कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
कृषिपूरक
संधिवातावर निर्गुडी, निलगिरी उपयुक्त
पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी वनस्पतीद्वारे बाह्य उपचार करता येतात. यामुळे उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा बराच खर्च वाचू शकतो. शिवाय या वनस्पतींच्या औषधांचा अत्यंत चांगला गुण देखील येतो.
पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी वनस्पतीद्वारे बाह्य उपचार करता येतात. यामुळे उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा बराच खर्च वाचू शकतो. शिवाय या वनस्पतींच्या औषधांचा अत्यंत चांगला गुण देखील येतो.
जनावरांमध्ये सांधेदुखी हा आजार मोठ्या प्रमाणात आढळतो. सांध्यामध्ये मार लागणे हे सर्वत्र आढळते, परंतु यात जर जखम झाली किंवा सांध्यास जिवाणूंचा संसर्ग झाला तर तो सुजतो. यामुळे जनावर लंगडते, सांध्यामध्ये वेदना होतात. जीवाणूंच्या संसर्गामुळे जनावरास ताप येतो, आजाराची तीव्रता वाढते, सांध्यामध्ये पू होतो. या आजारावर उपचार करत असताना पशुवैद्यकाद्वारे योग्य ते निदान करून प्रतिजैविकांच्या सोबतच वेदनाशामक, सूज विरोधी औषधांचा वापर करावा.
पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी वनस्पतीद्वारे बाह्य उपचार करता येतात. यामुळे उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा बराच खर्च वाचू शकतो. शिवाय या वनस्पतींच्या औषधांचा अत्यंत चांगला गुण देखील येतो.
उपयुक्त औषधी वनस्पती
निर्गुडी
- निर्गुडीचे पान सूज विरोधी आहे. मानवाच्या आजारात गुडघेदुखी किंवा सांधेदुखी यामध्ये निर्गुडी पाला वापरून त्याचा लेप बाधित भागावर लावतात. यामुळे येथील सूज व वेदना कमी होतात.
- या आजारात बाधित भागावर लावण्यासाठी निर्गुडीच्या पानांचा वापर करावा.
निलगिरी
- वनस्पतीची पाने व तेल यांचा वापर औषधीमध्ये करतात.
- पानाचा लेप बाधित भागावर लावावा किंवा निलगिरी तेलाने बाधित भागावर मसाज करावा.
कापूर
आपल्या रोजच्या वापरात असलेला कापूर हा वनस्पतिजन्य असतो. कापराचा वापर बाधित भागावर लावण्यासाठी करावा.
रोहिष तेल
- हे एक वनस्पतिजन्य तेल असून संधिवात, मुका मार यावर अत्यंत गुणकारी आहे.
- निलगिरी तेलाप्रमाणे याचा देखील वापर करावा. परंतु रोहिष तेल कमी मात्रेत वापरावे.
- रोहिष तेल हे तीळ तेल किंवा नारळ तेलात मिसळून बाधित भागावर लावावे. त्वचेवर याचा त्रास होऊ शकतो.
लसूण
याचा वापर बाह्य उपचारासाठी करावा. लसूण बारीक करून त्याचा लेप बाधित भागावर लावावा.
आले
लसणाप्रमाणेच आल्याचा वापर करावा.
सूजेवर गोखरू, पुनर्नवा उपयुक्त
शरीराच्या एखाद्या भागात पाणी साचून त्या भागावर सूज येणे यालाच शोथ किंवा इडीमा असे म्हणतात. जनावरांमध्ये पोटाच्या भागावर, मानेच्या खाली अशा प्रकारची सूज बऱ्याच वेळी दिसते. शरीरात रक्त वाहत असताना खनिजे, अन्नद्रव्य व जलद्रव्याची रक्तवाहिन्या व पेशी मध्ये देवाण-घेवाण चालू असते. या कार्यात बिघाड झाल्यास रक्तातील जलद्रव्य पेशींमध्ये साठवून राहतात.
- हृदयाचे आजार, गर्भ काळ, सूज, कर्करोग, ॲलर्जी, जिवाणू , विषाणू व परोपजीवी जंतू यांच्या संसर्गामुळे हा आजार संभवतो.
- आजारामध्ये सूज आलेल्या भागावर हात लावल्यास आतमध्ये पाणी असल्याचे जाणवते, परंतु त्या भागात वेदना होत नाही.
- आजारावर उपचार करत असताना पशुवैद्यकाद्वारे याचे नेमके निदान व उपचार करून घ्यावेत.
आजारावर उपयुक्त औषधी वनस्पती
गोखरू
- सराटे नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळते. या वनस्पतीचे फळ म्हणजे सराटे औषधीमध्ये वापरतात.
- याचा वापर करत असताना हे सराटे व्यवस्थित बारीक करून घ्यावेत. कारण अन्न नलिकेमध्ये हे पोटामध्ये हे काटे इजा करू शकतात.
- ही वनस्पती मूत्रल म्हणून कार्य करते. म्हणजेच या वनस्पतीमुळे शरीरामध्ये साचलेले पाणी बाहेर पडते.
पुनर्नवा
- वनस्पतीला घेटूली या नावाने ओळखतात. संपूर्ण वनस्पती औषधी मध्ये वापरतात.
- विशेषतः मूळ आणि बी यात औषधी गुणधर्म जास्त आहेत.
कुश
ही वनस्पती मुख्यतः मूत्रल आहे. वनस्पतीचे मूळ औषधीमध्ये वापरतात.
- डॉ. सुधीर राजूरकर, ९४२२१७५७९३
(प्राध्यापक, पशू औषधी व विषशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी)
- 1 of 36
- ››