agricultural news in marathi Value added products of ginger | Agrowon

प्रक्रियेद्वारे आल्याचे मूल्यवर्धन

करिश्मा कांबळे
सोमवार, 26 एप्रिल 2021

आले हे महत्त्वाच्या मसाला पिकांपैकी एक आहे. आल्यापासून बनविलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांनाही चांगली मागणी आहे. आरोग्यदायी गुणधर्मामुळे आल्यापासून बनविलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना शहरी बाजारपेठेत चांगली मागणी आहे.  

आले हे महत्त्वाच्या मसाला पिकांपैकी एक आहे. आल्यापासून बनविलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांनाही चांगली मागणी आहे. आरोग्यदायी गुणधर्मामुळे आल्यापासून बनविलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना शहरी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यामुळे प्रक्रियेद्वारे आल्याचे मूल्यवर्धन करून चांगला नफा मिळवता येऊ शकतो.

आले पेस्ट
घरगुती पदार्थ निर्मितीवेळी आले पेस्ट वापरली जाते. पेस्ट बनवण्यासाठी प्रथम आल्याच्या वरील साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत. त्यामध्ये मीठ, सायट्रिक आम्ल घालावे. मिश्रण मिक्सरमधून फिरवून पेस्ट तयार करावी. तयार केलेली पेस्ट ८२ अंश सेल्सिअस तापमानास गरम करून निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावे.

आले पावडर
प्रथम आले स्वच्छ पाण्‍याने धुवून घ्‍यावे. त्यानंतर कोरड्या कापडाने पुसून घ्यावे. आले पातळ चकत्यांमध्ये कापून उन्हामध्ये किंवा ड्रायरच्या साह्याने वाळवून घ्यावे. वाळलेले आल्याचे तुकडे मिक्सरमधून फिरवून घ्यावेत. तयार झालेली पावडर पाकिटांमध्ये हवाबंद करावी. साठवण कोरड्या जागी करावी.

ज्यूस 
साहित्य 

आले १०० ग्रॅम, मध अर्धा चमचा, सेंधवा मीठ पाव चमचा

कृती 
आल्याचा ज्यूस बनवण्यासाठी आले स्वच्छ धुवून त्याची वरची साल काढून टाकावी. त्याचे अर्धा इंचांचे तुकडे करून घ्यावेत. त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून ज्युसर मधून फिरवून घ्यावे. तयार ज्यूस गाळणीने गाळून घ्यावा. त्यामध्ये मध आणि सैंधव मीठ घालून व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे. तयार झालेला ज्यूस बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावा. सर्दी, घसा दूखी वर आले ज्यूस उत्तम उपाय ठरू शकतो.

आले कॉर्डियल 
साहित्य 

आले १०० ग्रॅम, गूळ २०० ग्रॅम, सायट्रिक आम्ल ५ ग्रॅम, लिंबू रस पाव चमचा.

कृती 
कैरीच्या पन्ह्याप्रमाणे आल्याचे कॉर्डियल बनवले जाते. त्यासाठी प्रथम आले स्वच्छ धुवून त्याची वरची साल काढून टाकावी. त्याचे बारीक तुकडे करून शिजवून घ्यावेत. शिजवलेले आले, बारीक किसलेला गूळ, लिंबाचा रस, सायट्रिक आम्ल एकत्रित करून हाताने व्यवस्थित कुस्करून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण चाळणीने चाळून घ्यावे जेणेकरून त्यामध्ये गुळाचा खडा राहणार नाही. तयार मिश्रण काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमधे ठेवावे. हे कॉर्डियल बनवताना तयार केलेले १ चमचा मिश्रण १ ग्लास पाण्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकून सर्व्ह करावे. हे कॉर्डियल फ्रीजमधे ३ महिन्यापर्यंत टिकते .

आले कॅण्डी 
साहित्य
आले २०० ग्रॅम, साखर ३०० ग्रॅम, वेलची पावडर अर्धा चमचा

कृती 

  • कॅण्डी साठी शक्यतो सरळ आकाराचे आले निवडावे. आले स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून त्याची साल काढावी. त्यानंतर त्याचे बारीक चकत्यांमध्ये काप करावेत. हे काप कुकरमध्ये अर्धा कप पाणी घालून १० मिनिटे मंद आचेवर १ शिटी काढून घ्यावी. नंतर गॅस बंद करून छोट्या चमच्याने दाबून त्यातील पाणी काढून टाकावे.
  • पाक बनवण्यासाठी १०० ग्रॅम पाण्यामध्ये ३०० ग्रॅम साखर मिसळून पाक शिजवून घ्यावा. त्यावरती येणारा फेसाळ भाग अधूनमधून बाजूला काढून टाकावा. यामध्ये शिजवलेले आल्याच्या तुकडे घालून पाक घट्ट होईपर्यंत (एकतारी) शिजवत राहावे. त्यानंतर गॅस बंद करून त्यात वेलची पावडर मिसळावी. आल्याचे तुकडे पाकामधे १० ते १२ तास ठेवून द्यावेत. पाक थोडासा सैलसर होण्यासाठी मंद आचेवर ठेवून नंतर त्याला थंड करावे. एका जाळीवर ही कॅण्डी पसरून २ तास फॅनखाली सुकवावी. तयार झालेली कॅण्डी स्वच्छ, निर्जंतुक केलेल्या हवाबंद बाटलीमध्ये भरावी.

- करिश्मा कांबळे, ८४५९३७४६८४
(सहाय्यक प्राध्यापिका, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, आचळोली ,जि. रायगड)


इतर कृषी प्रक्रिया
आलेपासून प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मितीआले ही कंदवर्गीय वनस्पती असून बहुऔषधी म्हणून...
पौष्टिक आहारासाठी क्विनोआक्विनोआ हा धान्याचा एक प्रकार असून एखाद्या...
जाणून घ्या अंडी खाण्याचे फायदेशरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः...
अ‍ॅक्रिलामाइड कमी करण्यासाठी...विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
लिंबापासून प्रक्रियायुक्त पदार्थलिंबाच्या सालीमध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे,...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटसद्यःस्थितीत भारतामध्ये ड्रॅगन फ्रूटचे उपलब्ध...
आवळ्यापासून लोणचे, सुपारी, मुरंबाआवळ्यापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांना...
कोकोओपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकोओचे अनेक प्रकार असून, प्रत्येक प्रकारातील...
पेरूपासून जेली, जॅम, सरबतपेरू हे नाशवंत फळ असल्यामुळे योग्यवेळी काढणी करून...
आरोग्यवर्धक योगर्टयोगर्ट हे कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, झिंक,...
पेरूचे आरोग्यदायी गुणधर्मपेरू हे नाशवंत फळ असून ते जास्त काळ टिकत नाही....
आहारात असावेत ग्लुटेन मुक्त पदार्थग्लुटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...
तुतीपासून प्रक्रियायुक्त पदार्थतुती फळांचा  पांढरा, काळा आणि लाल रंग असतो....
आहारात असावेत मोड आलेली कडधान्येप्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक...
अन्न प्रक्रियेसाठी कंपित विद्युत...पारंपरिक अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये...
आहारामध्ये असावा तंतुमय पदार्थांचा...बदलती जीवनशैली आणि नेहमी जंक फूड खाण्यामुळे...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...
केळीपासून व्हिनेगार, टॉफी, पावडरकेळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे...
जीवनसत्त्वयुक्त शेवगाशेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे आहेत....