचा भर असतो. सेंद्रिय पद्धतीने बाजरीचे उत्पादन आणि डाळिंबाचे उत्पादन घेण्यात ते अग्रेसर आहेतच. वडील विजयकुमार, आई सौ. विजयालक्ष्मी, पत्नी रचना, मुलगा लोकेंद्रसिंह आणि मुलगी हिरकणी असा त्यांचा परिवार आहे. घरी पेरणी यंत्र, ट्रॅक्टर, नांगर आणि गरजेपुरती अवजारे आहेत. पूर्वी पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र टेंभू योजनेचे पाणी आल्यानंतर शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला. साहजिकच तालुक्यात ऊस पीक देखील वाढू लागले आहे.

नोकरीचा अनुभव
सोलापूर जिल्ह्यातील आचेगाव येथे सीताशेती प्रकल्पात किशोरकुमार प्रमुख म्हणून काम करायचे. . त्यावेळी ऊस व अन्य पिकांचे अनुभव मिळाले. जमिनीची गुणवत्ता, पोत सुधारणे, उत्पादन वाढ आदींचा अभ्यास झाला. विविध यंत्रे पाहण्यात आली. नोकरी सोडल्यानंतर किशोरकुमार गावी येऊन पूर्णवेळ शेती करू लागले. मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करू लागले. घरच्या डाळिंब शेतीत मजुरांची टंचाई जाणवत होती. त्यामुळे कामे वेळेवर होत नव्हती. खर्च दिवसेंदिवस वाढत होता. यावर उपाय शोधण्यासाठी किशोरकुमार यांनी कृषी प्रदर्शनांना भेटी दिल्या. त्यात काही यंत्रे पाहण्यास मिळाली. ती विकत घेण्यासाठी काही लाख रुपये खर्च केले. गेल्यावर्षीपासून कोरोना व ‘लॉकडाऊन’ चे संकट सुरू झाले. कोरोनाच्या भीतीमुळे शेतात काम करण्यासाठी मजूर येण्यास धजावत नव्हते. साहजिकच शेतीत यांत्रिकीकरणावर मुख्य भर दिला.

असे केले यांत्रिकीकरण
मल्चिंग पेपरचा वापर
किशोरकुमार सांगतात की डाळिंबाची एक एकर बाग नवी आहे. मागील वर्षी या बागेत पॉली मल्चिंगचा वापर केला. दीड फुटाचा बेड तयार करून रोपे लावली. त्यामुळे झाडाजवळ तण उगवण्यास प्रतिबंध झाला. पांढरी मुळी विकसित करता आली. पाणी कमी लागले. मर झाली नाही. रोपांची वाढ एकसमान झाली. यंत्राद्वारे एका एकरात चार तासांत बेडवर मल्चिंग पेपर अंथरला जातो. यंत्राची किंमत
साडे ३१ हजार रुपये आहे. ढोबळी मिरचीसाठी एक एकरांत १२०० मीटरचे सात बंडल लागतात.

चार तासात दोन मजूर पुरेसे होतात. त्यांची मजुरी ८०० रुपये व १५०० रुपये ट्रॅक्टर इंधन, चालक व देखभाल असे पकडले तरी एकरी २५०० रुपये खर्च येतो. हेच काम मनुष्यबळाकरवी करण्यासाठी एकरी साडेपाच हजार रुपये खर्च येतो. दोन दिवस लागतात. यंत्रामुळे खर्चात ५० टक्के बचत होते.

रिव्हर्स फॉरवर्ड रोटर
याची ७० हजार रुपये किंमत आहे. जुन्या दोन वर्षांपासून पुढील बागेत ‘बेड’ तयार करण्यासाठी त्याचा वापर करता येतो. त्याची कार्यक्षमता एकरी दोन तास अशी आहे. या यंत्राच्या वापरातून मजूरबळात ५० ते ६० टक्के बचत करता येते. हेच काम मनुष्यबळाकरवी करायचे तर खुरपणी, पकड चालवणे, ढीग सपाट करणे अशी कामे करावी लागतात. त्यासाठी सर्व मिळून सहा हजार रुपये किमान खर्च येतो. यंत्राद्वारे दोनहजार रूपयांत काम होते.

‘बेड’ तयार करणारे यंत्र- सुमारे३८ हजार रुपयांना ते खरेदी केले आहे. ढोबळी मिरची, टोमॅटो, कलिंगड व नव्या बागेत त्याचा वापर करता येतो. ढोबळी मिरचीच्या ११ हजार रोपांची लागवड करून एक महिना झाला आहे. त्यात मल्चिंग पेपर व बेडमेकरचा वापर केला आहे.

चार फुटांपासून हव्या तेवढ्या फुटांपर्यंत बेड तयार होतो. बेडची उंची दीड फूट तर रुंदी १४ इंच ते दोन फुटांपर्यंत ठेवता येते. वापरामुळे एकरी चारहजार रुपयांपर्यंत बचत करता येते.

वन साइड रोटर (डाळिंब बाग कुदळण्यासाठी)
या यंत्राची किंमत सुमारे एक लाख ९६ हजार रुपये आहे. डाळिंब व्यतिरिक्त आंबा, पेरू, सीताफळ या बागांसाठी देखील उपयोग होतो. बागेतील तण, गवत मातीआड करण्यासाठी उपयोग होतो. सहा महिन्यातून तीन वेळा रोटर बेडवर फिरवल्याने माती भुसभुशीत राहते. यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होते. शेणखत, रासायनिक खत मातीआड करता येते. एकरी ७० हजार रुपयांपर्यंत
बचत होऊ शकते.

उत्पन्नाचे साधन वाढले
शेतीत यांत्रिकीकरण सुरू केल्याचा फायदा स्वतःला झालाच. शिवाय अनेक डाळिंब उत्पादकांनाही यंत्राचा वापर करणे शक्य झाले. त्यातून उत्पन्नाचे अतिरिक्त साधन व रोजगार तयार झाला आहे असे किशोरकुमार यांनी सांगितले.

प्रतिक्रिया
मजुरांकडून कामे करून घेण्यासाठी सातत्याने अधिक खर्च करावा लागतो. परंतु यंत्रांची खरेदी केली ती पुढे दीर्घकाळासाठी गुंतवणूक असते. शेतीतील खर्चात त्यातून बचत साध्य होते. म्हणजेच उत्पन्नात झालेली ती वाढ गृहित धरायला हरकत नाही.
- किशोरकुमार विजयकुमार देशमुख- ९४०३५१९०३०


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
केळी निर्यातीत ‘सुरचिता’चे पदार्पण करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुरचिता ॲ...
फळबागांसाठी प्रसिद्ध झाले सोनोरीपुणे जिल्ह्यात सासवड शहरापासून काही किलोमीटरवर...
पेठमधील मोगऱ्याचा नाशिकमध्ये दरवळनाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात आदिवासी...
सणासुदीच्या आशेवर कोल्हापूरचा फुलबाजार...गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत कमी दरांवर...
यांत्रिकी पूरक उद्योग ठरताहेत...औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील आठवडी...
दर्जेदार रेशीम कोष उत्पादनात पाटील...जळगाव जिल्ह्यात देवपिंप्री येथील विकास पाटील...
उपक्रमशीलतेतून महिला झाल्या सक्षमटिमटाळा (जि.अमरावती) येथील सरस्वती स्वयंसाह्यता...
सुरू उसाचे एकरी १२२ टन उत्पादनअभ्यासपूर्ण, शास्त्रीय व्यवस्थापन व तंत्रज्ञान या...
बटाटा चिप्सचा ‘नेचर टॉप’ ब्रॅण्डपुणे जिल्ह्यातील साबळेवाडी येथील आदेश सुदाम काटकर...
आधुनिक तंत्र शेतीच्या लाटेवर मंगरूळपरभणी जिल्ह्यातील मंगरूळ बुद्रूक गेल्या चार...
बारमाही भाजीपाला उत्पादन : ‘गेडेकर...सुसूत्रता, पीक विविधता, तंत्रज्ञानाचा प्रभावी...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून जोपासलेली नारळ...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता. वेंगुर्ला)...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
पंचवीस वर्षांपासून सीताफळाची जोपासनासांगली जिल्ह्यात अंजनी (ता.. तासगाव) येथील...
उस्मानाबादी शेळ्यांचा यशस्वी जोपासलेला...परभणी शहरापासून नजीक पारवा शिवारात सतीश रन्हेर व...
जल प्रदूषण मुक्तीसाठी ‘गोदावरी नदी संसद...नांदेड जिल्ह्यात ‘गोदावरी नदी संसद’ ही जलसंवर्धन...
भाजीपाला, पूरक उद्योगातून गटांची प्रगतीरत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गटातील सदस्यांनी...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
खोडवा उसाची अधिक उत्पादनक्षम शेती.महाराष्ट्र- कर्नाटक राज्याच्या सीमेवरील सिदनाळ (...
कृषीसह पिंपळगावाने केले वसुंधरेलाही...नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत गावाचा कृषी...