agricultural news in marathi Use of micronutrients for sugarcane | Agrowon

उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

ज्योती खराडे, डॉ. सौ. प्रीती देशमुख, समाधान सुरवसे
गुरुवार, 28 जानेवारी 2021

सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांची उसाच्या पानांवर फवारणी केल्यास अधिक प्रभावी परिणाम दिसून येतात. बोरॉन हा कॅल्शिअम विद्राव्य स्थितीत राहण्यास आणि स्थलांतर होण्यात मदत करतो. 

सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांची उसाच्या पानांवर फवारणी केल्यास अधिक प्रभावी परिणाम दिसून येतात. बोरॉन हा कॅल्शिअम विद्राव्य स्थितीत राहण्यास आणि स्थलांतर होण्यात मदत करतो. मॉलिब्डेनममुळे पिकात लोहाची उपयुक्तता वाढते.

बोरॉन 
कार्य 

 • वनस्पतीमध्ये पेशींच्या वाढीसाठी आणि पेशी विभाजनासाठी या अन्नद्रव्याचा महत्त्वाचा सहभाग असतो. तसेच आवश्यकतेनुसार साखरेच्या अंतर्गत प्रसारणास व हालचालीस मदत करतो.
 • बोरॉन हा कॅल्शिअम विद्राव्य स्थितीत राहण्यास आणि स्थलांतर होण्यात मदत करतो.
 • या अन्नद्रव्यामुळे वनस्पतीमध्ये पाण्याचे नियंत्रण होते. संप्रेरक म्हणून रासायनिक प्रक्रियेत सहभाग असतो.

लक्षणे 

 • या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे उसाचे जास्त नुकसान होते. उसाची वाढ खुंटते, उत्पादन कमी मिळते.
 • उसाचा शेंडा पिवळा पडतो. नंतर तो तांबूस काळा पडून वाळून जातो.
 • शेंड्याकडील कोवळ्या पानांवर पाण्याचे पारदर्शक लहान ठिपके दिसतात. पुढे हे ठिपके मोठे होऊन पानांपासून तुटल्यासारखे वाटतात.
 • कोवळी पाने छोटी, अरुंद व पिवळी दिसतात. मुळे खराब होतात. रसाची प्रत खराब होते.

उपाययोजना 

 • प्रयोगातील काही निष्कर्षानुसार भारी काळ्या जमिनीत बोरॉन या अन्नद्रव्यास ऊस पिकाकडून चांगला प्रतिसाद मिळतो.
 • जमिनीत बोरॉनची कमतरता असेल तरच एकरी दोन किलो या प्रमाणात एक वर्षाआड बोरीक अ‍ॅसिड किंवा बोरॅक्स जमिनीतून वापरावे.
 • आवश्‍यकता नसताना सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केल्यास नुकसानकारक ठरते.

मॉलिब्डेनम 
कार्य 

 • नत्राच्या शोषण प्रक्रियेत या सूक्ष्म अन्नद्रव्याचा महत्त्वाचा सहभाग असतो.
 • द्विदलवर्गीय पिकांच्या मुळांच्या गाठींमध्ये सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता वाढवून हवेतील नत्राचे स्थिरीकरण करण्याच्या प्रक्रियेत सहभाग असतो.
 • नायट्रेटच्या विभाजनामध्ये महत्त्वाचे भूमिका बजावते.
 • मॉलिब्डेनममुळे पिकात लोहाची उपयुक्तता वाढते. इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या विषारी परिणामावर नियंत्रण होते.

कमतरतेची लक्षणे 

 • आम्लयुक्त जमिनीत मॉलिब्डेनम या अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते.
 • पानांचा रंग हिरवट पिवळा दिसतो. पानाच्या दोन शिरांमध्ये फिकट हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात.
 • पानांच्या कडा गुंडाळतात, पाने मलूल होऊन वाळतात.

उपाययोजना 

 • जमिनीत मॉलिब्डेनमचे प्रमाण कमी असेल तर किंवा ४ ते ५ वर्षांतून एकदा १ किलो अमोनिअम मॉलिब्डेनमचा वापर करावा.
 • ऊस पिकाच्या निरीक्षणावरून त्यातील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे ठामपणे ओळखणे कठीण असते. कारण काही सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणांतील काही बाबी समान असतात. त्यामुळे कमतरतेचा अंदाज लावण्यात अडचणी येतात. त्यासाठी माती परीक्षण आणि पानांतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासून योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त घनरूप विद्राव्य खत 

 • ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी व्हीएसआय मायक्रोसोल हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त घनरूप खत फायदेशीर आहे.
 • व्हीएसआय मायक्रोसोलमध्ये लोह (२%), मँगेनीज (१%), जस्त (५%), तांबे (०.५%) आणि बोरॉन (१%) ही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत.
 • व्हीएसआय मायक्रोसोलच्या वापरामुळे प्रकाश संश्‍लेषण क्रियेचा वेग वाढतो. त्यामुळे हरितद्रव्य निर्मिती, प्रथिने व संप्रेरके निर्मितीत वाढ होते. पेशींची वाढ होऊन पेशी विभाजनात याचा सक्रिय सहभाग दिसून येतो. परिणामी, ऊस उत्पादन आणि साखर उताऱ्यात वाढ होते.
 • सदर खत पाण्यात पूर्णपणे विरघळणारे आणि सेंद्रिय आम्लयुक्त असल्यामुळे ठिबक सिंचनाद्वारे तसेच जमिनीतून देण्यास उपयुक्त आहे.
 • महाराष्ट्रातील जमिनीतील अन्नद्रव्यांचे महत्त्व आणि पिकाची गरज लक्षात घेऊन पिकांना त्वरित उपलब्ध होईल. आणि विशेषत: ठिबक सिंचनाद्वारे देता येईल या हेतूने उत्पादित करण्यात आले आहे.
 • एकरी १० किलो व्हीएसआय मायक्रोसोलची मात्रा द्यावी. सदर विद्राव्य खत दोन पद्धतीने देता येते. हे खत सेंद्रिय आम्लयुक्त असून, पाण्यात पूर्णपणे विरघळणारे असल्यामुळे ठिबक सिंचनाद्वारे आणि जमिनीत देण्यास उपयुक्त आहे.
 • ठिबक संचाद्वारे प्रत्येकवेळी एकरी २.५ किलो १०० लिटर पाण्यात विरघळून लागणीच्या वेळी, लागणीनंतर ६० दिवसांनी, १२० दिवसांनी आणि १८० दिवसांनी द्यावे.
 • ठिबक संच उपलब्ध नसल्यास, शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून लागणीच्या वेळी एकरी ५ किलो आणि ऊस बांधणीचे वेळी ५ किलो या प्रमाणात जमिनीत चळी घेऊन द्यावे.

फवारणीसाठी उपयुक्त सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त द्रवरूप खते 

 • माती परीक्षणानुसार कमतरता असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते शेणखतामध्ये चांगली मिसळून मुरवावीत. त्यानंतर त्याचा शिफारशीप्रमाणे वापर करावा.
 • आवश्‍यकता नसताना सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जमिनीतून वापर करणे टाळावे.
 • सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांची उसाच्या पानांवर फवारणी केल्यास अधिक प्रभावी परिणाम दिसून येतात.
 • फवारणीद्वारे या खतांचा वापर केल्यामुळे जमिनीवर कोणताही वाईट परिणाम होत नाही.
 • उसाच्या पानांवर मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केल्यामुळे खताची पिकाला उपयुक्तता वाढते. पानातील आवश्‍यक अन्नद्रव्‍यांचे प्रमाण योग्य राखून कमतरता असल्यास भरून निघते.
 • सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते. हरितद्रव्याच्या निर्मितीत वाढ होते. परिणामी मुळांद्वारे आवश्यक अन्नद्रव्यांचे शोषण सुद्धा वाढते. ऊस उत्पादनावर चांगला परिणाम होतो.यासाठी मल्टिमायक्रोन्युट्रियंट आणि मल्टिमॅक्रोन्युट्रियंट या द्रवरूप खताच्या उसाच्या पानावर २ फवारण्या कराव्यात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमधे झालेल्या संशोधनानुसार मुख्य आणि सूक्ष्मअन्नद्रव्येयुक्त द्रवरूप खताच्या २ फवारण्या केल्यास ऊस उत्पादनात हेक्टरी ८ ते १० टक्क्यांनी वाढ दिसून आली.
 • लागणीनंतर किंवा खोडवा राखल्यानंतर ६० दिवसांनी द्रवरूप खतांची फवारणी करावी. मल्टिमॅक्रोन्युट्रियंट अधिक मल्टिमायक्रोन्युट्रियंट द्रवरूप खताची प्रति २०० लिटर पाण्यात प्रत्येकी २ लिटर मात्रा मिसळून पहिली फवारणी करावी.
 • दुसरी फवारणी लागणीनंतर किंवा खोडवा राखल्यानंतर ९० दिवसांनी, मल्टिमॅक्रोन्युट्रियंट अधिक मल्टिमायक्रोन्युट्रियंट द्रवरूप खते प्रत्येकी ३ लिटर मात्रा प्रति ३०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 • फवारणी करताना उसाची पाने दोन्ही बाजूंनी चांगली भिजतील याची काळजी घ्यावी.
 • फवारणी शक्यतो वारा कमी असताना संध्याकाळच्या वेळी करावी.
 • द्रवरूप खतामध्ये कोणतीही इतर रसायने मिसळू नयेत.
 • विशेषतः क्षारयुक्त किंवा चोपण जमिनीत आणि चुनखडीयुक्त जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि शोषण कमी होते. अशा वेळी मल्टिन्युट्रियंट द्रवरूप खताची फवारणी अधिक फायदेशीर ठरते.

संपर्क : ०२०-२६९०२२७८
(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, जि. पुणे)


इतर नगदी पिके
उन्हाळी कांदा पिकाची काढणी, साठवणूक कांदा पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची निवड...
उन्हाळ्यात राबवा प्रभावी सिंचन...पाणी हा ऊस उत्पादनातील अतिशय महत्त्वाचा व...
खोडवा ऊस व्यवस्थापनाचे सुधारित तंत्रराज्यामध्ये तिन्ही हंगामांतील ऊस  तुटून...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरसूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांची उसाच्या पानांवर...
दर्जेदार कांदा बीजोत्पादनासाठी...उत्तम कांदा बीजोत्पादनासाठी कंदाच्या योग्य...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरऊस पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी...
व्यवस्थापन ऊस पाचटाचे ...पाचट आच्छादनामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो. तसेच...
सुरू उसातील सूक्ष्मअन्नद्रव्य व्यवस्थापनमाती परीक्षण अहवालानुसार जमिनीत या सूक्ष्म...
नियोजन सुरू ऊस लागवडीचे...सुरू हंगामातील ऊस लागवड १५ डिसेंबर ते १५...
ऊस पिकावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापनपश्‍चिम महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यापासून ते...
आरआरसी’ म्हणजे काय रे भाऊ...?राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर...
गुलाबी बोंडअळी एकात्मिक व्यवस्थापनाकडे...सध्या अनेक ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये असलेल्या...
सूक्ष्म सिंचन पद्धतीवर कांदा लागवडकांदा सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर...
कांदा बीजोत्पादनाच्या शास्त्रीय पद्धती बिजोत्पादन करताना जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि...
वेचणीयोग्य कपाशीला येत्या पावसाची चिंतामाझे कापसाचे पीक जवळपास ११५ ते १२० दिवसांचे झाले...
दर्जेदार कांदा रोपनिर्मितीचे तंत्रमहाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोरायनेस्पोरा बुरशीजन्य पानांवरील ठिपके...कपाशीचे पीक हे सध्या ६० ते ७५ दिवसांचे आहे....
कपाशीवरील रस शोषक किडींचे एकात्मिक...सध्या ढगाळ वातावरण कायम असून, कपाशीवर रस शोषक...
कपाशीतील बोंडे सडण्यावरील उपाययोजनामहाराष्ट्राच्या प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यात...