agricultural news in marathi use of Minerals in the animals diet | Page 4 ||| Agrowon

जनावरांच्या आहारात असावीत खनिज द्रव्ये

डॉ. सुधीर राजूरकर
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

पचनसंस्था, प्रजनन संस्था किंवा शरीराच्या प्रत्येक संस्थेच्या कामासाठी खनिज द्रव्यांची आवश्यकता असते. शरीराच्या गरजेनुसार ही योग्य खनिज मिश्रणांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. 
 

पचनसंस्था, प्रजनन संस्था किंवा शरीराच्या प्रत्येक संस्थेच्या कामासाठी खनिज द्रव्यांची आवश्यकता असते. शरीराच्या गरजेनुसार ही योग्य खनिज मिश्रणांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. 

पशू संगोपनात खनिज द्रव्ये आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. जनावरांना  चाऱ्यातून खनिज द्रव्य मिळते. परंतु चाऱ्यामध्ये हे द्रव्य जमिनीतून येते. पर्यायाने जमिनीतील खनिज द्रव्यांच्या उपलब्धतेवर चाऱ्यातील द्रव्यांचे प्रमाण अवलंबून असते. याचप्रमाणे खनिज द्रव्यांचे जमिनीतील प्रमाण वेगवेगळे असते. म्हणजेच जनावरांसाठी आवश्यक असणारे खनिज द्रव्य योग्य मात्रेत देण्याची आवश्यकता आहे. पचनसंस्था, प्रजनन संस्था किंवा शरीराच्या प्रत्येक संस्थेच्या कामासाठी खनिज द्रव्यांची आवश्यकता असते. खनिज द्रव्यांची शरीराच्या आवश्यकतेनुसार दोन प्रकारात विभागणी केली जाते.

जास्त प्रमाणात लागणारी खनिजद्रव्ये
कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, सोडियम, पोटॅशिअम, क्लोरिन, सल्फर. कमी प्रमाणात लागणारी परंतु आवश्यक खनिज द्रव्ये ः लोह, तांबे, कोबाल्ट, मॅंगेनीज, आयोडीन, झिंक. सेलेनियम, मॉलिब्डेनम 
इत्यादी.

आवश्यक असणारी प्रमुख खनिजद्रव्ये 

 • कॅल्शिअम, फॉस्फरस हाडाची वाढ आणि यासोबतच योग्य प्रमाणात फ्लोरिन दातांच्या आवरणासाठी उपयुक्त.
 • शरीर अवयव, मांस पेशी, रक्तपेशींसाठी झिंक, फॉस्फरस, सल्फरची आवश्यकता.
 • शरीर चयापचयासाठी आयोडीन आवश्यक.
 • पेशींची वाढ व विभाजन, शरीरातील आम्ल-विम्ल निर्देशांक (सामू) नियमित ठेवण्यासाठी सोडिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, क्लोरिन आवश्यक.

कॅल्शिअम 

 • हाडांची वाढ आणि मजबुतीसाठी आवश्यकता.
 • दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असते. त्यामुळे दूध देणाऱ्या जनावरांच्या शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण कमी असेल तर त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो.  
 • गाभण जनावरांमध्ये वासराच्या हाडांच्या वाढीसाठी मातेपासून हे कॅल्शिअम मिळवले जाते. जर गाय, म्हशीमध्ये कॅल्शिअम कमी असेल तर त्याचा गर्भ वाढीवर परिणाम होतो.

फॉस्फरस 

 •  हाडांची वाढ आणि मजबुती, शरीर रसांची निर्मिती आणि योग्य प्रमाणात स्रवणासाठी आवश्यक.
 • प्रजनन संस्थेच्या कार्यासाठी याच प्रमाणे मांस पेशींच्या मजबुतीसाठी आवश्यक. 
 • कमतरता रक्तपेशींच्या आजारास कारणीभूत ठरते. विशेषतः म्हशींमध्ये फॉस्फरसची कमतरता  असते. यामुळे रक्तपेशी तुटतात. लघवीद्वारे हिमोग्लोबिन शरीरातून बाहेर पडते. हा आजार जीवघेणा ठरू शकतो.
 • जनावरांना कॅल्शिअम सोबत फॉस्फरसची मात्रा आवश्यक. हाडांच्या वाढीसाठी जनावरांमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे प्रमाण २ : १ असावे. 

सोडिअम 

 • अत्यंत विद्राव्य स्वरूपात आढळणारे हे खनिज द्रव्य, चयापचय शरीराचा सामू योग्य राखण्यासाठी व अन्नद्रव्य पेशींमध्ये शोषले जाण्यासाठी आवश्यक.
 • अमायनो आम्ल आणि साखरेचे शोषण शरीरातील सोडिअमच्या उपलब्धतेवर अवलंबून असते.

पोटॅशिअम
शरीरातील रक्त द्रव्यांमध्ये पोटॅशिअम असते. हे मांस पेशींच्या कार्यासाठी आवश्यकता.

क्लोरिन
क्लोरिन हे पेशी आणि शरीरातील रस द्रव्यांमध्ये असते. अन्नपचनासाठी आवश्यक असणाऱ्या पाचक रसामध्ये क्लोरिन महत्त्वाचा घटक. 

गंधक 
शरीरातील कार्टिलेजमध्ये गंधक असते. मेंढ्यांना लोकरीच्या वाढीसाठी तसेच रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये अन्नपचनासाठी उपयुक्त. 

- डॉ. सुधीर राजूरकर,   ९४२२१७५७९३
(प्राध्यापक, पशू औषधी व विषशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी)

 


इतर कृषिपूरक
उष्णतेच्या ताणापासून दुधाळ जनावरांची...वातावरणातील तापमान व हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
गाई, म्हशींमधील छातीचे आजारजनावरांमधील छातीच्या आजारामुळे दुग्धोत्पादनावर...
वराहपालन सुरू करताना...वराहपालनातून स्वयंपूर्ण होता येईल का, हे जाणून...
गीर संवर्धन करणारा भरवाड समुदायभरवाड समुदायासाठी गीर गोवंश संपत्ती आहे....
बहुगुणी मधाची शुद्धता अन् उपयोग मधमाश्यांपासून मधासोबतच अन्य मौल्यवान...
कृषी उत्पादन वाढीसाठी मधमाश्या...जागतिक मधमाशी दिवस विशेष वाढते शेतीक्षेत्र,...
आहारात असावा आरोग्यदायी क्विनोआआंध्र प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात क्विनोआची...
दुधाळ जनावरांमधील माज ओळखण्याच्या...दुधाळ जनावरांतील व्यवस्थापनामध्ये मुख्य कार्य...
वासरांची वाढ खुंटण्याची कारणे अन्...वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसर, बाळ खुराक इ....
संगोपन जानी म्हशीचे...चांगल्या दर्जाचे जनावर टिकून राहावे म्हणून जानी...
दूध उत्पादन वाढीसाठी दर्जेदार पशुआहारचारा कुट्टी करत असताना त्याचा योग्य आकार...
दूधनिर्मिती अन् प्रत टिकविण्यासाठी...दुधाचा दर हा गुणवत्तेवर अवलंबून असतो. त्यामुळे...
देशी, जर्सी, एचएफ गाईंचे अर्थशास्त्रशेतीला पूरक म्हणून पशुपालन हा व्यवसाय...
शिफारशीनुसार जनावरांना लसीकरण आवश्यक...जनावरे आजारी पडल्यामुळे दूध उत्पादनात घट, गर्भपात...
उन्हाळ्यातील म्हशींचे व्यवस्थापन जनावरांसाठी पुरेसे पाणी, खाद्याची व्यवस्था ठेवावी...
जनावरातील मूतखड्यावर गोखरू, कुलशी...मूतखडा हा आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात...
नियोजन चारा, खाद्यमिश्रणाचे..जनावरांना वर्षभर लागणाऱ्या पशुखाद्य घटक, हिरवा...
शेळीपालनातील महत्त्वाच्या बाबीआपल्या गोठ्यातील शेळी स्थानिक जातीची असली तरी...
उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनगोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी...
फलोत्पादनासाठी शासनाच्या योजनाकृषी विभागातर्फे फलोत्पादनवाढीसाठी विविध योजना...