agricultural news in marathi value added products of Garlic | Agrowon

लसणापासून लोणचे, जेली, चटणी

करिष्मा कांबळे
शनिवार, 17 एप्रिल 2021

लसूण हा आपल्या सर्वांना परिचित आहे. लसणाचा उपयोग विविध अन्नपदार्थांमध्ये अन्न स्वादिष्ट होण्यासाठी केला जातो. लसणामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचा औषधोपचारासाठीदेखील वापर होतो. लसणामध्ये मॅंगेनीज, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब, जीवनसत्त्व क, सेलेनियम, तंतुमय घटकांचे चांगले प्रमाण असते. लसणापासून भरपूर मूल्यवर्धित पदार्थ बनविले जातात.
 

लसूण हा आपल्या सर्वांना परिचित आहे. लसणाचा उपयोग विविध अन्नपदार्थांमध्ये अन्न स्वादिष्ट होण्यासाठी केला जातो. लसणामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचा औषधोपचारासाठीदेखील वापर होतो. लसणामध्ये मॅंगेनीज, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब, जीवनसत्त्व क, सेलेनियम, तंतुमय घटकांचे चांगले प्रमाण असते. लसणापासून भरपूर मूल्यवर्धित पदार्थ बनविले जातात.

लसूण ज्यूस 
पोटाच्या आजारावर, त्वचा रोग आणि कानदुखीवर उपयुक्त.

कृती
प्रथम वाळलेल्या लसणाच्या अंदाजे ४ मिमी आकाराच्या गोल चकत्या करून घ्याव्यात. तयार चकत्या गरम पाण्यामध्ये मऊ होण्यासाठी ठेवाव्यात. मऊ झालेल्या लसूण चकत्यांचे बारीक तुकडे करावेत. त्यांची पातळसर पेस्ट तयार करावी. तयार पेस्ट एका सुती कापडामध्ये घेऊन चमच्याने दाबून लसूण ज्यूस मिळवता येतो.

लोणचे 
साहित्य

लसूण १०० ग्रॅम, तेल ५० ग्रॅम,अर्धा चमचा हिंग, हळद, मेथीचे दाणे पावडर आणि बडीशेप पावडर (प्रत्येकी १ चमचा), व्हिनेगार ६० मिलि, तिखट २ चमचे.

कृती
प्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावे. त्यामध्ये १ चमचा हिंग घालावे. हिंग फुलल्यानंतर त्यामध्ये सोललेल्या लसणाच्या पाकळ्या व १ चमचा मीठ घालावे. जेणेकरून त्या पाकळ्या थोड्या लवकर मऊ होतील. साधारणपणे ४ ते ५ मिनिटांमध्ये लसणाच्या पाकळ्या मऊ होतात. त्यानंतर गॅस बंद करावा. त्यामध्ये मेथीदाणे पावडर, बडीशेप पावडर व मोहरी पावडर घालून चांगले एकत्रित करून घ्यावे. त्यानंतर त्यात व्हिनेगर मिसळावे. तयार लोणचे स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये हवाबंद करावे.

लसूण सॉस 
साहित्य

लसूण पाकळ्या १०० ग्रॅम, थंड दूध २५० मिलि, तेल ५०० मिलि, लिंबाचा रस ४ चमचे, मीठ अर्धा चमचा.

कृती 
प्रथम लसूण सोलून घ्यावा. सोललेल्या लसणाच्या पाकळ्यांमध्ये अर्धा चमचा मीठ व निम्मे दूध घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. त्यानंतर उरलेले दूध पुन्हा त्यामध्ये मिसळून घ्यावे. तयार मिश्रण २ मिनिटांसाठी पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यावे. त्यामध्ये थोडे तेल घालून साधारणपणे ५ मिनिटे मिक्सरमधून फिरवून घ्यावे. मिश्रणामध्ये लिंबाचा रस मिसळून पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यावे. तयार सॉस बरणीमध्ये हवाबंद करावा.

लसूण जेली 
साहित्य

 सोललेला लसूण १०० ग्रॅम, व्हिनेगर ५०० मिलि, साखर १ किलो, पेक्टिन १०० मिलि.

कृती
जेली बनवण्यासाठी लसणाच्या पाकळ्या व व्हिनेगर एकत्रित करावे. त्यास ब्लेंडरच्या साह्याने मऊ होईपर्यंत एकजीव करून घ्यावे. नंतर एका सॉस पॅनमध्ये हे एकजीव झालेले मिश्रण, उरलेले व्हिनेगर व साखर एकत्रित करून घ्यावे. मिश्रणास मंद आचेवर उकळी द्यावी. उष्णता देत असताना मिश्रण करपणार नाही याची काळजी घ्यावी. मिश्रणामध्ये पेक्टिन मिसळून पुन्हा उकळी द्यावी. जेली तयार झाल्यानंतर गॅस बंद करावा. तयार जेली निर्जतुक बरण्यांमध्ये भरून ठेवावी.

लसूण चटणी 
साहित्य 

लसूण १०० ग्रॅम, लाल सुक्या मिरच्या ७ ते ८, चवीनुसार मीठ, जिरे अर्धा चमचा, तेल २ चमचे, चिंच २ चमचे, हिंग अर्धा चमचा.

कृती 
प्रथम तव्यामध्ये तेल गरम करून घ्यावे. गरम तेलामध्ये सुक्या लाल मिरच्या चांगल्या परतून घ्याव्यात. परतलेल्या मिरच्या बाजूला काढून घ्याव्यात. मंद आचेवर सोललेल्या लसणाच्या पाकळ्या, मीठ व जिरे घालून थोडा वेळ परतून घ्यावे. लसूण थोडा मऊ पडला की त्यामध्ये चिंच आणि हिंग घालून पुन्हा २ मिनिटे परतून घ्यावे. परतलेले मिश्रण, तेलात फिरवून घेतलेल्या सुक्या मिरच्या व पॅनमध्ये उरलेले तेल एकत्रित करून बारीक होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. तयार चटणी काचेच्या बरणीमध्ये भरून हवाबंद करावी.

गार्लिक सॉल्ट 
साहित्य 

 २० ग्रॅम लसूण पावडर, मीठ ७८ ग्रॅम, कॅल्शिअम स्टिअरेट २ ग्रॅम. 

कृती 
लसूण पावडर, मीठ आणि कॅल्शिअम स्टिअरेट एकत्रित करून घ्यावे. हे प्रमाण १०० ग्रॅम गार्लिक सॉल्ट बनवण्यासाठी आहे. हे प्रमाण १०० च्या पटीत कमी किंवा जास्त करता येईल. गार्लिक सॉल्टचा उपयोग पदार्थांना चव आणण्यासाठी केला जातो.

- करिश्मा कांबळे,  ८४५९३७४६८४
(सहायक प्राध्यापिका, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, आचळोली, जि. रायगड)


इतर कृषी प्रक्रिया
अ‍ॅक्रिलामाइड कमी करण्यासाठी...विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
लिंबापासून प्रक्रियायुक्त पदार्थलिंबाच्या सालीमध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे,...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटसद्यःस्थितीत भारतामध्ये ड्रॅगन फ्रूटचे उपलब्ध...
आवळ्यापासून लोणचे, सुपारी, मुरंबाआवळ्यापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांना...
कोकोओपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकोओचे अनेक प्रकार असून, प्रत्येक प्रकारातील...
पेरूपासून जेली, जॅम, सरबतपेरू हे नाशवंत फळ असल्यामुळे योग्यवेळी काढणी करून...
आरोग्यवर्धक योगर्टयोगर्ट हे कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, झिंक,...
पेरूचे आरोग्यदायी गुणधर्मपेरू हे नाशवंत फळ असून ते जास्त काळ टिकत नाही....
आहारात असावेत ग्लुटेन मुक्त पदार्थग्लुटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...
तुतीपासून प्रक्रियायुक्त पदार्थतुती फळांचा  पांढरा, काळा आणि लाल रंग असतो....
आहारात असावेत मोड आलेली कडधान्येप्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक...
अन्न प्रक्रियेसाठी कंपित विद्युत...पारंपरिक अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये...
आहारामध्ये असावा तंतुमय पदार्थांचा...बदलती जीवनशैली आणि नेहमी जंक फूड खाण्यामुळे...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...
केळीपासून व्हिनेगार, टॉफी, पावडरकेळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे...
जीवनसत्त्वयुक्त शेवगाशेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे आहेत....
आहारात समाविष्ट करा पौष्टिक पदार्थरोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक...
ड्रॅगन फ्रूट प्रक्रियेतील संधीशरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
प्रक्रियेद्वारे आल्याचे मूल्यवर्धनआले हे महत्त्वाच्या मसाला पिकांपैकी एक आहे....