जनावरांच्या आहारात असावीत खनिज द्रव्ये

पचनसंस्था, प्रजनन संस्था किंवा शरीराच्या प्रत्येक संस्थेच्या कामासाठी खनिज द्रव्यांची आवश्यकता असते. शरीराच्या गरजेनुसार ही योग्य खनिज मिश्रणांचा पुरवठा करणे आवश्यक आहे.
Milch animals should be fed with mineral mixture daily.
Milch animals should be fed with mineral mixture daily.

पचनसंस्था, प्रजनन संस्था किंवा शरीराच्या प्रत्येक संस्थेच्या कामासाठी खनिज द्रव्यांची आवश्यकता असते. शरीराच्या गरजेनुसार ही योग्य खनिज मिश्रणांचा पुरवठा करणे आवश्यक आहे.  पशू संगोपनात खनिज द्रव्ये आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. जनावरांना  चाऱ्यातून खनिज द्रव्य मिळते. परंतु चाऱ्यामध्ये हे द्रव्य जमिनीतून येते. पर्यायाने जमिनीतील खनिज द्रव्यांच्या उपलब्धतेवर चाऱ्यातील द्रव्यांचे प्रमाण अवलंबून असते. याचप्रमाणे खनिज द्रव्यांचे जमिनीतील प्रमाण वेगवेगळे असते. म्हणजेच जनावरांसाठी आवश्यक असणारे खनिज द्रव्य योग्य मात्रेत देण्याची आवश्यकता आहे. पचनसंस्था, प्रजनन संस्था किंवा शरीराच्या प्रत्येक संस्थेच्या कामासाठी खनिज द्रव्यांची आवश्यकता असते. खनिज द्रव्यांची शरीराच्या आवश्यकतेनुसार दोन प्रकारात विभागणी केली जाते. जास्त प्रमाणात लागणारी खनिजद्रव्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, सोडियम, पोटॅशिअम, क्लोरिन, सल्फर. कमी प्रमाणात लागणारी परंतु आवश्यक खनिज द्रव्ये ः लोह, तांबे, कोबाल्ट, मॅंगेनीज, आयोडीन, झिंक. सेलेनियम, मॉलिब्डेनम  इत्यादी. आवश्यक असणारी प्रमुख खनिजद्रव्ये 

  • कॅल्शिअम, फॉस्फरस हाडाची वाढ आणि यासोबतच योग्य प्रमाणात फ्लोरिन दातांच्या आवरणासाठी उपयुक्त.
  • शरीर अवयव, मांस पेशी, रक्तपेशींसाठी झिंक, फॉस्फरस, सल्फरची आवश्यकता.
  • शरीर चयापचयासाठी आयोडीन आवश्यक.
  • पेशींची वाढ व विभाजन, शरीरातील आम्ल-विम्ल निर्देशांक (सामू) नियमित ठेवण्यासाठी सोडिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, क्लोरिन आवश्यक.
  • कॅल्शिअम 

  • हाडांची वाढ आणि मजबुतीसाठी आवश्यकता.
  • दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असते. त्यामुळे दूध देणाऱ्या जनावरांच्या शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण कमी असेल तर त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो.  
  • गाभण जनावरांमध्ये वासराच्या हाडांच्या वाढीसाठी मातेपासून हे कॅल्शिअम मिळवले जाते. जर गाय, म्हशीमध्ये कॅल्शिअम कमी असेल तर त्याचा गर्भ वाढीवर परिणाम होतो.
  • फॉस्फरस 

  •  हाडांची वाढ आणि मजबुती, शरीर रसांची निर्मिती आणि योग्य प्रमाणात स्रवणासाठी आवश्यक.
  • प्रजनन संस्थेच्या कार्यासाठी याच प्रमाणे मांस पेशींच्या मजबुतीसाठी आवश्यक. 
  • कमतरता रक्तपेशींच्या आजारास कारणीभूत ठरते. विशेषतः म्हशींमध्ये फॉस्फरसची कमतरता  असते. यामुळे रक्तपेशी तुटतात. लघवीद्वारे हिमोग्लोबिन शरीरातून बाहेर पडते. हा आजार जीवघेणा ठरू शकतो.
  • जनावरांना कॅल्शिअम सोबत फॉस्फरसची मात्रा आवश्यक. हाडांच्या वाढीसाठी जनावरांमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे प्रमाण २ : १ असावे. 
  • सोडिअम 

  • अत्यंत विद्राव्य स्वरूपात आढळणारे हे खनिज द्रव्य, चयापचय शरीराचा सामू योग्य राखण्यासाठी व अन्नद्रव्य पेशींमध्ये शोषले जाण्यासाठी आवश्यक.
  • अमायनो आम्ल आणि साखरेचे शोषण शरीरातील सोडिअमच्या उपलब्धतेवर अवलंबून असते.
  • पोटॅशिअम शरीरातील रक्त द्रव्यांमध्ये पोटॅशिअम असते. हे मांस पेशींच्या कार्यासाठी आवश्यकता.

    क्लोरिन क्लोरिन हे पेशी आणि शरीरातील रस द्रव्यांमध्ये असते. अन्नपचनासाठी आवश्यक असणाऱ्या पाचक रसामध्ये क्लोरिन महत्त्वाचा घटक. 

    गंधक  शरीरातील कार्टिलेजमध्ये गंधक असते. मेंढ्यांना लोकरीच्या वाढीसाठी तसेच रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये अन्नपचनासाठी उपयुक्त.  - डॉ. सुधीर राजूरकर,   ९४२२१७५७९३ (प्राध्यापक, पशू औषधी व विषशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com