शेळी प्रजननासाठी तंत्रज्ञानाचा वापर

गर्भपात तसेच पुरेसे लक्ष न दिल्याने प्रसूतीच्या वेळी शेळ्यांना होणारा त्रास किंवा जन्माला येणारी अशक्त पिल्ले यांमुळे शेळीपालकांना नाहक नुकसान सोसावे लागते. अशावेळी ऋतुचक्राचे नियमन उपयुक्त ठरते.
Use of technology for goat breeding
Use of technology for goat breeding

गर्भपात तसेच पुरेसे लक्ष न दिल्याने प्रसूतीच्या वेळी शेळ्यांना होणारा त्रास किंवा जन्माला येणारी अशक्त पिल्ले यांमुळे शेळीपालकांना नाहक नुकसान सोसावे लागते. अशावेळी ऋतुचक्राचे नियमन उपयुक्त ठरते. शुक्राणूची लिंग चाचणी

  • काही शेळी पालकांना दुधासाठी फक्त मादी शेळ्याच पाहिजे असतात किंवा काही शेळीपालकांना मांसासाठी नर बोकडच पाहिजे असतो, त्यासाठी शुक्राणूची लिंग चाचणी तंत्रज्ञान फायदेशीर ठरते.
  • कृत्रिम रेतन केलेल्या शेळीला मादी करडे होणार की नर करडे याची त्यांच्या जन्माला येण्याआधी कोणतीही निश्चिती नसते. यावर मात करण्यासाठी विर्य प्रत्यारोपण करण्याच्या वेळेसच होणाऱ्या करडाचे लिंग कोणते असणार हे ठरवणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
  • हे तंत्रज्ञान  नराच्या शुक्राणूमध्ये असणाऱ्या दोन प्रकारचे लिंग गुणसूत्र  एक्स (X) आणि वाय (Y) यांना वेगळे करण्यावर आधारित आहे. दोन्ही गुणसूत्रावर असणाऱ्या डी.एन.ए. च्या संख्येमध्ये जवळपास २.८ ते ४ टक्के इतका फरक असतो. एक्स गुणसूत्रावर असणाऱ्या अधिक डी.एन.ए.च्या संख्येच्या आधारावर फ्लोसाईटोमेट्री यंत्राद्वारे एक्स आणि वाय लिंग गुणसूत्रांनुसार वेगळे करता येतात.
  •  या तंत्रानुसार फक्त नर करडे तयार होण्याची निश्‍चिती ८०% आणि मादी करडे तयार होण्याची निश्चिती ९४% इतकी आहे. 
  • फायदे

  • फ्लोसाईटोमेट्री यंत्राद्वारे लिंग निश्चिती केलेले शुक्राणू वेगवेगळ्या स्ट्रॉ बनवून गोठीत वीर्य केंद्रात साठवून ठेवल्या जातात. त्यांचा उपयोग कृत्रिम रेतनाप्रमाणेच परंतु हव्या त्या लिंगाची करडे मिळवण्यासाठी करता येतो.
  • सध्या हे संशोधन विकसित देशांमध्ये प्रगत होऊन तेथील शेतकऱ्यांना  फायदा होत आहे. 
  • माजाचे एकत्रीकरण 

  • कृत्रिम रेतनाची सर्वात मोठी अडचण म्हणजे शेळ्यांमधील योग्य माजाची वेळ ठरवणे व योग्य माजाची वेळ ही माजाच्या लक्षणांवरून ओळखायची असते. पण सध्याच्या परिस्थितीत माजाच्या लक्षणांची योग्य पाहणी करणे आणि कृत्रिम रेतनासाठी माजाची योग्य वेळ ठरविणे हे अचूकपणे होत नसल्यामुळे कृत्रिम रेतनाची उपयुक्तता पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही. एवढे चांगले जैविक तंत्रज्ञान वापरून आपण उत्कृष्ट संकरित शेळ्या तयार करून शेळीचे मांस व दूध उत्पादन अपेक्षेपेक्षा वाढवू शकलो नाही. पण आता एक्स किंवा वाय लिंग गुणसूत्रांचे वीर्य वापरून कृत्रिम रेतनाची उपयोगिता वाढवायची असेल तर माजाचे एकत्रीकरण ही पद्धत वापरल्यास फायद्याचे ठरते.
  • माजाचे एकत्रीकरण किंवा समन्वय म्हणजे कळपातील एकापेक्षा जास्त शेळ्या संप्रेरक देऊन एकाच वेळेस माजावर आणणे. त्यानंतर कृत्रिम रेतनाने फळविणे किंवा माजाच्या बाह्य लक्षणांशिवाय विशिष्ट ठरविलेल्या वेळी कृत्रिम रेतन करणे होय.
  • बऱ्याचवेळा शेळ्यांच्या गर्भधारणेची वेळ माहिती नसल्यामुळे किंवा दुर्लक्ष झाल्यामुळे गाभण काळात शेळयांकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे शेळ्यांमध्ये होणारे गर्भपात तसेच पुरेसे लक्ष न दिल्याने प्रसूतीच्या वेळी शेळ्यांना होणारा त्रास किंवा जन्माला येणारी अशक्त पिल्ले यांमुळे शेळीपालकांना नाहक नुकसान सोसावे लागते. अशावेळी ऋतुचक्राचे नियमन उपयुक्त ठरते.
  • या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याकडे असणाऱ्या शेळी कळपास विशिष्ट ऋतूचा विचार न करता संप्रेरकांच्या उपचाराने शेळ्या ठराविक वेळेत माजावर आणून फळवणे शक्य आहे. एकाच वेळी शेळ्या माजावर आणायला प्रजननासाठी लागणाऱ्या संप्रेरकांचा वापर केला जातो. ऋतुचक्राचे नियमन करून माजाची खात्री झाल्यामुळे गर्भाधारणेत वाढ दिसून येते.
  • फायदे

  • कृत्रिम रेतन करण्याचे वेळापत्रक आपल्या मर्जीनुसार ठरविता येईल तसेच माजाचे बाह्य लक्षणे न शोधता एकाच वेळी अनेक शेळ्यांना निश्चित वेळी कृत्रिम रेतनाद्वारे फळविता येते.
  • माजाच्या एकत्रीकरणामुळे एकाच वेळी शेळ्यांचे प्रजनन होते. वेगवेगळ्या विण्याच्या मर्यादा घालविता येतात आणि वर्षभराचे प्रजननाचे वेळापत्रक ठरविता येते.
  • शेळ्यांच्या प्रजनन स्थितीप्रमाणे खाद्याचे चांगल्या प्रकारे नियोजन करता येते.
  •  वारंवार उलटणाऱ्या शेळ्या, अनियंत्रित माजावर येणाऱ्या शेळ्या व तसेच गर्भाशयाचे आजारावर औषध उपचार करण्याकरिता याचा उपयोग होतो.
  • माजाचे एकत्रीकरण हे तंत्रज्ञान शेळी पालकांसाठी अत्यंत फायद्याचे आहे. परंतु या तंत्रज्ञानाचा अवलंब करताना तज्ज्ञ पशुवैद्यकाचे मार्गदर्शन घेणे अत्यंत गरजेचे आहे.शेळीपालकांनी या कमी खर्चाच्या तंत्राचा वापर करून शेळ्यांची प्रजननक्षमता योग्य ठेवली तर शेळीपालन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल.    
  • कृत्रिम रेतन तंत्र

  •  कृत्रिम रेतन तंत्र विशेषतः गाई - म्हशींची प्रजनन क्षमता व आनुवंशिकता अधिक वेगाने वाढवण्यासाठी आजपर्यंत सर्वात यशस्वी ठरले आहे. सध्या शेळीपालनात व्यावसायिक पातळीवर वापरले जाते. 
  • कृत्रिम रेतनात जातिवंत बोकडाचे वीर्य वापरून गुणवत्तापूर्ण संकरित शेळ्यांची पिढी आपण तयार करू शकतो, जी मांस उत्पादनासाठी उपयुक्त ठरते. कृत्रिम रेतनामुळे प्रजननासाठी वेगळा बोकड पाळण्याचा खर्च वाचतो. कृत्रिम रेतन पद्धतीने शेळी फळवल्यास गर्भाशयाचे रोग होण्याची भीती कमी होते. 
  • कृत्रिम रेतनाच्या वापराने फक्त जातिवंत नराचे ५०% गुणसूत्र शेळ्यांच्या पुढील पिढीस आनुवंशिकतेने प्राप्त होतात. 
  • - डॉ.चैतन्य पावशे, ९९२१६११८९ (डॉ. पावशे हे स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था,अकोला येथील पशुप्रजनन व प्रसूतिशास्त्र विभागाचे प्रमुख  आहेत. डॉ. सांगळे या संशोधक विद्यार्थिनी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com