agricultural news in marathi value added products of banana | Agrowon

केळीपासून व्हिनेगार, टॉफी, पावडर

ज्ञानेश्‍वर शिंदे, डॉ. रेखा राणी
शनिवार, 22 मे 2021

केळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे केळीवर योग्य प्रक्रिया करून बनविलेल्या पदार्थांचा साठवण कालावधी वाढवता येतो.
 

केळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे केळीवर योग्य प्रक्रिया करून बनविलेल्या पदार्थांचा साठवण कालावधी वाढवता येतो.

वर्षभर उपलब्ध असणारे, बिया नसलेले आणि सहज उपलब्ध होणारे फळ म्हणून केळीस ओळखले जाते. केळीच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारात चांगली मागणी आहे. काढणीपश्‍चात केळीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी केळीवर प्रक्रिया करणे फायदेशीर ठरते. केळीपासून वेफर्स, जाम, भुकटी, प्युरी, सुकेळी, बिस्कीट, टॉफी, वाइन असे विविध पदार्थ बनवले जातात.

आरोग्यदायी फायदे 

  • केळीच्या नियमित सेवनाने चयापचयाची क्रिया सुरळीत राहते. 
  • कोलेस्ट्रॉल नियंत्रित राखण्यास मदत होते.
  • केळी खाण्यामुळे पोटातील आतडी साफ होतात. मल साचून राहत नाही. यामुळे मलावरोधाची समस्या नष्ट होते.
  • केळीमध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्त्व बी ६ असते. यामुळे शरीरात नवीन पेशी निर्माण होण्यास मदत होते.
  • केळी कॅन्सरपासून बचाव करण्यास प्रभावी मानले जातात. 
  • केळीमधील कॅल्शिअममुळे हाडे मजबूत होतात.
  • केळीमध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे नियमित पोट साफ होण्यास मदत होते. तसेच बुद्धकोष्टतेचा त्रासावर गुणकारी असते.
  • मधुमेहाचा प्राथमिक स्तर असल्यास कच्च्या केळीचे सेवन करावे. मधुमेह नियंत्रणात राहतो.

प्रक्रियायुक्त पदार्थ 
व्हिनेगार 

जास्त पिकलेली केळी खाण्यास चांगली नसतात तसेच चवीलाही चांगली लागत नाहीत. अशा केळ्यांपासून व्हिनेगार तयार करता येते.

कृती
जास्त पिकलेली केळीची साल काढून घ्यावी. त्याचा लगदा तयार करावा. त्यामध्ये पाणी घालून त्या मिश्रणातील साखरेचे प्रमाण १० टक्के येईल याची काळजी घ्यावी. या मिश्रणात यीस्ट (सॅक्रोमायसिस सीटीव्हीसी) टाकून २ दिवस ठेवून द्यावे. तयार मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. या मिश्रणात ४८ तासांपूर्वी केळीच्या रसात तयार केलेले माल्ट व्हिनेगारचे मुरवण प्रति लिटरला २५ ते ३० मिलि या प्रमाणात मिसळावे. हे मिश्रण ३० अंश सेल्सिअस तापमानाला आंबवण्यास ठेवावे. आंबवण्याची रासायनिक क्रिया (ॲसीटिफिकेशन) पूर्ण होण्यासाठी २ ते ३ आठवडे लागतात. नंतर सेंट्रिफ्यूज करून व्हिनेगार वेगळे करावे. तयार व्हिनेगार निर्जंतुक बाटल्यांत भरून हवाबंद करून साठवावे.

टॉफी 
टॉफी बनवण्यासाठी केळीच्या गराचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे १ किलो गरापासून सव्वा किलो टॉफी तयार होते.

कृती
१ किलो गरामध्ये १ किलो साखर, ३० ग्रॅम मक्याचे पीठ व १५० ग्रॅम वितळलेले वनस्पती तूप मिसळून मंद आचेवर शिजवावे. मिश्रणातील घन पदार्थाचे प्रमाण ७० अंश ब्रिक्स(TSS) इतके आल्यानंतर त्यामध्ये मीठ ४ ग्रॅम व सायट्रिक आम्ल ४ ग्रॅम टाकावे. मिश्रणाचा ब्रिक्स ८२ ते ८३ अंश येईपर्यंत उष्णता देणे चालू ठेवावे. एका पसरट भांड्यांमध्ये वनस्पती तूप लावून घ्यावे. त्यामध्ये साधारणतः: १ ते १.५० सेंमी जाडीचा थर येईपर्यंत मिश्रण एकसारखे पसरावे. आणि थंड होण्यास ठेवून द्यावे. मिश्रण थंड झाल्यानंतर सुरीच्या साह्याने त्याचे काप करावेत. तयार टॉफी ड्रायरमध्ये ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमानास २ ते ३ तास सुकवाव्यात. तयार टॉफी हवाबंद बरणीत किंवा प्लास्टिक पिशवीमध्ये साठवून ठेवावी.

पावडर
केळी पावडर बनवण्यासाठी केळी गराचा वापर केला जातो. प्रथम केळी स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर केळीची साल काढून पल्पर यंत्राच्या साह्याने त्याचा लगदा तयार करून घ्यावा. केळीच्या गराच्या लगद्याची भुकटी स्प्रे ड्रायर किंवा ड्रम ड्रायरच्या साहाय्याने करतात. तयार झालेली भुकटी निर्जंतुक हवाबंद डब्यात साठवून कोरड्या व थंड जागी साठवितात. लहान मुलांचा आहार, बिस्किटे तसेच आइस्क्रीम मध्ये केळीच्या भुकटीचा वापर केला जातो. केळी भुकटीला परदेशात भरपूर मागणी आहे. 

-  ज्ञानेश्‍वर शिंदे,  ७५८८१७९५८०
(आचार्य पदवीचे विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, सॅम हिगिनबॉटम कृषी तंत्रज्ञान आणि विज्ञान विद्यापीठ, प्रयागराज,उत्तर प्रदेश)
डॉ. रेखा राणी,  ०८००५३२१८१३
(दुग्ध तंत्रज्ञान विभाग, वॉर्नर कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी, प्रयागराज, उत्तर प्रदेश)


इतर कृषी प्रक्रिया
आलेपासून प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मितीआले ही कंदवर्गीय वनस्पती असून बहुऔषधी म्हणून...
पौष्टिक आहारासाठी क्विनोआक्विनोआ हा धान्याचा एक प्रकार असून एखाद्या...
जाणून घ्या अंडी खाण्याचे फायदेशरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः...
अ‍ॅक्रिलामाइड कमी करण्यासाठी...विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
लिंबापासून प्रक्रियायुक्त पदार्थलिंबाच्या सालीमध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे,...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटसद्यःस्थितीत भारतामध्ये ड्रॅगन फ्रूटचे उपलब्ध...
आवळ्यापासून लोणचे, सुपारी, मुरंबाआवळ्यापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांना...
कोकोओपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकोओचे अनेक प्रकार असून, प्रत्येक प्रकारातील...
पेरूपासून जेली, जॅम, सरबतपेरू हे नाशवंत फळ असल्यामुळे योग्यवेळी काढणी करून...
आरोग्यवर्धक योगर्टयोगर्ट हे कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, झिंक,...
पेरूचे आरोग्यदायी गुणधर्मपेरू हे नाशवंत फळ असून ते जास्त काळ टिकत नाही....
आहारात असावेत ग्लुटेन मुक्त पदार्थग्लुटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...
तुतीपासून प्रक्रियायुक्त पदार्थतुती फळांचा  पांढरा, काळा आणि लाल रंग असतो....
आहारात असावेत मोड आलेली कडधान्येप्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक...
अन्न प्रक्रियेसाठी कंपित विद्युत...पारंपरिक अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये...
आहारामध्ये असावा तंतुमय पदार्थांचा...बदलती जीवनशैली आणि नेहमी जंक फूड खाण्यामुळे...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...
केळीपासून व्हिनेगार, टॉफी, पावडरकेळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे...
जीवनसत्त्वयुक्त शेवगाशेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे आहेत....