agricultural news in marathi Vaccination schedule in poultry birds | Agrowon

कोंबड्यांमधील लसीकरणाचे वेळापत्रक

डॉ. एम. आर. वडे
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021

लसीकरणामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढून विविध रोगापासून त्यांचा बचाव होतो. कोंबड्यांची मरतुक कमी होऊन संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येते. लसीकरण शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावे. 
 

लसीकरणामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढून विविध रोगापासून त्यांचा बचाव होतो. कोंबड्यांची मरतुक कमी होऊन संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येते. लसीकरण शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावे. 

कोंबड्या विविध प्रकारच्या अतिसूक्ष्म विषाणूंमुळे आजारास बळी पडतात. कोंबड्यांना होणारे बहुतेक आजार हे सांसर्गिक असतात. याचा प्रादुर्भाव एका कोंबडीपासून दुसऱ्या कोंबडीला होतो. त्यामुळे कोंबड्यांचे आरोग्य धोक्यात येते. कोंबड्या आजाराला बळी पडू नये यासाठी वेळेवर प्रतिबंधात्मक लसीकरण करणे आवश्‍यक असते. यामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढून विविध आजारापासून बचाव होतो. तसेच कोंबड्यांची होणारी मरतुक कमी होऊन संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येते. 

लसीकरण करताना घ्यावयाची काळजी 

 • लसीकरण तज्ञ्जांच्या सल्लाने करावे.
 • लस खरेदी करताना त्यावरील वापराची अंतिम तारीख तपासावी.
 • लस घेतेवेळी ती योग्य तापमानात ठेवल्याची खात्री करावी. 
 • लसीच्या बाटल्यांची वाहतूक ही नेहमी थर्मासमध्ये बर्फ ठेवून त्यावरच करावी. 
 • लसीकरण शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावे. यामुळे कोंबड्यांवर वातावरण आणि लसीकरणाचा ताण पडणार नाही.
 • लसीच्या बाटलीसोबत आलेले निर्जंतुक पाणी हे लसीच्या बाटलीमध्ये टाकावे आणि ते एकजीव होईपर्यंत मिसळावे. 
 • लसीकरणासाठी छोट्या आकाराच्या ड्रॉपरचा वापर करावा. ड्रॉपरची ने-आण करण्यासाठी बर्फाच्या पॅड वापरावे. 
 • लस तयार झाल्यानंतर लवकरात लवकर संपवावी.
 • बाटलीवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे. एकदा वापरून उरलेली लस पुन्हा वापरू नये.
 • वापरून उरलेली लस, बाटल्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी.
 • पक्षीगृहातील सर्व कोंबड्यांना एकाच वेळी लसीकरण करावे. फक्त निरोगी कोंबड्यांना लसीकरण करावे.
 • एका वेळी एकच लस द्यावी. एकापेक्षा जास्त लसी दिल्यास कोंबड्यांमध्ये लसीची रिॲक्शन होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. 

आजाराचा प्रसार न होण्यासाठी घ्यावयाची काळजी 

 • परसबागेची जागा नेहमी स्वच्छ ठेवावी.
 • वेळोवेळी पिण्याच्या पाण्यामध्ये जीवनसत्त्व व खनिज द्यावे. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती टिकून राहते.
 • वापरात येणारी सर्व उपकरणे ४८ तासांसाठी २ टक्के सोडिअम-हायपोक्लोराइट द्रावणामध्ये बुडवून ठेवावे. आणि नंतर त्यांचा वापर करावा.
 • मेलेल्या कोंबड्या, त्यांचे मलमूत्र, खाली पडलेली पिसे लांब नेऊन जाळावीत. किंवा मृत कोंबड्या खोल खड्ड्यात चुना आणि मीठ टाकून पुरावे.
 • कुठल्याही रोगाची लक्षणे आढळल्यास त्वरित पशुवैद्यकास संपर्क करावा. 
 • बाहेरून आणलेल्या नवीन कोंबड्या किमान ३० दिवस इतर कोंबड्यांपासून दूर ठेवाव्यात.
 • कोंबड्या खुराड्यात दाटीने ठेवू नये. भरपूर हवा व उजेड न मिळाल्यास कोंबड्या आजारी पडतात. खुराड्यात मोकळी जागा, हवा व उजेड असावा.
 • जीवाणूजन्य व विषाणूजन्य संक्रमित परिसरात विषाणूचे प्रमाण कमी होण्याकरिता २ टक्के सोडिअम हायपोक्लोराइट किंवा ४ टक्के फॉर्मलीन या जंतुनाशकाची फवारणी करून परिसर निर्जंतुक करावा.

- डॉ. एम.आर. वडे,  ८६००६२६४००
(कुक्कुट संशोधन केंद्र, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)


इतर कृषिपूरक
देशी गोवंश संवर्धनासाठी ‘राष्ट्रीय...भारतीय गोवंशाची रोग प्रतिकारक शक्ती व विविध...
शेतकरी नियोजन ः रेशीमशेतीशेतकरी ः सोपान शिंदे गाव ः पांगरा शिंदे, ता.वसमत...
शेततळ्यात कार्प माशांचे व्यवस्थापनतळयातील बीजाची वाढ ही मुख्यत्वे पाण्याच्या...
शेततळ्यात कार्प प्रजातीचे संवर्धन शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करताना बाजारात मागणी...
कुक्कुटपालनातून ग्रामीण अर्थकारण...ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसायाचा विकास...
कोंबड्यांमधील लसीकरणाचे वेळापत्रकलसीकरणामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढून...
परसबागेत सुधारित कोंबडी जातीसह योग्य...परसबागेतील कोंबड्यांच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन...
कोंबडी खाद्यामध्ये सोयाबीन पेंडीला...सध्याच्या काळामध्ये कोंबडी खाद्याची किंमत वाढत...
जनावरांना द्या संतुलित आहारजनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक...
मधमाशीपालनातील मौल्यवान पदार्थ : बी...मधमाशी पालनातून मिळणाऱ्या विविध पदार्थांच्या...
शेळी प्रजननासाठी तंत्रज्ञानाचा वापरगर्भपात तसेच पुरेसे लक्ष न दिल्याने प्रसूतीच्या...
शेळीप्रजननासाठी भ्रूण प्रत्यारोपण,...सध्याच्या  शेळ्यांची उत्पादकता वेगाने...
निमखाऱ्या पाण्यातील जिताडा,...जिताडासंवर्धन तलाव आणि जलाशयात पिंजरा पद्धतीने...
लेप्टोस्पायरोसिस प्रसाराबाबत जागरूक राहापावसाळी वातावरणात लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा...
शेततळ्यातील मत्स्य संवर्धनाची पूर्वतयारीमत्स्यसंवर्धन तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यापूर्वी...
डंखविरहित मधमाशी वसाहतीचे विभाजनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती आहेत....
वासरातील आजारावर उपाययोजनावासरांच्या संगोपनामध्ये अडथळा आणणारा एक घटक...
जनावरांतील दातांचे आजार अन् उपचारजनावरांमध्ये दातांची ठेवण आणि प्रकार त्यांच्या...
निवड जातिवंत दुधाळ म्हशींचीदूध उत्पादनासाठी म्हशी खरेदी करताना त्यांना...
संकरित वासरांचे संगोपनजन्मानंतर वासराला त्याच्या वजनाच्या १० टक्के चीक...